Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

निरोगी व आनंदी आयुष्य जगायचंय ? मग हि योगासनं नियमित करा

बदलत्या राहणीमानामुळे आज विविध समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. बदलत्या जीवनशैलीत मधूमेह आणि रक्तदाब या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण वैद्यकीय उपचाराबरोबरच योगाच्या मदतीने मधुमेह आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात आणता येतो.

आसन – ताडासन (tadasana), वज्रासन (vajrasana), मंडूकासन (mandukasana), त्रिकोणासन (trikonasana), वीरासन (virasana), सुप्त वज्रासन (supta virasana), अर्धमत्स्येद्रासन (ardhyamatsyendrasana), सूर्य नमस्कार (surya namaskar), गोमुखासन (gomukhasana), पवनमुक्तासन (pawanmuktasana), शलभासन (shalabhasana) आणि मर्कटासन (markatasana) हि आसने नियमित केल्यास आजारांवर निश्चित नियंत्रण आणता येऊ शकते.

yogasan, vajrasana, pawanmuktasana, yoga, Asana, पवनमुक्तासन, yogasan in marathi, आसन, योगासन
(Source – Patrika)

पवनमुक्तासनाचा अभ्यास – जमिनीवर पाठीवर रिलॅक्स झोपा. उजवा पाय गुडघ्यापासून दुमडा आणि तो दोन्ही हातांनी पकड, तसाच तो पाय छातीच्या दिशेने न्या. हि प्रक्रिया चालू असताना हळू श्वास घ्या आणि सोडा. त्यानंतर जमिनीवरचं डोकं वर करा आणि तुमचा उजवा पाय नाकापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. थोड्या वेळ ह्याच स्थितीत राहा आणि नंतर पूर्व स्थितीत परत या. हीच क्रिया तुमच्या डाव्या पायाबरोबर सुद्धा करा. दोन ते तीन वेळा हे आसन केल्यांनतर हळू हळू त्यात वाढ करू शकता.

प्राणायामाचे व प्राणायामाचे महत्व – उच्च रक्तदाबाचा रुग्ण ज्यांनी यापूर्वी कधी योगासने केली नाहीत ते प्राणायमपासून सुरुवात करू शकता. प्राणायाम अनेक पद्धतीने केला जातो. भस्रिका प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, प्रणव प्राणायाम, शीतली प्राणायाम असे प्राणायामाचे अनेक प्रकार आहेत. प्राणायामाचा मुख्य उद्देश प्राणशक्तीचे नियमन हे आहे. प्राण म्हणजे आपण जो ऑक्सिजन जी प्राणशक्ती आत घेतो आणि या प्राण शक्तीचे नियमन करण्याची क्रिया म्हणजेच प्राणायाम.

Leave A Reply

Your email address will not be published.