छत्रपती शिवरायांच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगावर विशेष चित्रफीत.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहेत. छत्रपतींच्या आयुष्यातील अनेक प्रसंगातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. याबाबत अनेक शौर्यकथा लहानापासून मोठ्यांपर्यन्त आपल्याला एकायलाही मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर तसेच अनेक महत्वाच्या प्रसंगावर अनेक चित्रपट आणि मालिकाही प्रसिद्ध झाल्या आहेत. यावर आता एक प्रसिद्ध दिग्दर्शक सुद्धा विशेषपट काढणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही महत्वाच्या प्रसंगावर आधारीत चित्रफितीद्वारे किस्से समोर आणण्याचा निर्णय दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांनी जाहीर केला आहे. याचं प्रसारण झी मराठीच्या माध्यमातून होणार आहे. दिगपाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी या आधी फर्जंद, फत्तेशिकस्त आणि जंगजौहर या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
आपल्या ऐतिहासिक चित्रपटाने लोकांना भुरळ पडणारे दिगपल लांजेकर (Digpal Lanjekar) स्वतः इतिहासाचे अभ्यासक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेला फर्जंद आणि फत्तेशिकस्त या चित्रपटांना लोकांनी भरभरून प्रेम दिले आहे. यातील फत्तेशिकस्त चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर झी टॉकीज वर 16 ऑगस्टला होणार आहे या निमित्ताने लांजेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही महत्वाच्या प्रसंगावर प्रकाश टाकणार आहेत.