Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

केवळ किल्ल्याच्या दुर्गरचनेमुळे शत्रूला जेरीस आणणारा स्वराज्याचा दुर्ग

इंग्रज, पोतुगीज आणि डच यांच्या तोफांचा महाभयंकर मारा खाऊनही आपल्या किल्ल्याचा एकही दगड जागचा हालू दिला नाही, असा दुर्ग ….

मराठा आरमाराची विजयी गाथा सांगणारा ‘घेरिया’ म्हणजेच ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला, यालाच कोकण किनारपट्टीवरील शान! असेही म्हणतात. बलाढय़ किल्ले विजयदुर्ग मराठा आरमार मध्ये इंग्रजांच्या डोळ्यांत खुपत असे. म्हणूनच इंग्रजांनी अतिशय गुप्तपणे काळोख्या रात्री ‘ऑपरेशन विजयदुर्ग’ मोहीम आखली आणि तोंडावर पडले. किल्ला मराठा आरामारामध्ये आल्यानंतर छत्रपती शिवरायांनी चिलखती तटबंदी उभारताना ही पाण्याखालील चौथी तटबंदीही बांधून घेतली होती. नंतर चौकशी झाली तेव्हा लक्षात आले याच अदृश्य अश्या तटबंदीला इंग्रजांच्या युद्धनौका धडकल्या आणि बुडाल्या.

फक्त किल्ल्याच्या दुर्गरचनेमुळे शत्रूला जेरीस आणणारा “किल्ले विजयदुर्ग” केवळ फितुरीमुळे पेशव्यांच्या मदतीने आंग्रेंचा पाडाव करून इंग्रजांकडे गेला. इंग्रजांना ह्या किल्ल्याची एवढी आस होती कि, किल्ला जिंकल्यानंतर पेशव्यांसोबत झालेल्या तहानुसार किल्ल्याच्या बदल्यात बाणकोट जवळची दहा गावे द्यायला सुद्धा इंग्रज तयार होते. असाहा विजयी झेंडा फडकवणारा विजयदुर्ग म्हणजे जलदुर्गाचा बादशहाच जणू होता.

मराठा आरमार, घेरिया, विजयदुर्ग किल्ला, किनारपट्टीवरील शान, शिवाजी महाराज, दिंडी दरवाजा, कान्होजी आंग्रे, Infobuzz Marathi, Shivaji Maharaj Kille, Maratha Armar, Vijaydurg killa, Kanhoji Angre, Dindi Darwaja, Shivaji maharaj information

१२ शतकात शिलाहार घराण्यातील राजा भोजची या भागात सत्ता होती आणि त्यानेच कोकण प्रांताचा मुख्याच्या देखरेखीखाली इ.स. ११९५ ते १२०५ या कालावधीत घेरिया किल्ल्याचे बांधकाम केले. काही कालावधीनंतर किल्ल्यावर देवगिरीची यादवसत्ता आली. यादवसत्तेनंतर विजयनगरचे सम्राट, बहामनी सुलतान आणि विजापूरची आदिलशहि किल्ल्याने पहिली. इ.स. १६५३मध्ये विजय संवत्सर चालू असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून हा किल्ला जिंकून घेतला आणि पूर्वीच्या घेरियाचा ‘विजयदुर्ग’ झाला. याला जिभी या नावानेदेखील ओळखले जाई. छत्रपातीं राजाराम आणि ताराराणी यांचे पुत्र शिवाजीराजे यांनी १७०७ मधील पत्रात किल्य्याचा जिभी असा उल्लेख केला आहे.

शिवरायांनी जिंकल्यानंतर सभोवती चिलखती तटबंदी उभारली आणि ५ एकरात वसलेला किल्ला क्षेत्रफळाने १७ एकर १९ गुंठे झाला. किल्य्याच्या डागडुजीमध्ये महाराजांनी तब्बल २७ भक्कम बुरूज बांधले यातील तीन बुरूज तिमजली आहेत. किल्ल्याची सुरुवात होते ती गोमुख दरवाजापासून, शिवाजी महाराजांनीच या गोमुख दरवाजाची बांधणी डागडुजींदरम्यान केली.

