जगातील सर्वोच्च १० यशस्वी लोकांच्या झोपण्याच्या सवयी

जगात परफेक्ट असे झोपण्याचा वेळ कुठेही उपलब्ध नाही, त्यामुळे झोपेचा एकच पॅटर्न प्रत्येकाला लागू पडेलच असं नाही.
योग्य झोप घेणे महत्त्वाचे का आहे ?
शांत झोप प्रत्येकालाच मिळेल असं नाही, तर फार थोड्याच भाग्यवान लोकांना शांत झोपेचा आस्वाद घेता येतो. जगातील विविध संशोधक आणि विद्यापीठांनी शांत चांगल्या झोपेबद्दल संशोधन केले आहे आणि अजूनही करत आहेत, जसे जसे नवीन शोध समोर येत आहेत तसे तसे झोपेचे महत्व वाढतच चालले आहे.
तुमच्या झोपेच्या योग्य वेळा जाणून घ्या
जगात परफेक्ट असे झोपण्याचा वेळ कुठेही उपलब्ध नाही, त्यामुळे झोपेचा एकच पॅटर्न प्रत्येकाला लागू पडेलच असं नाही. प्रत्येकाच्या शारीरिक योग्येतेनुसार आणि कामानुसार झोपेचा पॅटर्न तयार होत असतो किंवा ती व्यक्ती तास तयार करत असते.
इथे दिलेल्या जगातील सर्वोच्च १० यशस्वी लोकांच्या झोपण्याच्या सवयी तुम्हाला तुमच्या झोपेच्या पटर्नबद्दल नक्कीच मोटिव्हेट करतील.
बिल गेट्स
बिल गेट्स हे एक अमेरिकन उद्योगपती, परोपकारी, गुंतवणूकदार, उद्योजक आणि संगणक प्रोग्रामर आहेत. 19 75 मध्ये, बिल गेट्स आणि पॉल अॅलन यांनी मायक्रोसॉफ्टची सह-स्थापना केली, जी पुढे जाऊन जगातील सर्वात मोठी पीसी सॉफ्टवेअर कंपनी बनली आहे. बिल गेट्स दररोराज 7 तास शांत झोप घेतात त्यांच्या झोपेचा पटर्न रात्री 12 ते सकाळी 7 असा आहे.
नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी भारताचे सध्याचे पंतप्रधान आहेत, तसेच नरेंद्र मोदी जगातील टॉप १० प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. मोदी दिवसभर जगभर फिरत असतात आणि सकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत ते पूर्णपणे ऊर्जासंपन्न असतात. डॉक्टरांनी त्यांना दररोज किमान ६ तासांची झोप घेण्याची विनन्ती देखील केली आहे, पण त्यांना केवळ 3-4 तास शांत झोपेचा आस्वाद घेता येतो. जगातील अनेक लोक मोदींच्या ऊर्जासंपन्न बाबत विचारात असतात, आणि त्यांनी एका मुलाखतीमध्ये या ऊर्जेचा गुपित योग आणि प्राणायाम आहे असं सांगितलं आहे.
रिचर्ड ब्रॅन्सन
रिचर्ड ब्रॅन्सन एक इंग्रजी उद्योगपती, गुंतवणूकदार, आणि लोकोपकारी आहेत. रिचर्ड ब्रॅन्सन दिवसाचे दररोराज 5-6 तास झोप घेतात, त्यांच्या झोपेचा पटर्न रात्री 12 ते सकाळी 5-6 असा आहे.
टीम कूक
टीम कूक एक अमेरिकन व्यावसायिक कार्यकारी अधिकारी आहे, सध्या ते जगप्रसिद्ध मोबाईल कंपनी ऍपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, जे आधी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर होते. टीम कूक दररोराज 7 तास शांत झोप घेतात त्यांच्या झोपेचा पटर्न रात्री 9.30 ते सकाळी 4.30 असा आहे.
एरियाना हफिंग्टन
एरियाना हफिंग्टन ह्या ग्रीक अमेरिकन लेखिका, सिंडिकेटेड स्तंभलेखक आणि प्रासंगिक अभिनेत्री आहेत. त्या “द हफिंग्टन पोस्ट” च्या सह-संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. एरियाना हफिंग्टनना दिवसाची 7 तास शांत झोप घ्यायला फार आवडते , त्या रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत झोप घेतात.
इंद्रा नूयी
इंद्रा कृष्णमूर्ती नूयी एक जन्माने भारतीय आणि नैसर्गिक अमेरिकन व्यवसायिक कार्यकारी अधिकारी आहेत सध्या त्या पेप्सिकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, जी अन्न व पेय उद्योग कंपनी निव्वळ महसूलाने जगात सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची आहे. इंद्रा नूयी दररोज 5 तास शांत झोप घेतात, त्या रात्री 11 ते पहाटे 4 पर्यंत झोप घेतात.
बराक ओबामा
बराक ओबामा अमेरिकी राजकारणी आहेत आणि त्यांनी अमेरिकेचे 44 वे राष्ट्रपती म्हणून यशस्वीरित्या काम केले आहे. बाराक ओबामा अमेरिकेचे प्रथमच आफ्रिकन अमेरिकन राष्ट्रपती आहेत. ओबामा दररोज 6 तास शांत झोपेचा आस्वाद घेतात, ते पहाटे 1 ते सकाळी 7 प्रयन्त झोप घेतात.
हेलेना मोरसेसे
हेलेना मॉरसेसे ह्या न्यूटन इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्या दररोज 6 तास शांत झोपेचा आस्वाद घेतात. रात्री ११ ते सकाळी ५ प्रयन्त झोप घेतात.
एलोन मस्क
एलोन रीवेस् मस्क दक्षिण आफ्रिकेत जन्माला आलेल्यानपैकी एक कॅनेडियन-अमेरिकन उद्योगपती, अभियंता, संशोधनकर्ता आणि गुंतवणुकदार आहेत. एलोन मस्क दररोज 6 तास झोपेचा आनंद पहाटे 1 ते सकाळी 7 पर्यंत घेतात.
जेफ बेझोस
जेफ बेझोस एक अमेरिकन तंत्रज्ञान उद्योजक आणि गुंतवणूकदार आहे. जेफ बेझोस ऍमेझॉन डॉट कॉमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांनी ई-कॉमर्सच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. जेफ बेझोस जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, जेफ दररोज रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत 7 तास झोप घेतात.