Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

जेसीबी’चा रंग पिवळाच का असतो ?

अनेकांना हा प्रश्न वाचल्यानंतर याची जाणीव झाली की जेसीबी म्हणजेच अर्थमूव्हर्सचा रंग पिवळा असतो आणि मग याचं उत्तर वाचण्याची ईच्छा. आपल्या आजूबाजूला अश्या अनेक गोष्टी आहेत त्यामागे काहीतरी विशिष्ट कारण असते. पण दररोजच्या जीवनात आपण त्याला फार महत्व न देता त्यावर विचार करत नाही. असो आपण जेसीबी’चा रंग पिवळाच का असतो ? या आपल्या मूळ मुद्याकडे वळू…

सरळ सरळ सांगायचं म्हंटले तर हा रंगाचा आणि आपल्या डोळ्यांचा खेळ आहे. हा खेळ नीट समझून घायचा असेल तर आपल्याला VIBGYOR तरंगलांबी (wavelength) टेबल सोबत थोड्या उदाहरणांनाचा अभ्यास करावा लागेल.

जेसीबी'चा रंग पिवळाच का असतो, जेसीबी, तरंगलांबी, VIBGYOR, why jcb colour is yellow in marathi, JCB Yellow Color Scheme, Infobuzz GK
Source – ElProCus

इथे दिलेल्या टेबलमध्ये नीट पहा, पिवळा – 570 एनएम (नॅनोमिटर), केशरी – 590 एनएम (नॅनोमिटर) आणि लाल – एनएम (नॅनोमिटर) या तरंगलांबी दिसतील. आता तुम्ही म्हणाल की या तरंगलांबी वैगरेचा आणि जेसीबीच्या पिवळ्या रंगाचा काय संबंध ? तर त्यासाठी आपल्या एक उदाहरणाचा अभ्यास करावा लागेल.

नीट समजण्यासाठी आपण शाळेचे उदाहरण निवडू. समजा शाळेत शिक्षक तुम्हाला शिकवत आहेत आणि ते फळ्यावर काहीतरी लिहीत आहेत. समाज एकाच वाक्य शिक्षकांनी निळ्या आणि लाल या दोन्ही खडूनी लिहिले आहे. आता तुम्ही समोरच्या बाकावर बसला असाल तर दोन्ही रंगात लिहिलेले वाक्य वाचण्यास त्रास होणार नाही. पण समजा तुम्ही शेवटच्या बाकावर बसला आहेत तर निळ्या रंगातील शब्द वाचण्यास तुम्हाला थोडा त्रास होईल त्या तुलनेत लाल रंगाच्या खडूने लिहिलेले शब्द तुम्ही कोणत्याही अडथळ्यांविना सहज वाचू शकाल.

पण का? डोळे तेच, फळा तोच पण रंग वेगळा. तर याच्यामागचं असणारे कारण आहे त्या रंगाची तरंगलांबी. निळ्या रंगापेक्षा लाल रंगाची तरंगलांबी जास्त आहे आणि जेवढी जास्त तरंगलांबी तेवढी जास्त दृश्यमानता. सगळ्या रंगामध्ये लाल रंगाची तरंगलांबी जास्त आहे त्यापाठोपाठ केशरी आणि मग पिवळा. वर दिलेल्या फोटो मधील पट्टी तुम्हाला पाहतच समजली नसेल पण आता तुम्हाला समजलं असेल ती तरंगलांबी म्हणजे काय आणि त्याचा दृश्यमानते सोबत काय संबंध.

शेवटी काय तर जेसबी स्पष्टपणे दिसावा म्हणून ज्यादा तरंगलांबी असणारा रंग त्याच्यासाठी वापरने सरकारच्या धोरणानुसार बंधनकारक आहे. हा नियम फक्त जेसबी साठीच नव्हे तर अनेक अवजड वाहनांचा समावेश आहे. क्रेनच सोबतच प्रचंड मॉक ट्रक, अर्थ मूव्हर्स आणि डोजर्स/रोलर्स सुद्धा पिवळ्या रंगमध्येच असतात.

जेसीबी'चा रंग पिवळाच का असतो, जेसीबी, तरंगलांबी, VIBGYOR, why jcb colour is yellow in marathi, JCB Yellow Color Scheme, Infobuzz GK
Source – FreeImages.com

याच थेरीचा भाग म्हणून रस्त्यावर असणाऱ्या सिग्नल यंत्रणेमध्ये लाल, केशरी आणि हिरव्या रंगाचा वापर केला जातो. लाल रंगाची तरंगलांबी अतितीव्र असल्याने तो डोळयांना लगेच नजरेत येतो. याचप्रमाणे रात्री अनेक रस्त्यावर लाईटची सोय असेलच अस नाही त्यामुळे ठराविक अंतरावर विशिष्ठ तंत्रज्ञान वापरून लाल रंगाची स्टिकर्स लावलेली असतात. यात दिशादर्शक वळणे असतात किंवा सूचना दिलेल्या असतात. यामुळे त्या गोष्टी अगदी स्पष्टपणे दिसतात याचा तुम्ही सुद्धा अनुभव घेतला असेलच.


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.