Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

“वेडात मराठे वीर दौडले सात”, या गाण्यामागचा थरारक इतिहास तुम्हाला माहित आहे का ?

१२००० मुघल विरुद्ध ७ मराठे. हा पराक्रम पाहून महाराजांच्या डोळ्यात देखील अश्रू आले.”

शिवरायांच्या स्वराज्यनिर्मितीच्या कार्याला अनेकांनी साथ दिली. अनेकांच्या बलिदानावर अनेकांच्या कष्टावर शिवरायांना हे स्वराज्य उभे करणे शक्य झाले आणि अशाच अनेकांच्या मदतीने आणि निष्ठेने या स्वराज्याचे सुराज्य देखील झाले. स्वराज्यात शिवरायांनीच नव्हे तर अनेक मावळे, सरदार आणि सर्वसामान्यांनी अतुल्य पराक्रम केले आहेत. इतिहासात सगळ्याच पराक्रमांची नोंद मिळत नाही हे आपले दुर्दैव परंतु ज्या शूरवीरांच्या शौर्याची नोंद इतिहासात नमूद आहे त्यांचे शौर्य आपण जास्तीत जास्त पुढे पोहोचविले पाहिजे.

आज आपण अशाच एका शौर्याची कहाणी पाहणार आहोत. स्वराज्याच्या सरनौबतांनी केलेला हा पराक्रम इतिहासात अजरामर आहे. या सरनौबतांचे नाव आहे प्रतापराव गुजर.

Source – Fine Art America

कोण होते प्रतापराव गुजर ?

प्रतापराव गुजर यांचे खरे नाव कुडतोजी गुजर असे होते. मिर्झा जयसिंघाशी झालेल्या लढाईत दाखविलेल्या शौर्यामुळे छत्रपती शिवरायांकडून कुडतोजींना प्रतापराव अशी पदवी दिली गेली होती. प्रतापरावांचा जन्म १६१५ साली झाला. त्यांच्या जन्माबद्दल आणि जन्मस्थानाबद्दल इतिहासात फारशी माहिती सापडत नाही.

शिवरायांच्या स्वराज्यातील प्रतापराव गुजर हे तिसरे सरसेनापती होते. आपल्या निष्ठेने, शौर्याने आणि पराक्रमाने प्रतापरावांनी शिवरायांच्या आणि स्वराज्यातील सैनिकांच्या मनात स्वतःचे एक वेगळे मानाचे आणि विश्वासाचे स्थान बनविले होते. प्रतापरावांनी त्यांना सोपविलेल्या प्रत्येक कामात आपले शौर्य दाखवून कामगिरी फत्ते केलेली आहे. प्रतापरावांनी साल्हेरच्या लढाईत केलेले नेतृत्व विशेष महत्वाचे आहे.

मराठ्यांनी शक्यतो सगळ्या लढाया दरीखोऱ्याच्या प्रदेशात लढल्या परंतु, साल्हेरची लढाई हि मराठ्यांनी मुघलांच्या विरोधात मोकळ्या मैदानात लढलेली पहिली लढाई आहे. हि लढाई प्रतापरावांनी नेतृत्व करून जिंकून देखील दाखविली आणि इतिहासात हि लढाई अजरामर केली.

असाच एक पराक्रम प्रतापरावांनी केला ज्यासाठी त्यांचे नाव नेहमी इतिहासात घेतले जाते तो पराक्रम आहे बहलोल खानाशी केलेली लढाई. याच लढाई आणि पराक्रमाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

पार्श्वभूमी

बहलोलखानाविरुद्ध झालेली हि लढाई नेसरीची लढाई म्हणून ओळखली जाते. नेसरी हे कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७४ साली स्वतःचा राज्याभिषेक करण्याचे ठरविले आणि सगळ्या स्वराज्यात या सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोहोचली, सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. राज्याभिषेकाच्या काही काळ आधीच विजापूरच्या आदिलशाहने आपला एक सरदार स्वराज्यावर पाठविला, या सरदाराचे नाव होते बहलोलखान.

बहलोलखान स्वराज्यावर चालून तर आला पण सोबत १२,००० सैन्य घेऊन तो स्वराज्यात दाखल झाला. इतके मोठे सैन्य घेऊन त्याने संपूर्ण स्वराज्यात धुमाकूळ घातला होता, स्वराज्यातील रयतेवर अनेक जुलूम केले आणि जनतेला बेहाल करून सोडले. शिवराज्याभिषेक होण्याआधीच स्वराज्यावर आलेले हे संकट परतवून लावण्यासाठी शिवराय युक्ती लढवत होते. शिवरायांनी हि महत्वाची कामगिरी स्वराज्याचे सरनौबत कुड्तोजी गुजर म्हणजेच प्रतापराव गुजर यांच्याकडे सोपविली.