आज आपण पाहताना किल्ल्याच्या तिन्ही बाजूने पाणी असल्याचे आपल्याला दिसते पण पूर्वी किल्ल्याच्या चारही बाजूने पाणी होते. कुणी प्रवेश करू नये म्हणून मुख्य दरवाज्यासमोर समुद्रकिना-यापर्यंत एक खंदक खणलेला होता आणि त्या खंदकात समुद्राचे पाणी सोडले जात असे. यामुळे तटाला भिडणे शत्रूला अधिकच कठीण जात होते. खंडकावरील पूल रात्री काढल्यानंतर किल्य्यासोबतचा संपर्क तुटत असे. नंतर महाराष्ट्र सरकारने पर्यटकांच्या सोयीसाठी मातीचा भराव टाकून हा रस्ता करण्यात आला.

शत्रूने कितीही महाभयंकर तोफांचा मारा केला तरी आत पोचत नसे याचे कारण होते “दिंडी दरवाजा” दरवाजाची रचनाच अशी होती कि ती शत्रूला जेरीस आणत असे. आजही अनेक शत्रूंनी केलेल्या तोफांच्या माराच्या खुणा तटबंदीवर दिसून येतात. त्याकाळी सायंकाळी सहानंतर मुख्य प्रवेशद्वार बंद करत असत आणि त्यानंतर येणा-या सैनिकांना दिंडी दरवाजातून प्रवेश मिळे. शत्रूची चाहूल लागली अथवा महत्त्वाची बोलणी करण्यासाठी किल्ल्यावर खलबतखान्याची रचना वास्तुशास्त्राचा अभ्यास करून करण्यात आली. यामुळे गुप्त बोलणी बाहेर अजिबात ऐकायला येत नसत.

मराठा आरमार, घेरिया, विजयदुर्ग किल्ला, किनारपट्टीवरील शान, शिवाजी महाराज, दिंडी दरवाजा, कान्होजी आंग्रे, Infobuzz Marathi, Shivaji Maharaj Kille, Maratha Armar, Vijaydurg killa, Kanhoji Angre, Dindi Darwaja, Shivaji maharaj information
Source – tripadvisor.com

विजयदुर्ग किल्ल्यावर सादर नावाचे ठिकाण आहे जिथे दरबार भरत असे. सदर आयताकृती आहे आणि याच वैशिष्ठ असं आहे कि अगदी शेवटच्या सैनिकालाही स्पष्ट आवाज ऐकू जातो. याचबरोबर ‘खूब लढा तोफा बारा’ बुरूज, भवानी मातेचं मंदिर, पेशवेकालीन वाडय़ाकडे जाणारे भुयार, सैनिकांची निवासस्थाने आजही आपल्याला ऐतिहासिक पराक्रमाची आठवण करून देतात.

फक्त किल्ल्याच्या दुर्गरचनेमुळे शत्रूला जेरीस आणणारा “किल्ले विजयदुर्ग” केवळ फितुरीमुळे पेशव्यांच्या मदतीने आंग्रेंचा पाडाव करून इंग्रजांकडे गेला. पण किल्ला इंग्रजांकडे जाईपर्यंतचा म्हणजेच १७५६ पर्यंतचा इतिहास आपण जाणून घेतला तर आजही मराठय़ांच्या पराक्रमाने अंगावर रोमांच उभे राहतात. कान्होजी आंग्रे यांनी कोकणात आपली राजकीय कारकीर्द छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर आणि छत्रपती शंभूंच्या काही कालावधीतील धामधुमीची कारकीर्द संपल्यावर सुरू केली. त्यांचे परकीय सत्तेसोबत कधीच जमले नाही

परकीय सत्ता इंग्रज, पोतुगीज आणि डच यांच्या तोफांचा महाभयंकर मारा खाऊनही आपल्या किल्ल्याचा एकही दगड जागचा हालू दिला नाही, असा दुर्ग म्हणजेच विजयी विजयदुर्ग!…


3 Comments
  1. Vinayak Gholkar says

    Nice

  2. pratik salunke says

    Eakdam mast. Jay Shiv chatrapati.

  3. Sumit Dalvi says

    Mast mahiti

Leave A Reply

Your email address will not be published.