Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

९ कलाकार… ६ लोककला… छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा…

प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ चित्रपटाची उत्सुकता

फर्जंद, बाळकडू, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर अशा दमदार चित्रपटानंतर प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ नावाचा चित्रपट काढत आहेत. याचं मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं होतं. त्यानंतर आता या चित्रपटातील शिवराज्याभिषेक या गीताचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून यामध्ये नऊ कलाकार सहा लोककलांमधून छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करणार आहेत. शिवराज्याभिषेक गाण्याच्या टीझरमध्ये यांची झलक पाहायला मिळते. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रसाद ओक आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त राजेश मापुसकर पहिल्यांदाच एकत्र आले आहेत.

https://www.instagram.com/p/B2LyC-XgbOz/?utm_source=ig_embed

“प्रत्येक आई हि असतेच… हिरकणी” अशी टॅगलाइन या चित्रपटाची असून मुलासाठी मोठं धाडस केलेल्या आईची ऐतिहासिक गोष्ट यामध्ये दाखवण्यात आली आहे. यामध्ये शिवरायांची भूमिका कोण साकारणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. जितेंद्र जोशी, पुष्कर श्रोत्री, चिन्मय मांडलेकर, सिद्धार्थ चांदेकर, राहुल रानडे, हेमंत ढोमे, प्रियदर्शन जाधव, सुहास जोशी आणि क्षिती जोग ही कलाकार मंडळी यात काम करणार आहे. या चित्रपटात लॉरेन्स डिसुझा सह निर्माते आहेत. इरादा एंटरटेन्मेंटच्या फाल्गुनी पटेल यांनी चित्रपटाची निर्मिती केली तर क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून राजेश मापुसकर यांनी जबाबदारी पेलली आहे. येत्या दिवाळीत २४ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


आपण लेखक आहात, लिहिण्याचा छंद आहे किंवा इतर कोणतीही माहिती आमच्या सोबत शेअर करण्यासाठी info@uniksone.com वर ई-मेल करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More