Source – Aneesh Gokhale

प्रतापरावांची चाल

प्रतापरावांनी दिलेली कामगिरी स्वीकारली आणि आपली फौज घेऊन सरनौबत निघाले बहलोलखानाचा बिमोड करायला. या खानाच्या अवाढव्य फौजेशी कसा सामना करावा या विचारात प्रतापराव आपल्या फौजेसह आगेकूच करीत होते. प्रतापरावांना एक युक्ती सुचली, बहलोलखानाची छावणी जेथे होती त्या ठिकाणी मोठे जलाशय होते आणि याच जलाशयातून बहलोल खानाच्या फौजेला पाणीपुरवठा होत होता.

मराठ्यांच्या सैन्यांनी बहलोलखानाच्या छावणीला चारही बाजूनी घेरले आणि सर्वप्रथम ज्या जलाशयातून खानाच्या सैन्याला पाणीपुरवठा होत होता ते जलाशयच आपल्या ताब्यात घेऊन तेथे फौज तैनात केली. प्रतापरावांनी खऱ्या अर्थाने खानाचे पाणी बंद केले होते. पाण्यावाचून खानाच्या सैन्याचे हाल होऊ लागले. आपण इतक्या जलद मराठ्यांच्या तावडीत सापडू अशी कल्पना खानाने स्वप्नात देखील केलेली नव्हती.

अचानक एकाएकी हजारो मराठा सैनिक बहलोलखानाच्या सैन्यावर तुटून पडले. मराठ्यांची हीच खासियत होती कि ते वाऱ्याच्या वेगाने आक्रमण करत आणि शत्रूला वार करण्याची संधी देखील देत नसत.

परंतु, बहलोलखान मात्र जलद आपल्या सैन्यानिशी सज्ज झाला, त्याचे सैन्य देखील अतिशय मोठे आणि एकेक सैनिक उंच धिप्पाड पठाण. अशा दोन्ही गटांमध्ये घमासान युद्ध सुरु झाले. असा देखील उल्लेख सापडतो कि, बराच वेळ हे युद्ध चालू असतांना खानाच्या सेनेतील एक मोठा हत्ती अचानक पिसाळला आणि सैरावैरा धावत सुटला आणि त्या धावपळीत त्या हत्तीनेच खानाचे बरेच सैन्य घायाळ केले आणि मग तो हत्ती मराठ्यांच्या सैन्यात घुसला तसा लगेच त्याला शांत करण्यात आले आणि ताब्यात घेण्यात आले.

मराठ्यांनी या युद्धात आपली उत्तम कामगिरी दाखविली आणि सोबतच खानाच्या सैन्याला इतके युद्ध चालू असताना देखील पाणी मिळत नव्हते त्यामुळे त्याचे सैन्य आणि तो स्वतः देखील अस्ताला आला. बहलोलखानापुढे आता दोनच मार्ग होते, एक तर युद्ध करून मरून जाणे नाहीतर सरळ मराठ्यांना शरण जाणे. खानाने दुसरा मार्ग निवडला आणि मराठ्यांशी बोलणी सुरु केली. आम्ही केवळ बादशाहच्या आदेशाचे पालन करीत इथवर आलो आहोत, आम्ही आमची शरणागती स्वीकारतो परंतु आम्हाला अभय द्या अशी आर्त विनवणी बहलोल खानाने केली.

बहलोल खानाची व त्याच्या सैन्याची झालेली अवस्था पाहून प्रतापराव नरमले आणि त्यांनी चक्क हातात आलेल्या बहलोल खानाला मुक्त केले आणि सोडून दिले. शिवरायांनी प्रतापरावांना या कामगिरीवर पाठवतांना खानाचा बिमोड करूनच या अशी सक्त ताकीद दिली असून सुद्धा प्रतापरावांनी ऐनवेळी खानाच्या सैन्याला अभय दिले. हि बातमी शिवरायांपर्यंत पोहोचली आणि शिवराय एकाएकी राग अनावर होऊन प्रतापरावांना बोलू लागले. त्यांनी प्रतापरावांना पत्रव्यवहार केला आणि त्या पत्रांमधून त्यांच्या कामाचा जाब विचारण्यात आला. एक सरनौबत म्हणून त्यांनी केलेलं हे काम शोभणारे नाही.

