Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

हातावर पोट असलेल्या कामगारांची नोकरी गेली, ‘ती’ भारतीय महिला वकील मदतीला धावली!

UAE मधील कामगारांच्या हाती नोकरी आणि पैसे नसताना एक भारतीय महिला वकील त्यांच्या मदतीला धावली, कोण आहे हि व्यक्ती ?

कोरोनाच्या काळात देश लॉकडाऊन झाल्यामुळे मजुरांची होणारी पायपीट आणि पैश्यांअभावी त्यांचे होणारे हाल आपण बघितले. अश्या परिस्थितीत अनेक राज्यांतील कामगारांसाठी सोनू सूद अगदी देवासारखा धावून आला. त्याने हजारो कामगारांना आपापल्या घरी पोहोचवण्यास मदत केली. ह्या काळात लाखो कामगारांनी आपली नोकरी गमावली कारण बरेचशे उद्योगदेखील गेल्या 3 महिन्यांपासून बंद होते.

अशीच काहीशी परिस्थिती UAE मध्ये काम करणाऱ्या भारतीय कामगारांची आहे. हाताला काम नसल्यामुळे पैसे मिळणेही बंद झालेत आणि परत भारतात येण्यासाठी सुद्धा व्यवस्था नाही. परंतु ह्या कठीण काळात UAE मधील एक भारतीय महिला वकील ह्या लोकांच्या मदतीला धावून आल्या आहेत, त्यांचं नाव शिला थॉमस. शिला थॉमस ह्या मूळच्या केरळच्या असून गेली २५ वर्ष यूएई मध्ये कार्यरत आहेत.

lawyer sheela thomas, uae, corona, covid 19, indians in uae, sheela thomas uae, शिला थॉमस, यूएई वकील, corona news, कोरोना बातम्या
Sheela Thomas – An Indian origin lawyer in UAE

बिहार, युपी सारख्या अनेक राज्यातील UAE मध्ये अडकलेल्या तब्बल २ हजार पेक्षाही जास्त कामगारांना आपल्या मायदेशी जात यावं यासाठी शिला ह्यांनी कामगारांची कायदेशीर प्रक्रिया स्वतः पूर्ण करून दिली. ह्या कामासाठी त्यांनी या कामगारांकडून एक रुपयाही घेतलेला नाही. एवढेच नव्हे तर दररोज ३०० कामगारांची जेवणाची व्यवस्था सुद्धा त्यांनी केली आहे.

UAE मधील अनेक कंपन्या कामगारांना त्यांचे पासपोर्ट वापस देत नाही आहेत, तसेच अनेक लोकांचा व्हिसा देखील एक्सपायर झाला आहे. अश्या कामगारांना मदत करण्याचं मी ठरवलेलं आहे’, असं शीला थॉमस म्हणाल्या.

थॉमस पुढे म्हणाल्या, ‘काही मित्रांबरोबर शारजाह मध्ये मी लोकांना अन्न पुरवायला गेले असता तिथल्या लोकांनी त्यांचे कसे हाल होत आहेत ह्याबद्दल सांगितलं. ह्या लोकांनी काही महागड्या वकिलांना पैसे सुद्धा दिलेले. हे चित्र बघून फार वाईट वाटलं. मी देखील वकील असल्याने काही लोकांना मी माझा नंबर दिला आणि त्यांना मदत केली. आता माझा नंबर अक्षरशः व्हायरल झालेला आहे आणि अनेक गरजू लोक मला मदतीसाठी विनवणी करत आहेत.’

२५ वर्षांपासून भारताबाहेर असून सुद्धा आपल्या देशवासियांविषयी शीला ह्यांना आपुलकी आहे. ह्या कठीण काळात तेथील कामगारांना शिला थॉमस ह्यांचा मोठा आधार आहे. कुठल्याही व्यक्तीने मदत मागितल्यास शीला आपल्या परीने सगळी मदत करण्यास तयार असतात, त्या कुणालाही नकार देत नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.