Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

चित्रपटाच्या शूटिंगनंतर हिरोईनच्या कपड्यांचे काय केले जाते ?

बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपण पाहिले असेलच की चित्रपटातील अभिनेत्री अनेक प्रकारचे कपडे परिधान करतात. काही काळापूर्वी एक चित्रपट येऊन गेला ज्यात ऐश्वर्या राय बच्चनने 125 प्रकारचे तर करीना कपूर-खानने एका चित्रपटात 130 प्रकारचे कपडे परिधान केले होते. पण, चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाल्यानंतर या कपड्यांचे काय केले जाते असा विचार तुम्ही कधी केला आहे का ?

एकदा शूटिंगमध्ये कपडे वापरल्यानंतर ते पुन्हा प्रॉडक्शन हाऊसमध्ये परत जातात. बर्‍याच वेळा या कपड्यांचा पुन्हा वापर केला जातो. यासाठी त्यात काही बदल केले जातात आणि नंतर ते पुन्हा वापरण्यात येतात. तसे बघतले असता हे कपडे बहुतेक तर कनिष्ठ कलाकार वापरतात.

अनेक चित्रपटांमध्ये वेशभूषा डिझाइन करणार्‍या आयशा खन्ना यांनी मिड-डेला सांगितले की, बंटी आणि बबली या चित्रपटात कजरा रे गाण्यात ऐश्वर्या रायने परिधान केलेला ड्रेस २०१० मध्ये बॅण्ड बाजा बारात या चित्रपटातील कलाकारांनी परिधान केला होता, पण त्यात चोली आणि घाघरा यांच्यात बदल करण्यात आला होता.

bollywood, costumes, auction, charity auction, movies, dress, bunty aur babli, aishwarya rai, कॉस्ट्यूम, लिलाव, बॉलिवूड, मुव्हीज
Kajra re song from Bunty aur Babli (Source – myvantagepoint)

बऱ्याच वेळा कलाकार ते कपडे आपल्या सोबत नेतात

असे नाही की प्रत्येक ड्रेस परत प्रॉडक्शन हाऊसला दिले जातात. काहीवेळा कलाकार त्यांना आवडलेले कपडे आपल्या सोबत घरी घेऊन जातात. आयशा खन्ना यांनी सांगितले की, ‘अभिनेते बहुतेक वेळा त्यांचे आवडते कपडे किंवा सामान घरी घेऊन जातात. दीपिका पदुकोणने ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटात नैना या व्यक्तिरेखेने वापरलेला चष्मा ठेवला होता. त्याचवेळी ऋषी कपूरबद्दल असे म्हणतात की ते आपल्या चित्रपटात वापरलेले स्वेटर आपल्या बरोबर घेऊन जातात.

बर्‍याच वेळा लिलाव होतो

बर्‍याच वेळा नायक किंवा नायिका यांच्या कपड्यांचा लिलाव होतो, ज्याला चॅरिटी लिलाव म्हणूनही ओळखले जाते. एका चित्रपटात सलमान खानने वापरलेला टॉवेल लिलावाद्वारे एका चाहत्याने एक लाख 42 हजार रुपयांमध्ये विकत घेतला होता, जो नंतर दान केला गेला. अशा अनेक स्टार्सच्या कपड्यांचा लिलाव झाला आहे.

अनेक वेळा प्रॉडक्शन हाऊस अशा ठिकाणावरून कपडे आणतात कि शूटिंगनंतर ते कपडे परत घेतल्या जातील. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या शूटिंगनंतर ते कपडे परत घेतात आणि ते इतरत्र विकतात. हे कपडे लग्न किंवा कोणत्याही समारंभासाठी अधिक वापरले जातात.


आपण लेखक आहात, लिहिण्याचा छंद आहे किंवा इतर कोणतीही माहिती आमच्या सोबत शेअर करण्यासाठी Uniksone94@gmail.com वर ई-मेल करा.

Leave A Reply

Your email address will not be published.