या पत्राने प्रतापराव खजील झाले. इकडे बहलोलखान अजूनही महाराष्ट्रात होता आणि पुन्हा स्वराज्यावर हल्ला करण्यास सज्ज होत होता. हि बातमी हेरांमार्फत शिवरायांना मिळाली. लागलीच शिवरायांनी प्रतापरावांना पत्र लिहिले. या वेळेस पुन्हा आपल्या चुकीची शिक्षा म्हणून शिवरायांनी बहलोलखानाचा बिमोड करण्यासाठी प्रतापरावांना नियुक्त केले आणि बहलोल खानाला ठार केल्याशिवाय परत आम्हाला तोंड दाखवू नये अशी सक्त ताकीद महाराजांनी प्रतापरावांना दिली.

Source – Medium

वाटचाल

प्रतापरावांना शिवरायांचे पत्र जिव्हारी लागले आणि आपली घोडचूक लक्षात आली. प्रतापरावांना खबर लागली की कोल्हापूर नजीक नेसरी गावाकडील रस्त्याने खान आगेकूच करीत आहे. नेसरी पासून नजीकच मराठ्यांची छावणी सज्ज होती. छावणीत साधारण १२०० ते १५०० सैन्य असावे. प्रतापरावांना वेळोवेळी शिवरायांचे पत्रातील बोल विचलित करीत होते. स्वतःच्या चुकीवर त्यांना पश्चाताप होत होता. खानाच्या १२,००० फौजेसमोर आपली १२०० ते १५०० फौज घेऊन जाणे हे त्यावेळी प्रतापरावांना योग्य वाटत नव्हते.

एकाएकी प्रतापराव उठले, एकटेच उठले, एकटेच घोड्यावर स्वार झाले आणि सारी छावणी मागे सोडून प्रतापराव बहलोल खानाच्या मागावर निघाले.

मराठी सैन्य या घटनेशी परिचित नव्हते परंतु छावणीतील ६ सरदारांनी प्रतापरावांना बाहेर जाताना पहिले आणि ते ६ सरदार चक्क प्रतापरावांसोबत बहलोलखानाशी दोन हाथ करण्यास निघाले. आपण काय करतोय, आपण कुणाशी दोन हाथ करण्यास जातोय, किती मोठ्या संख्येने असणाऱ्या सैन्याला आपण ७ च्या संख्येने विरोध करायला जातोय अशी किंचितशी काळजी देखील या वीरांना करावीशी वाटली नाही. आपल्या ध्येर्याने वेडे होऊन हे ७ वीर घोडी दौडत नेसरी येथे चाल करीत होते.

बहलोल खान नेसरी डोंगरातील खिंडीत असतांनाच अचानक समोरून धुळीचे लोट दिसू लागले आणि खानाने पहिले तर फक्त ७ सरदार त्याच्या दिशेने वेगाने दौडत येत होते. हे ७ हि जण वाऱ्याच्या वेगाने आणि आवेशाने खानाच्या सैन्यात दाखल झाले आणि समोर येईल त्याला ठार करत सैन्याची फळी चिरून ते पुढे जात होते. शेवटी १२,००० सैन्यापुढे ७ जणांचा काय निभाव लागावा मंडळी. एकेक सरदार अंगावर वार झेलत धारातीर्थी पडत होता आणि अखेर स्वतः प्रतापराव देखील धारातीर्थी पडले.

निष्ठा

या झालेल्या प्रकाराला काय म्हणावे तेच समजत नाही. निष्ठा काय असते हे प्रतापरावांनी आणि त्या ६ वीरांनी सिद्ध केले. प्रतापरावांसोबत जे ६ वीर सरदार पुढे आले त्यांची नावे; विठ्ठल अत्रे, कृष्णाजी भास्कर, विठोजी, दिपोजी राऊतराव, सिद्दी हिलाल आणि विसाजी बल्लाळ अशी होती. हे ७ वीर काळाच्या पडद्याआड गेले असले तरीही इतिहासाच्या पडद्यावर ते नेहमीच झळकत राहतील असेच त्यांचे शौर्य आहे. याच त्यांच्या शौर्याचे वर्णन करण्यासाठी वेडात मराठे वीर दौडले सात हे गाणं लिहिलं आणि गायलं देखील गेलं. या गाण्यामुळे देखील या ७ वीरांची आठवण नेहमीच सर्वाना येत राहील.

शिवरायांना प्रतापराव आणि इतर ६ सरदार गेल्याच्या बातमीने चक्क स्वतःची एक बाजू निकामी झाल्यासारखं वाटलं. महाराजांच्या रागाने खजील होऊन, स्वराज्यासाठी आणि शिवरायांसाठी प्रतापरावांनी आपल्या जीवाची देखील परवा न करता शर्थीने लढत दिली. आपले राजे आपल्यावर खफा आहेत हि भावनाच त्यांच्यासाठी किती विषारी होती आणि शिवरायांनी आपल्या बद्दल मनात असलेला राग नाहीसा करावा या एका आशेपोटी प्रतापरावांनी कमालच केली.

