Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

मराठी बोधकथा : एकी हेच बळ

हिमाचलमधील “रामपूर” या गावामध्ये एक सुतार राहत होता. तो त्याच्या गावाजवळील जंगलामध्ये रोज लाकडं आणायला जात असे. ऐके दिवशी तो लाकडं आणायला जंगलात जात होता, जंगलात जात असताना त्याला एक कुत्रा खड्यात पडलेला दिसला. त्या सुताराने तातडीने त्या कुत्र्याला बाहेर काढले. तेव्हापासून सुताराला त्या कुत्र्याचा खूप लळा लागला. जेव्हा कधी तो सुतार त्या जंगलात जात असे, तेव्हा तो कुत्रा त्याला नेहमी भेटत असे. आणि कालांतराने जंगलातील इतर कुत्रीदेखील त्या कुत्र्याच्या मागे मागे जात त्या सुताराला भेटू लागली.

परंतु त्या जंगलातला चित्ता नेहमी या कुत्र्यांना त्रास देत असे. जंगलातील इतर प्राण्यांप्रमाणेच सगळी कुत्री या चित्त्यामुळे त्रस्त झाली होती. आणि हे सुताराला कळताच त्याने एक युक्ती सुचवली. ठरल्याप्रमाणे चित्ता त्या डोंगरपायथ्याशी आला. सगळी कुत्री वेगवेगळ्या ठिकाणावरून त्या चित्त्यावर भुंकायला लागली. इतक्या कर्कश आवाजाने चित्ता चवताळला आणि त्याने त्याचा समोर असलेल्या कुत्र्यावर झेप घेतली. तेवढ्यात तो कुत्रा बाजूला झाला आणि त्या कुत्र्याचा मागे खोदलेल्या खड्यात तो चित्ता पडला. आता तो चित्ता पूर्णपणे अडकला गेला होता. आणि याचीच संधी साधून सर्व कुत्र्यांनी त्या चित्त्यावर हल्ला केला व त्याला ठार मारले.

तात्पर्य – एकी हेच बळ


Leave A Reply

Your email address will not be published.