Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

केवळ सलमान, शाहरुख नव्हे….तर धोनीही ह्या चिंटूभाईकडून गाड्यांचे सीट्स घेतो

तुम्हाला गाडी चालवताना सीट कम्फर्ट वाटत नाही ? उंची कमी असल्यामुळे गाडीवरून पाय टेकत नाहीत ? असे अनेक प्रश्न प्रत्येक दुचाकी चालकाला असतात. बाजारात सीट्स अनेक प्रकारच्या असतात पण व्यक्तीला कम्फर्ट होईल अशी नसते पण आता हि चिंता सोडा, तुमच्या मनासारखी सीट करून ऍडजस्ट करून देण्यासाठी आहे चिंटूभाई अर्थात मुंबईतील एजाज खान, ज्यांनी अगदी सामान्य माणसापासून ते अगदी सलमान, शाहरुख, धोनीच्या गाड्यांचे सीट अड्जस्ट करण्याचे काम केले आहे.

मुंबईत एजाज खान यांचे मोटर सायकलचे गॅरेज आहे, ते व्यक्तीच्या पसंतीनुसार आणि त्याच्या शरीराला कम्फर्ट होईल असे सीट बनवून देतात. अगदी लहान M80 पासून ते अगदी नवीन बाजारात आलेल्या गाड्यांच्या सीट्स तुम्हाला तुमच्या मागणीप्रमाणे करून देतात.

two wheeler, seats, salman, shahrukh, mumbai, akashya, film industry, एजाज खान, सलमान खान, chintu bhai, seatmaker
Chintu seat maker (Source – Justdial)

याची सुरवात कशी झाली ?

एजाज खान यांच्या मोठ्या भावाचे दुचाकी दुरुस्त करण्याचे ६x४ चे दुकान आहे. मोठ्या भावाच्या दुकानात अधूनमधून ते जायचे त्यावेळी लोकांची सीट्सची समस्या त्यांच्या लक्षात आली आणि त्यांच्या डोकयात एक कल्पना सुचली सीट्स लोकांच्या मर्जीनुसार तयार करण्याचा व्यवसाय करायचा. अन या त्यांच्या या कल्पकतेला लोकांची चांगली पसंती मिळू लागली, आज मुंबईत असे वेगळ्या प्रकारचे सीट्स दिसले कि लोक आपसूक म्हणतात हे चिंटूभाईनीच बनवलं असेल म्हंणून अन अशाप्रकारे त्यांची कल्पनेला वाव मिळत गेला.

बॉलिवूडची पसंती

त्यांच्या या कामाची बातमी बॉलिवूड मधल्या लोकांच्या कानावरही गेली अन बॉलिवूडच्या चित्रपटात वापरण्यात येणाऱ्या गाड्याची सीट बनविण्याची ऑर्डर चिंटूभाईला मिळायला लागल्या. सलमान खान, अक्षय कुमार, जॅकलिन फर्नाडिस, शाहरुख खान, सैफ आली खान, जॉन इब्राहिम, संजय दत्त, आर. माधवन यांच्या विविध चित्रपटातील तसेच महेंद्र सिंग धोनीच्या गाडीच्या सीट्स एजाज खान यांनी बनवल्या आहेत.

two wheeler, seats, salman, shahrukh, mumbai, akashya, film industry, एजाज खान, सलमान खान, chintu bhai, seatmaker
(Source – Indian Express)

विविध गाड्यांच्या सीट्स बाजारात मिळतात पण आपल्याला हवी तशी सीट बाजारात मिळत नाही तर आम्ही तशी सीट बनवण्याचा प्रयत्न करत असतो, लोकांना वेगळेपण आणि शरीराला आवश्यक त्या प्रकारच्या सीट्स मिळत गेल्यामुळे आपसूकच ग्राहकांच्या पसंती आम्ही उतरलो आणि आता फिल्म क्षेत्रातील गाड्यांचे सीट्स आम्ही बनवतो, आम्हाला सीट आम्ही बनवली असे लोकांना सांगावे लागत नाही, पण सीट्स पाहूनच लोक म्हणतात कि हि नक्कीच चिंटूभाईनी बनवली असेल असे एजाज खान यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More