Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

मराठी बोधकथा : सभ्यता हीच श्रेष्ठ

एकदा नेपाळचे राजे वेषांतर करून इतर राज्यामध्ये फिरत होते. नारायणगाव” या गावामध्ये पंडित जण पैशासाठी जनतेला धर्माच्या नावाखाली लुबाडत आहे असे राजांच्या कानी आले. त्यांनी एक युक्ती सुचवली आणि त्या पंडितांना जाऊन म्हणू लागले कि, माझ्या आजोबांचे पिंडदान करा, मी दक्षिणा म्हणून मी घरून आणलेले लाडू देतो, मी खूप गरीब आहे माझ्याकडे पैसे नाहीयेत, कृपया करून तुम्ही या लाडूंचा स्वीकार करावा. पण पैशाचे लालची असलेल्या पंडितांनी राजाला साफ नकार दिला.

तेव्हा राजाला एक शेतकरी येऊन म्हणतो, तुला पिंडदान करायचं आहे ना तर तू भट पंडिताला जाऊन भेट ते या पंडितांसारखे अजिबात नाही कदाचित ते तुझे काम करतील. भट पंडित हे स्वभावाने खूप खूप चांगले होते. त्यांच्या या स्वभावामुळे आजूबाजूच्या गावातील लोक सुद्धा त्यांच्याकडेच येत असे. आणि हे पाहून इतर पंडित त्यांचावर इर्षेने बघत असे. तेव्हा नेपाळचे राजे त्या पंडितकडे गेले आणि त्यांना त्यांच्या आजोबांचे पिंडदान करावे अशी विनवणी केली तसेच दक्षिण म्हणून लाडू दिन असेही म्हटले. तेव्हा पंडित म्हणाले,”ठीक आहे बाबा, तू गरीब दिसतो पण तुझ्या इच्छेचा आणि प्रेमाचा मी मन ठेवतो आणि या लाडूंचा स्वीकार करतो.” हे ऐकून राजा खुश होतो आणि तो त्याचा हातातली लाडूची पिशीवी त्या पंडिताला देतो आणि सोबत म्हणतो कि,” हि पिशीवी तुम्ही घरी गेल्यावर उघडा.” असे बोलून राजा निघून जातो.

घरी गेल्यावर पंडित जेवायला बसतो आणि तेवढ्यात त्याला ती लाडूची पिशवी आठवते. तो त्याचा बायकोला ती पिशवी उघडायला लावतो. ती पिशवी उघडताच दोघेही चकित झाले कारण त्या पिशवी मध्ये सोन्याचे लाडू होते.


तात्पर्य – सभ्यता हीच श्रेष्ठ

Leave A Reply

Your email address will not be published.