Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

सरदार वल्लभभाई पटेल नसते तर 565 स्वतंत्र भारत झाले असते

आपणा सर्वांना माहिती आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने पारतंत्र्याच्या बेड्या मोडून काढल्या, यासाठी अनेक ठिकाणी रक्तरंजित संघर्ष करावा लागला. जेव्हा स्वातंत्र्य मिळण्याची चिन्हे दिसत होती त्या वेळीही भारतावर विभागीले जाण्याचे संकट होते. भारत आणि पाकिस्तान असे दोन वेगवेगळे देश तयार करून इंग्रजांनी आधीच फाळणीला खतपाणी घातले होते. हा असा काळ होता जेव्हा संपूर्ण भारतामध्ये दंगलींचे पेव फुटले होते. संपूर्ण देश एका मोठ्या संकटात अडकल्याची जाणीव प्रत्येक भारतीयाला होती.

भारत आणि पाकिस्तानची फाळणी अटळ होती पण इंग्रजांनी येथील राजा राजवाड्यांना स्वायत्तता देऊन भारतासमोर फार मोठा प्रश्न निर्माण केला होता.

कारण हैदराबादच्या निजामाने आपण स्वतंत्र राहणार असल्याची घोषणा केली होती आणि अशा परिस्थितीत भारतातील प्रत्येक राजाने वेगळा निर्णय घेऊ नये याची दक्षता घेण्याचे काम काँग्रेसचे नेते करत होते. ही ती वास्तववादी कथा आहे ज्यामध्ये तुम्हाला भारताला एकसंध ठेवण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी कुठले प्रयत्न केले याचा उल्लेख आढळतील.

sardar vallabhbhai patel, sardar vallabhbhai patel information, sardar vallabhbhai patel biography, sardar patel in marathi, integration, Integration of Princely States, independence, nizam of hyderabad, paramountcy, vp menon, सरदार वल्लभभाई पटेल, ब्रिटिश, व्ही.पी. मेनन, लॉर्ड माऊंट बॅटन
sardar vallabhbhai patel (Source – Jagran Josh)

सरदार वल्लभभाई पटेल यांचे भारताच्या स्वातंत्र्यामध्येच नव्हे तर भारताला स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर स्वतंत्र भारत एकसंध ठेवण्यामध्ये सुद्धा फार मोठे योगदान आहे. व्हॉइस रॉय लॉर्ड माऊंट बॅटन यांनी येथील प्रत्येक राजाला स्वायत्तता देऊ केली. भारतातील प्रत्येक राजा इंग्लंडच्या राजघराण्याचा सेवक असे, त्यांचा ब्रिटिश सरकारची करार झालेला होता. या कराराला “पँरामाऊंटसी” असे म्हटले जायचे.

या कराराच्या अंतर्गत इंग्रजांचा एक प्रतिनिधी राजाच्या दरबारी असे. राजाने कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्याच्याशी सल्ला-मसलत करणे किंवा त्याचे मार्गदर्शन घेणे बंधनकारक असे. थोडक्यात, मांडलिक झालेल्या या राज्यांना इंग्रजांनी नावापुरतं राजेपद बहाल केलेले होते. तेथील सर्व निर्णय ब्रिटिश स्वतः करत असत. या प्रत्येक राज्यामध्ये वसूल केला जाणारा महसूल ब्रिटिशांच्या हवाली केला जात असे आणि आज अचानक ब्रिटिश भारत सोडून जात आहेत असे कळल्यानंतर त्या राज्यांना आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या होत्या की,”आमचा स्वतंत्र देश तयार करणार”

हे सर्व टाळण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी व्हाइसरॉय यांचे सेक्रेटरी व्ही.पी. मेनन यांना हाताशी धरून भारताची अजून विभागणी होणार नाही यासाठी प्रयत्न चालू केले होते. व्हाईसरॉय माउंटबॅटन नेहमी भविष्याचा विचार करत असत. आज इंग्रजांनी फाळनीची आग भारतात लावलेली आहे या सर्व घडामोंडीकडे भविष्यातील तरुण पिढी माउंट बँटन यांच्याकडे कसे बघेल असा प्रश्न नेहमी पडत असे.

sardar vallabhbhai patel, sardar vallabhbhai patel information, sardar vallabhbhai patel biography, sardar patel in marathi, integration, Integration of Princely States, independence, nizam of hyderabad, paramountcy, vp menon, सरदार वल्लभभाई पटेल, ब्रिटिश, व्ही.पी. मेनन, लॉर्ड माऊंट बॅटन
Sardar Patel and Lord Mountbatten (Source – Scoopnest)

