Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

मास्टर कार्ड, व्हिसा कार्ड आणि Rupay कार्ड यांच्यात नेमका फरक काय आहे ?

Mastercard, Visa आणि Rupay यांच्यातील फरक काय आहे? कोणते कार्ड सर्वाधिक चांगले आहे? आपण खरेदी करण्यासाठी सहसा डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर करतो. त्या कार्डवर मास्टर कार्ड, व्हिसा कार्ड, रूपे कार्ड असं लिहिलेले तुम्ही नक्कीच पाहीले असेल. तुम्ही नक्कीच विचार केला असेल कि याचा अर्थ काय आणि या तिन्ही कार्डमधला फरक काय असतो ? जर आपल्याला हे सर्व प्रश्न पडले असतील आणि आपल्याला जाणून घ्यायचे असेल कि यातले नेमके कोणते कार्ड आपल्यासाठी फायदेशीर आहे, तर हि माहिती जरूर वाचा.

जेव्हा आपण एखाद्या दुकानात किंवा मॉलमध्ये जातो आणि तिथे सामान खरेदी केल्यानंतर कार्डद्वारे आपण पैसे देतो, तेव्हा आपण आपले कार्ड एका मशीनद्वारे वापरतो, म्हणजेच आपण POS (पॉईंट ऑफ सेल) मशीनचा वापर करून ते बिल चुकते करतो. जेव्हा आपले कार्ड POS मशीनद्वारे जोडून दिले जाते, तेव्हा आपल्याला माहित नसते की त्यांचे (मॉल किंवा दुकानाचे) बँक खाते कोणत्या बँकेमध्ये आहे. ते आपले कार्ड मशीनवर स्वाईप करतात आणि आपला पासवर्ड आपण तिथे एंटर करतो.

अशा तर्‍हेने आपण त्यांना पैसे देतो. हे पैसे भरण्यासाठी, व्हिसा कार्ड, मास्टरकार्ड आणि रुपे कार्ड सारख्या कंपन्यांचे मुख्य योगदान असते. ह्या तीन कंपन्या बहुराष्ट्रीय वित्तीय सेवा प्रदान करतात. त्यांचे मुख्य कार्य, त्यांचे कार्डधारक आणि ग्राहक ह्यांचे पैसे कोणत्याही बँकेकडून कोणत्याही बँकेकडे हस्तांतरित करणे हे आहे. ह्या सर्व कंपन्यांनी बँकांशी करार केलेला असतो, त्यानुसार ह्या कंपन्या बँकांच्या नेटवर्कमध्ये जोडलेल्या असतात. त्यामुळेच आपण थेट एका खात्यातून दुसर्या खात्यात सहज पैसे पाठवू शकतो.

difference between mastercard and visa card, disadvantages of rupay card, difference between rupay and visa card and mastercard, which is better rupay or visa, rupay vs visa vs master, what is visa card, what is master card, what is rupay card, रूपे कार्ड, मास्टर कार्ड, व्हिजा कार्ड
Mastercard headquarters (Source – The Muse)

या सेवेचा वापर करून आपण कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढू शकतो किंवा कोणत्याही ठिकाणी आपण सहज पैसे भरू शकतो, तसेच कोणत्याही वस्तूची किंमत ऑनलाइनद्वारे देऊ शकतो. आता, मास्टरकार्ड, व्हिसा कार्ड आणि रुपे कार्ड यामधील फरक काय आहे ? हे जाणून घेऊ. ह्या तिन्ही कंपन्यांपैकी मास्टरकार्ड हि एक महत्वाची कंपनी आहे. मास्टरकार्ड हे अमेरिकेतील एक अमेरिकन बहुराष्ट्रीय वित्तीय सेवा निगम आहे. ही कंपनी १९७९ मध्ये इंटर बँक ट्रान्झॅक्शनसाठी स्थापन केली गेली.

सुरुवातीला फक्त अमेरिकन बँकांमध्ये मास्टरकार्डद्वारे आर्थिक सेवा दिली जात असे, पण आता ह्या प्रक्रियेद्वारे सध्या सुमारे १६० देशांना मास्टर कार्ड सेवा प्रदान करताना दिसते. ह्याचाच एक भाग म्हणून इतर कार्डे देखील वितरीत केले जात आहेत. जसे कि mastro card, cirrus card इत्यादी. हि सेवा प्रत्येक कार्डला वेगवेगळ्या कामासाठी वापरण्याची अनुमती प्रदान करते. उदाहरणार्थ, डेबिट कार्डसाठी मास्टर कार्ड सेवा, तसेच क्रेडिट कार्डसाठी cirrus card वापरले जाते.

भारतातील श्रीमंत व्यक्ती फिरतात ‘या’ गाड्यांमधून….

व्हिसा कार्ड ही सुद्धा एक अमेरिकन कंपनी आहे, जी मास्टरकार्ड सारख्या बहुराष्ट्रीय वित्तीय सेवा प्रदान करते. हिचे मुख्यालय अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील फोस्टर सिटीमध्ये आहे. व्हिसाद्वारे प्रदान केलेले डेबिट कार्डे जगाच्या बर्याच देशांमध्ये वापरले जाते. अनेक बँका आणि वित्तीय संस्था ग्राहकांना त्यांचे व्हिसा डेबिट कार्ड देतात. व्हिसा कार्ड व मास्टर कार्डप्रमाणेच रूपे कार्डसुद्धा जास्तीत जास्त हस्तांतरण सुविधा प्रदान करते. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने रूपे कार्डचे निर्माण केले आहे.

रूपे कार्डची ट्रान्सक्शन फिस हि व्हिसा आणि मास्टरकार्डच्या तुलनेत कमी असून, ट्रान्सक्शनसाठी लागणारी फीस व तुमच्या ट्रान्सक्शनची माहिती बाहेर देशात न जाता भारतातच सुरक्षित राहते. भारतीय अर्थव्यवस्थेला एकप्रकारे रूपे कार्डमुळे मदतच होत आहे. पण, जसे मास्टर आणि व्हिसा आंतरराष्ट्रीय सेवा प्रदान करताना आपल्याला दिसतात, तश्याप्रकारे रूपे कार्ड जगातल्या सर्व देशांमध्ये चालत नाही. रूपे कार्ड केवळ देशांतर्गत सेवांपुरतेच मर्यादित आहे. याचा अर्थ हे केवळ भारतातच वापरले जाऊ शकते.

भारतात “राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया” ने २०१२ मध्ये सुरक्षित आणि जलद व्यवहार करण्यासाठी या रूपे कार्ड सुरू केले. आज भारतातील प्रत्येक बँक ह्याचा वापर करताना दिसते. भारतासारख्या विशाल देशामध्ये आजवर केवळ व्हिसा व मास्टरकार्डची एकप्रकारे मक्तेदारीच होती, पण रूपे कार्डने ह्या दोन विदेशी कंपन्यांना तगडे आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. भारतामध्ये निर्मित रुपे कार्डने हळूहळू आपले हातपाय पसरले व आता व्हिसा व मास्टरकार्डला आपल्या ट्रान्सक्शन शुल्काबद्दल फेरविचार करण्यावाचून पर्याय उरणार नाही असे दिसते.

Leave A Reply

Your email address will not be published.