Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

देशातील सर्वात श्रीमंत राजकारणी’च्या आरोपावर शरद पवारांनी दिलंय हे उत्तर

काटाच्या वाडीतील शाळा ते बारामती, बारामती ते पुणे, पुणे ते मुंबई आणि मुंबई ते दिल्ली असा थक्क करणारा प्रवास शरद पवारांचा आहे. आज वातावरणात काहीसा बदल झाला असला तरी शरद पवार हे कायमच ‘मराठा स्ट्रॉन्गमन’ म्हणून ओळखले गेले.

“राजकीय विचारप्रणाली, बांधिलकी आणि त्या त्या व्यक्तींसोबत जुळलेल्या स्नेहामुळे शरद पवारांच्या विश्वासर्हतेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उभे केले गेले आहे.”

तब्बल ५ दशकं राजकीय कारकीर्द असलेल्या शरद पवार यांच्याविषयी अनेक प्रवाद आहेत. सध्या महाराष्ट्राची विधानसभा येऊ घातल्याने WhatsApp University मधून शेअर होणारे अनेक मेसेज आपल्याला मिळत असतीलच पण यामध्ये सगळ्यात जास्त चघळला जाणारा प्रवाद म्हणजे ‘देशातील सर्वात श्रीमंत राजकारणी’ होय.

तसं पाहायला गेलं तर हा आरोप काही नवीन नाही. तुम्ही सुद्धा गावाच्या पारावर बसून किंवा कॉलेज च्या कट्ट्यावर बंक मारून शरद पवारांविषयी घमासान चर्चा केल्याचं असतील. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, या सगळ्या आरोपांवर शरद पवारांचं उत्तर काय आहे ?

शरद पवार, देशातील सर्वात श्रीमंत राजकारणी, WhatsApp University, Sharad Pawar, मराठा स्ट्रॉन्गमन, sharad pawar on Richest politician in india, sharad pawar on wealth, Maharashtra Vidhansabha 2019
Source – AajTak

मुळात मागच्या वर्षी राज ठाकरेंनी घेतलेला मुलाखती मध्ये त्यांनी शरदरावांना हा प्रश्न विचारला होता पण त्याचे उत्तर काहीसे बाजूलाच राहिले. पवारांनी व्यक्तिशः अश्या आरोपांवर कधीही उत्तर दिले नाही, पण देशातील सर्वात श्रीमंत राजकारणी’च्या आरोपावर त्यांनी एका राजकीय आत्मकथेमध्ये भाष्य केलं आहे.

मागील ५० वर्षपासून महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात आहे त्यामुळे माझ्याविषयी अनेक मतप्रवाह आहेत. अश्या गोष्टी जेव्हा माझ्या कानावर पडतात तेव्हा वेदना आणि त्रास तर होतोच पण अनेकवेळा करमणूकही होते असं शरद पवार म्हणतात.

देशातील सर्वात श्रीमंत राजकारणी’च्या आरोपावर ते म्हणतात मी श्रीमंत राजकारणी आहे हे नक्कीच खरं आहे, पण वेगळ्या अर्थानं. मी अनेकनाचा विश्वास कमावला आहे आणि म्हणूनच सत्तेत असो किंवा विरोधी बाकावर माझ्याकडे प्रत्येकजण आपलेपणाने काम घेऊन येतो.

“आजही अनेकांची एक श्रद्धा आहे कि आपल्या अडचणीची कोंडी फक्त शरद पवार फोडू शकतात. आणि म्हणूनच माझ्याबद्दल लोकांमध्ये भरवसा टिकून आहे”

शरदराव यात पुढे म्हणतात,
कोणाचेही काम पूर्ण करण्यासाठी मी कधीही कोणत्याही अटी घातल्या नाहीत किंवा त्याची किंमत वासून केली नाही. कोणत्याही भीतीविना व्यक्तींना आणि संस्थांना मदत हे माझं कर्तव्य असल्याचं मी मानत आलो आहे आणि म्हणूनच गेली सलग ५० वर्षे विनाअटींच्या, विनाआर्थिक मोबदल्याच्या सदिच्छा मला अगणित मिळत आल्या आहेत. मी सत्तेत असलो किंवा नसलो तरी मला निधी उभारण्यात कधीही अडचण आली नाही म्हणूनच बहुतेक माझ्या गर्भश्रीमंती विषयी प्रवाद तयार झाले असावेत असं शरद पवार म्हणतात.

पण कोणाच्याही लक्षात येणारी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे कितीही पैसे असो, राजकीय पक्षाचं खरं भांडवल हे जनाधार ! निव्वळ पैशाच्या जोरावर तुम्ही राजकारणात फार काळ टिकू शकत नाही.


Leave A Reply

Your email address will not be published.