Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

या देशांमध्ये बंदी असलेल्या गोष्टी बघितल्यावर तुम्ही पण बुचकळ्यात पडाल

आपण कायम असे ऐकतो आणि बोलत असतो की, अमुक-अमुक भागात हे करायला बंदी आहे किंवा असे केल्यास दंड किंवा शिक्षा होते. बऱ्याच देशांमध्ये विचित्र कायदे असतात जे ऐकून आपल्याला अगदी हसू अनावर होते. पण जे लोक कायम फिरस्तीवर असतात त्यांना ही माहिती उपयोगी पडू शकते आणि आपल्याला कुतूहल म्हणून काही तरी नवीन ज्ञानात भर !

आपल्या शेजारी देशात पाकिस्तान मध्ये अनेक विचित्र कायदे, फतवे रोज निघत असतात. त्यातीलच एक म्हणजे पंजाब प्रांतातील लहान मुलांच्या नृत्या वर बंदी. खरे तर लहान मुलांच्या नृत्यातुन निरागसतेचे दर्शन होते, त्यांचा विकास होत असतो. पण ह्यांच्या मते सार्वजनिक ठिकाणी नृत्य म्हणजे अनैतिक, शाळांमध्येही हा नियम आहे आणि जी शाळा हे नियम मोडेल तिचा परवानाच रद्द करण्यात येतो.

समोसा

weird laws, craziest laws in the world, top 100 weirdest laws, weird laws in the world, strange laws, Samosa banned in Somalia, weird laws in Singapore, Malaysia, North Korea Laws, strange laws in japan, विचित्र कायदे, सिंगापूर, मलेशिया, उत्तर कोरिया
Samosa is banned in Somalia (Source – theindianfacts.com)

आता आपल्याला वाटेल समोस्या वर बंदी घालण्या सारखं काय आहे, आरोग्यासाठी असेल का ? तर नाहीच मुळी, सोमालिया मध्ये समोसा करणे, तळणे, विकणे, खाणे यावर बंदी आहे, कारण आहे त्याचा आकार ! समोसा त्रिकोणी त्याचे तीन टोके म्हणजे ईसाई धर्माची आठवण करून देतात असे सोमालियाच्या उग्रवाद्यांना वाटते म्हणून ह्या खाद्य पदार्थावर चक्क बंदी आहे.

चुइंग-गम

बरेच जण तोंडाच्या आरोग्यासाठी, तोंडाला दुर्गंधी येऊ नये, चेहेर्यावरची चरबी कमी करण्यासाठी कायम चुईंग गम चावत असतात. पण सिंगापूरला हे मान्य नाही. १९९२ मध्ये एकदा चुईंग गम मुळे सिंगापूरमध्ये खुप मोठा ट्राफिक जॅम झाला होता, तेंव्हा पासून तिथे चुईंग गमला बंदी आहे.

पिवळा कपडा

weird laws, craziest laws in the world, top 100 weirdest laws, weird laws in the world, strange laws, Samosa banned in Somalia, weird laws in Singapore, Malaysia, North Korea Laws, strange laws in japan, विचित्र कायदे, सिंगापूर, मलेशिया, उत्तर कोरिया
Malaysian government bans yellow Tshirts (Source – Mirror)

२०१५ साली मलेशिया येथील एका सरकार विरोधी गटाने निदर्शने करण्यासाठी, पिवळे टीशर्ट घातले होते. त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने पिवळ्या कपड्यात दिसल्यास अटक आणि दंड जाहीर केला. अजूनही तेथील सरकारी कार्यालयात जाताना पिवळे कपडे घातलेले चालत नाहीत.

निळी जिन्स पॅन्ट

जीन्स पॅन्ट ती पण निळी, सगळ्यांचीच अगदी जीव कि प्राण असते, कोणत्याही रंगाचा शर्ट, टी शर्ट छानच दिसतात त्यावर. पण ह्या पॅन्ट वरच बंदी आहे ती उत्तर कोरिया मध्ये. कारण निळी जिन्स मुळे त्यांना आठवण येते ती म्हणजे अमेरिकेची आणि त्यांनी केलेल्या हल्ल्याची. तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रंगाची जीन्स उत्तर कोरियात घाला पण निळी नाही !

सकाळचे जॉगिंग

weird laws, craziest laws in the world, top 100 weirdest laws, weird laws in the world, strange laws, Samosa banned in Somalia, weird laws in Singapore, Malaysia, North Korea Laws, strange laws in japan, विचित्र कायदे, सिंगापूर, मलेशिया, उत्तर कोरिया
Jogging in Burundi is Act of war (Source – outsideonline)

अरे ह्याला काय अर्थ आहे, आरोग्यासाठी सकाळी उठून सगळे फिरायला जातात त्यावर बंदी काय ? पण आफ्रिकेत बुरंडी ह्या देशात २०१४ साली जातीयवादी तेढ इतकी वाढली होती की सकाळी सकाळी लोक एकमेकांच्या समोर येऊन भांडायला लागत म्हणून सरकारला ही सक्तीची बंदी आणावी लागली.

मोठे केस

इराण मध्ये पुरुषांच्या कोणत्याही प्रकारच्या केसांच्या फॅशनला बंदी आहे. स्पाईक, पोनी, वेणी किंवा मोठे केस पुरूष ठेवू शकत नाहीत.

क्लब मध्ये डान्स

१९४७ पासून जपानची राजधानी टोकियो मध्ये क्लब मध्ये येऊन डान्स करायला बंदी आहे, हे एक प्रकारचे गैरवर्तन समजले जाते. आता काहिशी सूट आहे पण रात्री १२ च्या पुढे आजही कोणी क्लब मध्ये डान्स करू शकत नाहीत.

हॉटस्पॉट

भारतात आपण सर्रास एकमेकांचे वाय-फाय, हॉटस्पॉट, इंटरनेट वापरतो. एकमकांचे वायफाय वापरणे हे सिंगापूर मध्ये गुन्हा समजले जाते आणि चुकून कोणी कोणाशी वायफाय शेअर केलं तर त्याला ३ वर्षे तुरुंग आणि १०,००० डॉलर्सचा दंड भरावा लागतो.

मरणे

weird laws, craziest laws in the world, top 100 weirdest laws, weird laws in the world, strange laws, Samosa banned in Somalia, weird laws in Singapore, Malaysia, North Korea Laws, strange laws in japan, विचित्र कायदे, सिंगापूर, मलेशिया, उत्तर कोरिया
You are not allowed to die Medieval Town of Italy (Source – npr.org)

आता हे अतिशयोक्ती वाटले तरी इटली मधील एका शहरात मरायला बंदी आहे. कारण काय तर तिथे आजूबाजूला एकही स्मशान (grave-yard) नाहीये, बाजूच्या ज्या गावात स्मशान आहे तिकडेच जाऊन मरावे लागते !

अजब-गजब असले तरी नियम म्हणजे नियम आहेत, एकसे बढकर एक !

Leave A Reply

Your email address will not be published.