त्यांचे सेक्रेटरी यांना त्यांच्या मनस्थिती बद्दल माहिती होती आणि म्हणूनच त्यांनी भारताला एकसंध ठेवण्यासाठी व्हॉईसरॉय यांच्याकडे मदत मागितली आणि भविष्यातील भारताचे नुकसान टाळण्यासाठी व्हाइसरॉय यांनीही त्यांना मदत करण्यास संमती दर्शविली. व्हॉइस रॉय माऊंट बॅटन इंग्लंडच्या शाही परिवाराचे सदस्य होते त्यामुळे भारतातील प्रत्येक राजा त्यांच्याशी मैत्री करण्यासाठी तयार असे. नेहरू आणि पटेल यांनी त्यांच्या याच संबंधांचा फायदा घेण्याचे ठरवले होते.

मध्यंतरीच्या काळात सरदार वल्लभभाई पटेल आणि व्हॉईसरॉय यांची बैठक झाली. नेहरूंनी त्यांच्या अंतर्गत मंत्रिमंडळामध्ये व्हाईसरॉय माउंटबॅटन यांना जागा देण्यास संमती दर्शविली. सरदार वल्लभ भाई पटेल भारताला एकसंध ठेवण्यासाठी कुठल्याही तडजोडीला तयार होते.

सरदार वल्लभभाई पटेल आणि मेनन यांनी एकत्र येऊन “इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशन” नावाचा करार तयार केला. या करारावर सही केल्यानंतरच कुठल्याही राज्याला भारतात विलीन होण्याची संमती प्राप्त होत असे.

सरदार वल्लभभाई पटेल यांनी अत्यंत शांतपणे सर्व राज्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला. पण, त्यांच्या समजून सांगण्याचा काहीही परिणाम बघायला मिळाला नाही आणि मग शेवटी लॉर्ड माउंट बँटन यांनी 25 जुलै 1947 रोजी सर्व राजांना एकत्र बोलावले. यावेळी बोलताना लॉर्ड माउंटबॅटन यांनी सर्व राज्यांना भारतामध्ये विलीन होण्याचे फायदे आणि तोटे समजावून सांगितले. त्यांना ही कल्पना दिली की 15 ऑगस्ट 1947 नंतर इंग्रज तुमची कुठलीही मदत करू शकणार नाहीत. ही माहिती मिळाल्यानंतर सर्व राज्यांना धक्का बसला.

जर इंग्रज आपली सहाय्यता करू शकत नसतील तर आपण भारतात विलीन होणे हेच उचित असा समज सर्व राज्यांनी करून घेतला आणि त्यानंतर अनेक संस्थांनी त्यांचे राज्य भारतामध्ये विलीन करण्यास संमती दर्शविली.

sardar vallabhbhai patel, sardar vallabhbhai patel information, sardar vallabhbhai patel biography, sardar patel in marathi, integration, Integration of Princely States, independence, nizam of hyderabad, paramountcy, vp menon, सरदार वल्लभभाई पटेल, ब्रिटिश, व्ही.पी. मेनन, लॉर्ड माऊंट बॅटन
Sardar Patel and Nizam of Hyderabad (Source – guruprasad.net)

तसं पाहायला गेलं तर हैदराबाद, भोपाळ, जुनागड, बिकानेर जम्मू आणि काश्मीर आणि अजून काही भागातील राजे भारतात येण्यास तयार नव्हते. पण सरदार वल्लभभाई पटेल यांनी साम दाम दंड भेद या सर्व आयुधांना वापरून भारत एकसंध ठेवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. आज जो भारताचा चेहरा दिसत आहे त्याचे एकमेव कारण म्हणजे सरदार वल्लभाई पटेल हेच होय.

इंग्रज ज्या परिस्थितीमध्ये भारतात आले त्यांना त्याच परिस्थितीमध्ये भारताला सोडून जाण्याची इच्छा होती. म्हणजेच अनेक तुकड्यांमध्ये विभागालेला भारत इंग्रजांना अपेक्षित होता पण सरदार वल्लभभाई पटेल यांनी इंग्रजांच्या या इच्छेवर पाणी सोडले. भारताला एकरूप ठेवण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांना काही वेळेस कठोर निर्णय घ्यावे लागले होते आणि याबाबतीत असणारा इतिहास प्रत्येकालाच माहिती आहे. हैदराबाद संस्थान विलीन करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी वेळी सैन्याचीही मदत घेतली होती. भारताला एकसंध ठेवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणाऱ्या या लोहपुरुषाला आमचा सलाम.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More