Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

क्रिकेटमधले हे १० मोठे रेकॉर्ड कुणीच मोडू शकणार नाही

क्रिकेटमध्ये नवनवे विक्रम बनणे आणि ते मोडले जाणे नेहमीच चालू असतं. परंतु असे काही विक्रमही बनविण्यात आले आहेत, ज्याला मोडणे जवळपास अशक्य आहे. असेच १० रेकॉर्ड्स जाणून घ्या…

१. डॉन ब्रॅडमन : कसोटीत 99.94 फलंदाजीची सरासरी
डॉन ब्रॅडमन यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीत 99.94 च्या सरासरीने धावा केल्या. अद्याप त्यांचा हा विक्रम कोणीही मोडला नाही. कदाचित कोणी तो मोडूही शकणार नाही.

don bradman, sachin tendulkar, chris gayle, graham gooch, muthaiya murlidharan, jack hobs, jim lekar, chaminda vas, cricket, records in cricket, सचिन तेंडुलकर, डॉन ब्रॅडमन, मुथय्या मुरलीधरन, चामिंडा वास
Don Bradman (Source – TOI)

२. सचिन तेंडुलकर : वनडे क्रिकेटमध्ये 18426 धावा
वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम सचिनच्या नावावर असून त्याने त्याच्या वनडे कारकिर्दीत 18426 धावा केल्या आहेत.

३. मुथय्या मुरलीधरन : 1347 विकेट
या खेळाडूने केलेला विक्रम मोडण्याचा कुणी विचारही करू शकणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त दोन गोलंदाज 1000 विकेट्स घेण्याचा टप्पा गाठू शकले आहेत आणि त्यातला त्यातला एक म्हणजे मुथय्या मुरलीधरन.

४. जॅक हॉब्स : प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 61760 धावा
जॅक हॉब्जने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 61760 धावा करून एक इतिहास रचून ठेवला आहे.

५. जिम लेकर : एका कसोटीत १९ विकेट
इंग्लंडच्या जिम लेकरने 1956 मध्ये कसोटी सामन्यात १९ बळी घेण्याचा विक्रम केला होता. इंग्लडच्या जिम लेकरचा हा विक्रम अद्याप कुणी मोडू शकला नाही.

६. ग्रॅहम गूच : एका कसोटीत 456 धावा
1990 मध्ये ग्रॅहम गूचने भारताविरुद्ध हा विक्रम केला होता. त्याने पहिल्या डावात ३३३ आणि दुसर्‍या डावात १२३ धावा केल्या.

७. विल्फ्रेड रोड्स : प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४२०४ बळी
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तीस वर्षांपासून हा विक्रम कोणीही मोडला नाही, इंग्लंडचा हा दिग्गज क्रिकेटपटू 1110 प्रथम श्रेणी सामने खेळला आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 4 हजार विकेट्सचा टप्पा ओलांडणारा तो एकमेव खेळाडू आहे.

८. चामिंडा वास : एकदिवसीय सामन्यात ८ विकेट
श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज चमिंडा वासने 2001 मध्ये केवळ 19 धावा देऊन 8 बळी घेतले होते.

9. ख्रिस गेल : 30 चेंडूत शतक
काही वर्षांपूर्वी ख्रिस गेलने पहिल्या आयपीएलमध्ये अवघ्या ३० चेंडूत शतक ठोकत टी -२० मधील सर्वात वेगवान शतक केले होते.

10. फिल सिमन्स : 10 षटकांत 3 धावा
सिमन्सने 10 षटकांत 8 मेडन सह केवळ 3 धावा दिल्या आणि सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात 4 बळी घेतले होते.

don bradman, sachin tendulkar, chris gayle, graham gooch, muthaiya murlidharan, jack hobs, jim lekar, chaminda vas, cricket, records in cricket, सचिन तेंडुलकर, डॉन ब्रॅडमन, मुथय्या मुरलीधरन, चामिंडा वास
Chris Gayle (Source – HT)
Leave A Reply

Your email address will not be published.