Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

गुळाचा चहा चांगला कि साखरेचा ? गुळाच्या चहाचे फायदे काय आहेत ?

गुळाच्या चहाचे फायदे काय आणि तो बनवायचा कसा ?

महाराष्ट्रात चहा प्रेमींचं प्रमाण खूप मोठं आहे. आपल्याकडे कॉफी किंवा कोल्ड्रिंक पेक्षाही चहाला मोठ्या प्रमाणात पसंती दिली जाते. अगदी ग्रामीण भागात देखील चहा म्हणजे एक जीवनावश्यक पेय म्हणूनच बघितले जाते. चहाचे देखील अनेक प्रकार आहेत, अनेक ठिकाणी दूध न घालता चहा केला जातो.

शहरी भागात या चहाला ब्लॅक टी तर ग्रामीण भागात डिकाशन म्हणजे काळा चहा असं संबोधलं जातं. त्यासोबतच गुळाचा चहा (Jaggery Tea) देखील अलीकडे फारच प्रसिद्ध झाला आहे, त्याचं कारण म्हणजे हा चहा आरोग्यदायी असल्याचं सांगण्यात येतं. काय आहे यामागील वास्तव जाणून घेऊयात…..

जर तुम्ही चहा प्रेमी आहात तर दिवसाची सुरुवात ही चहानेच व्हायला हवी, बरोबर ना ? परंतु चहामध्ये साखर वापरल्यामुळे अनेक जण दिवसभरात किती चहा प्यायलो याचं गणित नक्कीच करत असतील. सगळीकडेच चहामध्ये साखर वापरायचा प्रघात आहे परंतु साखर आपल्या शरीरासाठी खरंच चांगली आहे का याचा विचारदेखील आपण करायला हवा, कारण साखरेचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्यामुळेच आजारी व्यक्तींसाठी आपल्याकडे साखरेला अनेक पर्याय उपलब्ध आहेत ज्याचा वापर आपण चहा बनवताना नक्कीच करतो, जसे की शुगर फ्री गोळ्या.

परंतु या सर्व गोष्टींना सर्वात चांगला पर्याय आहे म्हणजे “गुळाचा चहा” होय. तुमचे आरोग्य देखील चांगले राहते आणि तुम्हाला गोडीची चव देखील अनुभवता येते. साखर असा पदार्थ आहे ज्यावर अनेक रासायनिक प्रक्रिया केल्या जातात आणि हे मानवी शरीरासाठी घातक आहे. याउलट गूळ तयार करताना कमी प्रमाणात रसायने वापरली जातात आणि त्यावर प्रक्रिया देखील खूप कमी केल्या जातात. त्यामुळे गुळ हा साखरेला सर्वात चांगला पर्याय आहे आणि म्हणूनच आज-काल प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गुळाचा चहा देखील उपलब्ध आहे.

gulacha chaha benefits, jaggery tea benefits, jaggery tea benefits in marathi, jaggery tea vs sugar tea, jaggery tea recipe, gulacha chaha recipe, गुळाचा चहा फायदे, गुळाचा चहा रेसिपी
Jaggery tea benefits in Marathi

गुळाच्या चहाचे फायदे (Benefits of Jaggery Tea)

गुळाचा चहा हा आरोग्यासाठी नक्कीच साखरेच्या चहापेक्षा चांगला आहे कारण गुळामध्ये अतिरिक्त प्रमाणात विटामिन, मिनरल, फॉस्फरस, आयर्न, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतं. हिवाळ्यात शरीरामध्ये योग्य प्रमाणात गर्मी तयार करण्यासाठी देखील गुळ अत्यंत उपयोगी आहे.

तुमच्या पचनशक्ती साठी देखील गुळ उपयोगी ठरतो. मुख्यत्वे ज्या व्यक्तींना पोटाचे विकार आहेत त्यांच्यासाठी गुळ फायदेशीर आहे. जर तुमच्या दिवसाची सुरुवात गुळाच्या चहाने होत असेल तर ही गोष्ट तुमच्या पचन क्रिया साठी अत्यंत फायदेशीर आहे.

आपल्या सर्वांना माहिती आहे की गुळामध्ये आयर्नचे प्रमाण जास्त आहे. रोज गुळाचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त तसेच रक्तपेशी वाढण्यास देखील मदत होते. फुफ्फुसाची कार्यक्षमता देखील यामुळे वाढीस लागते.

गुळाच्या सेवनामुळे तुम्हाला वजन कमी करण्याचे देखील मदत होते. एका विशिष्ट प्रमाणात गुळाचे सेवन केल्यामुळे तुमच्या वजनात तुम्हाला फरक नक्की जाणवेल.

गुळाच्या चहा (Jaggery Tea) मध्ये जर तुम्ही आलं वापरलं तर त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यासोबतच तुम्हाला लहान-मोठे आजार म्हणजेच थंडी खोकला देखील होत नाहीत.

गुळ तुमच्या शरीरात सफाई एजंट म्हणून काम करतो आणि शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकण्यास देखील मदत करतो. जे घटक तुमच्या शरीराला हाणीकारक आहेत असे घटक गुळामुळे शरीराच्या बाहेर पडण्यास मदत होते.

गुळाचा चहा कसा बनवायचा (Jaggery Tea Recipe)

चहाच्या पातेल्यात पाणी घालून त्या मधे गुळ हा जास्त प्रमाणात घालावा आणि पाणी कमी घालावे. जर 1 कप चहा बनवायचा असेल तर कप भरून पाणी न घेता थोडे कमी घ्यावे म्हणजे गुळ घातल्यावर व्यवस्थित 1 कप चहा बनेल. गुळ पाण्यात विरघळलत आला की त्यात अर्धा चमचा चहापत्ती त्यासोबतच थोडसं कुटुन घेतलेलं आलं घालून त्यात शेवटी दूध घालावं. चहाला एक उकळी आली की गॅस बंद करावा व चहा गाळुन घ्या. दूध युक्त गुळाचा चहा करायचा असल्यास पाण्याऐवजी दुधाचा वापर करा.


Disclaimer – विविध तज्ज्ञांशी बोलून आरोग्यविषयक माहिती गोळा करण्यात आली आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ला असू शकत नाही. आपल्याला अति त्रास जाणवत असल्यास किंवा प्रयोग करण्याआधी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा.

Leave A Reply

Your email address will not be published.