Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

साहो माझ्याच चित्रपटाची नक्कल, फ्रेंच दिग्दर्शकाचा गंभीर आरोप

नक्कल करायलाही अक्कल लागते मात्र साहो चित्रपटाच्या दिग्दर्शकाला तेवढीही अक्कल नाही. फ्रेंच दिग्दर्शकाने उडवली साहोची खिल्ली

बाहुबली फेम प्रभासचा बहुचर्चित साहो हा चित्रपट तुफान कमाई करत आहे. केवळ चारच दिवसात साहोने १०० कोटी क्लबमध्ये स्थान मिळवले आहे. प्रभासचे चाहते त्याच्या या चित्रपटाची प्रतीक्षा कित्येक दिवसांपासून करत होते. संमिक्षकांच्या मते कथेत काही दम नसला तरीही केवळ प्रभासच्या नावावर हा चित्रपट गर्दी खेचत आहे. साहो हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करण्याबरोबरच अजून एका गोष्टीमुळे सध्या चर्चेत आहे.

saaho largo winch, saaho collection, saaho french copy, saaho french director tweet, saaho prabhas, saaho jerome

या चित्रपटासंदर्भात एक नवीनच वाद समोर आला आहे. एका फ्रेंच दिग्दर्शकाने असा आरोप केलाय कि साहो हा चित्रपट माझ्या २००८ साली प्रदर्शित झालेल्या लार्गो विंच ह्या चित्रपटाची हुबेहूब नक्कल आहे. ह्याही पुढे जाऊन त्याने साहोच्या दिग्दर्शकासाठी एक अपमानजनक वक्तव्य केले. ह्या फ्रेंच दिग्दर्शकाचं नाव आहे जेरोम साल.

saaho largo winch, saaho collection, saaho french copy, saaho french director tweet, saaho prabhas, saaho jerome
(Image Source: ScoopWhoop)

जेरोमने आपल्या ट्विटर हँडलवर म्हटले आहे कि “लार्गो विंचची नक्कलच करायची होती तर थोडी व्यवस्थित नक्कल तरी करायची असती मात्र त्यांनी साहो सारखा हास्यास्पद सिनेमा तयार केला. नक्कल करायलाही अक्कल लागते पण बहुतेक साहोच्या दिग्दर्शकाकडे ती नसावी”. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री लिसा रे हिने सुद्धा साहो हा चित्रपट लार्गो विंच ह्या चित्रपटाची नक्कल असल्याची टीका केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More