जगन्नाथ पुरी मंदिरातील हि ८ रहस्यं अजूनही रहस्यच आहेत

0
31
jagannath puri temple facts, jagannath temple photo, puri jagannath temple kitchen, jagannath temple history in marathi, mystery of puri jagannath temple, secrets of lord jagannath, jagannath puri flag mystery, जगन्नाथ पुरी मंदिर, जगन्नाथ पुरी मंदिर रहस्य, जगन्नाथ पुरी माहिती

पुराणात जगन्नाथ पुरीला पृथ्वीवरचे वैकुंठ म्हटले आहे. ब्रह्मा आणि स्कंद पुराणानुसार भगवान विष्णू पुरीमध्ये पुरुषोत्तम नीलमाधव म्हणून अवतरले होते. ते इथल्या साबर या जमातीचा सर्वोच्च देव झाले. साबर या जमातीचे दैवत असल्याने येथे भगवान जगन्नाथांचे रूप आदिवासी देवतांसारखे आहे. जगन्नाथ मंदिराचा महिमा केवळ देशातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. या मंदिराचा पुरावा महाभारताच्या वनपर्वात आढळतो.

मंदिराची कहाणी

सध्याचे मंदिर इ. सन 7 व्या शतकात बांधले गेले आहे. तथापि या मंदिराची निर्मिती इ. स. २ ऱ्या शतकात झाली असावी असा अंदाज आहे. येथे असलेले मंदिर ३ वेळा पडले आहे. ११७४ साली ओडिशाचे राज्यकर्ता अनंग भीमदेव यांनी त्याचे नूतनीकरण केले. मुख्य मंदिराच्या आजूबाजूला सुमारे 30 छोटी-मोठी मंदिरे वसवली गेली आहेत.

jagannath puri temple facts, jagannath temple photo, puri jagannath temple kitchen, jagannath temple history in marathi, mystery of puri jagannath temple, secrets of lord jagannath, jagannath puri flag mystery, जगन्नाथ पुरी मंदिर, जगन्नाथ पुरी मंदिर रहस्य, जगन्नाथ पुरी माहिती
(Source – HT)

मंदिरासंबंधित आश्चर्यकारक गोष्टी

  • जगन्नाथ मंदिराच्या शिखरावरचा ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकत असतो.
  • मंदिराच्या शिखरावर सुदर्शन चक्र आहे. तुम्ही कोणत्याही दिशेने या चक्राकडे पाहिले तर, असे दिसते की चक्रचा चेहरा तुमच्या बाजूला आहे.
  • मंदिरातील स्वयंपाकघरात प्रसाद शिजवण्यासाठी 7 मातीची भांडी एकमेकांच्या वर ठेवली आहेत. हा प्रसाद फक्त मातीच्या भांड्यात लाकडी जळणावरच शिजवला जातो. यावेळी, एकदम वरच्या स्थानी ठेवलेल्या भांड्यातील पदार्थ प्रथम शिजतो, त्यानंतर प्रसाद खालच्या भांड्यापासून एकापाठोपाठ एक शिजतो.
  • जेव्हा आपण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पहिले पाऊल टाकतो तेव्हा समुद्र लहरींचा आवाज ऐकू येत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे मंदिराच्या बाहेर पडताच समुद्राचा आवाज ऐकू येऊ लागतो. हा अनुभव संध्याकाळी जास्त प्रमाणात येतो.
  • बहुतांशी मंदिरांच्या शिखरावर पक्षी बसलेले आपण पाहिले आहेत. जगन्नाथ मंदिराबाबतीत हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यावर कोणताही पक्षी जात नाही. जर विमानाच्या मार्गात मंदिर असेल तर विमानाचासुद्धा रस्ता आपोआप बदलतो.
  • मंदिरात दररोज तयार केलेला प्रसाद भक्तांसाठी कधीही कमी होत नाही, तसेच मंदिर बंद होताच प्रसादही संपतो.
  • जगन्नाथ मंदिराच्या मुख्य शिखराची सावली दिवसा कधीही जात नाही.
  • दररोज मंदिराच्या 45 मजली शिखरावर एक पुजारी ध्वज बदलतो. असा समज आहे की जर ध्वज एका दिवशी बदलला नाही तर मंदिर 18 वर्षांसाठी बंद असेल.
  • सहसा दिवसा हलणारी हवा समुद्रापासून जमिनीकडे आणि संध्याकाळी जमिनीकडू समुद्राच्या दिशेने वाहते. आश्चर्याची बाब म्हणजे ही प्रक्रिया पुरीमध्ये उलटी घडते.

*आपल्याला हा लेख कसा वाटला हे खाली कमेंट करून सांगा. आपल्याला इतर कोणत्या विषयावर वाचायला आवडेल त्याबाबतची कमेंट करा. टीम इन्फोबझ्झ लवकरच त्यावर लेख सादर करेल.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here