Source – इतिहासाच्या पानातून

शिवराय नेहमी म्हणायचे कि सैनिकाला स्वामीभक्ती तर येतेच परंतु, स्वामी कुणाला म्हणावं हे अनेकांना माहित नसतं. प्रतापराव गुजरांनी मात्र या दोन्ही वाक्यावर स्वतःला सिद्ध केलं. कुणाला स्वामी म्हणावं हे देखील प्रतापरावांनी अचूक समजून घेतलं आणि आपल्या स्वामीसाठी वेळप्रसंगी जीवही पणाला लावून आपली स्वामिनिष्ठा देखील सिद्ध केली.

प्रतापराव आणि त्या ६ वीर सरदारांना आदरांजली म्हणून नेसरी, कोल्हापूर येथे त्यांच्या आठवणीत एक स्मारकदेखील उभारण्यात आले आहे. हे स्मारक नेहमीच आपण सर्वांना स्वामीनिष्ठेची व्याख्या शिकवत राहील आणि त्या ७ वीर सरदारांच्या पराक्रमाची आपल्या मनात आठवण ठेऊन जाईल.

50 Comments
  1. नंदकुमार रामचंद्र शिंदे says

    ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे लेख वाचून खूप आनंद झाला. असेच लेख वाचायला आवडतील, पुस्तकापासून दूरचे दाखविणारे अशा प्रकारचे लेखन अपेक्षित आहे.

    1. Sani says

      nesri la nahi kay umrani taluka jath jilha sangli ya gavi ghadleli ghatna aahe, tithe senapati prataprao gujar yanche smarak aahe, yeun paha

      1. Aryan Patil says

        ही घटना नेसरी येथील सावतवाडी उर्फ गावठाण तालुका गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर येथीलच आहे

        1. Aryan Patil says

          मी नेसरीचाच आहे आमच्या इथे सरसेनापती प्रतापराव गुजर यांवर भव्य स्मारक आहे वेळ भेटला तर एकवेळ बघून जा

          1. InfoBuzz says

            आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
            पोस्ट आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका.

          2. सुहास गुजर says

            मी प्रताप रावांचा वंशज आहे माझे खापर पणजोबा, खंडेराव गुजरांचा एक मुलगा खंडेराव, त्याचा मुलगा संभाजी, संभाजी ची दोन मुले शेट्याजी आणि महादजी, महादजी नागपूर ला गेले शेट्याजी ला दोन मुले खंडेराव व प्रतापराव

        2. InfoBuzz says

          आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
          पोस्ट आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका.

      2. amar says

        yes

    2. पाटील says

      खुप उद्बोधनपूरक माहिती…
      अप्रतिम…
      नमन निष्ठावान मावळ्यांना.
      जय जिजाऊ जय शिवराय.

  2. सुनील एकनाथ वायाळ says

    अतिशय सुंदर माहिती मिळाली आहे ..धन्यवाद.

  3. Ranjeet jadhav says

    बेहलोल खान हा आदिलशाही सरदार होता मुघलांचा नाही

    1. Akash Raskar says

      नीट वाचल का तुम्ही

  4. राजु कटके says

    खरच मनाला स्पर्श करणारी पोष्ट आहे
    खूप खूप धन्यवाद

  5. देशमुख आकाश प्रकाशराव says

    सहा सरदाराची नावे चुकीची आहेत ,
    कृष्णाजी भास्कर महाराजांनी हातानी मारला होता
    अफजलखान वधाच्या वेळी

  6. Mangesh Masram says

    Historical information, prataprao gurjar is great Maratha in history, I like that

    1. Swapnil Shinde says

      7 veer yodhyan madhe “Vithoje asa nav lihila ahe tyancha purna nav “Vithoje Shinde” ahe.

      1. InfoBuzz says

        आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
        पोस्ट आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका.

  7. Pramod Bhadrige says

    Very amazing, beautiful and real story…

    Salute to 7 stars with all my Maratha soldiers…

  8. Sammy Belose says

    Proud to be a Maratha..????????

  9. Abhishek ashok suryawanshi says

    धन्य ती स्वामीनिष्ठा ???????????????? धन्य ते पराक्रमी 7 सरदार हा दैदीप्यमान इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून पुढे यावा….. हि विनंती ???????????? जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ????????????????????????

  10. Santosh Shinde says

    खरच खुप छान अत्यंत मनाला भेडसावणारी माहिती दिल्या बद्दल धन्यवाद ????

  11. शिव सोनवणे says

    प्रथमतः धन्यवाद व् अश्या लेखांची व् इतिहास समजन्यचि गरज आहे

  12. Dattaprasad says

    Mast 1 no

  13. Pravin Ghodke says

    दुःख या गोष्टींचं वाटत कि एवढा पराक्रमी इतिहास आपल्याला शिकविल्या जात नाही
    जय जिजाऊ जय शिवराय

  14. पाटील गौतम सर्जेराव says

    खुप उद्बोधनपूरक माहिती…
    अप्रतिम…
    नमन निष्ठावान मावळ्यांना.
    जय जिजाऊ जय शिवराय.

  15. Pravin navre says

    Mast kauuuu…awesome..thodkyat pn cgli ashi mahiti..milali…great work kauuuu broo..

  16. सचिन नाचणेकर says

    खूपच छान माहिती आहे।।

  17. Ankush Adsul says

    खूपच छान माहिती दिली त्या बद्दल आभारी आहोत

    1. राजेंद्र सोनवणे says

      हा इतिहास शाळेत शिकवला पहिजे कदाचित भावी पिढी ला निष्ठा समजेल, पुढे कोन जर राजकारणातआलातर तो पक्षाशी व देशाशी इमानदार राहि

      1. InfoBuzz says

        आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
        पोस्ट आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका.

  18. Dada bathe says

    जय भवानी
    जय शिवराय
    जय शंभुराजे
    जय जिजाऊ
    जय महाराष्ट्र …..

  19. अभिमान पाटील says

    छान व स्तुत्य उपक्रम.
    आजच्या पिढीला ऐतिहासिक माहितीचा खजिना हा पुरवलाच पाहिजे.

  20. बाळासाहेब साखरे पाटील says

    अटकेपार झेंडा लावणारे मराठे .
    ह्या विषयावर माहिती पाठवा……

    1. InfoBuzz says

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
      पोस्ट आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका.

  21. Abhay Singh Dadarkar says

    I m proud to be married hatthaa.i salute Raani

    1. InfoBuzz says

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
      पोस्ट आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका.

  22. Abhay Singh Dadarkar says

    Proud to be marr hatthaa

    1. InfoBuzz says

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
      पोस्ट आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका.

  23. अक्षय राजे says

    मस्त…अशी माहिती वाचायला खूप भारी वाटतं

    1. InfoBuzz says

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
      पोस्ट आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका.

  24. Karan Mohite says

    प्रतापराव गुजर हे साताऱ्यातील खटाव तालुक्यातील भोसरी गावचे होते, मी ही त्याच तालुक्यातील आहे

    1. InfoBuzz says

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
      पोस्ट आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका.

  25. नितीन पोफळे says

    सुंदर लेखन अंगावर शहारे आणणारा प्रसंग …सलाम नरविराना

    1. InfoBuzz says

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
      पोस्ट आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका.

  26. Tushar borage says

    हा लेख वाचुन अक्षरशहा डोळ्यातून पाणी आल…
    स्वमिनीष्टा म्हणजे काय.. ह्याचे एक बेजोड उदाहरण आहेत हे 7 वाघ…. जय जिजाऊ.
    जय शिवराय….

  27. shyam mahure says

    थैंक यू. हि माहिती मला माहित नव्हती.
    पराक्रमाची पराकाष्ठा यालाच म्हणतात.

  28. विलास सुर्वे says

    शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मराठा वीरांचा इतिहास अभ्यासक्रमात असला पाहिजे,
    शिवाजी महाराजांनी उभारलेले हे हिंदवी स्वराज्य आणि
    अनेकांनी दिलेली बलिदान समोर आले पाहिजेत।
    प्रतापराव गुजर, वीर तान्हाजी, बाजीप्रभू, संताजी, धनाजी, अशा अनेक वीरांचा पराक्रम समोर आला पाहिजे,
    अशा वीर अजरामर मर्दाना मानाचा मुजरा,????????????
    छत्रपती शिवाजी महाराज की जय????????

  29. vijay says

    खूपच छान माहिती आहे

  30. अजित मोहिते says

    जसा तानाजी मालुसरे यांच्या यशोगाथेवर आधारित चित्रपट काढला तसाच चित्रपट या स्वामीनिष्ठ मावळ्यांच्या यशोगाथेवर आधारित चित्रपट काढायला हवा

  31. Dattatray Jagadale says

    Nice

Your email address will not be published.