Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

Navratri 9 Colors 2020 : नवरात्रीचे ९ रंग आणि त्यांचे महत्व

शारदीय नवरात्रीचा प्रारंभ झाला आहे. शक्तिच्या देवीची आराधनेला सुरूवात झाली आहे. घराघरात घटस्थापना केली जाते. घट स्थापन करताना त्यात टाकल्या जाणाऱ्या धान्याचे विशेष महत्व आहे. घटात पेरल्या जाणाऱ्या धान्याचे धार्मिक महत्व आणि आरोग्यदायी फायदे

आदिशक्तीची नऊ रूपे या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतात. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंद माता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री अशी ही नऊ रूपांची मनापासून आराधना केली जाते.

या नऊ दिवसांत देवीची आराधना करताना तिच्या आवडीच्या ९ रंगाची (Navratri Colors 2020) आठवण होतेच. हल्ली नवरात्रीच्या आधीपासूनच या नवरंगांची माहिती हल्ली प्रसारमाध्यमांतून सर्वांनाच कळते.

navratri colours 2020, navratri colours 2020 list, navratri colours 2020 in marathi, nine colours of navratri 2020, नवरात्रीचे नऊ रंग 2020, नवरात्री रंगाचे महत्व, navratri rang 2020
Navratri 9 Colors 2020

देवीची आराधना करणाऱ्या सर्व महिला याच रंगाचे कपडे परिधान करतात. देवीलाही याच रंगाची साडी नेसवली जाते. बघुयात नवरात्रीचे ९ रंग आणि त्या रंगांचे महत्व.

नवरात्रीचे ९ रंग 2020 (Navratri 9 Colors 2020)

(Oct 17) पहिल्या दिवशी शैलपुत्री या रूपाची आराधना केली गेली, त्या दिवशीचा रंग होता करडा. हा रंग वाईट गोष्टी नष्ट होण्याची गुणवत्ता दर्शवतो.

(Oct 18) द्वितीयेच्या दिवशी देवीचे रूप आहे ब्रह्मचारिणीचे. या दिवशीचा रंग आहे केशरी. हा रंग स्थिरचित्तता, तेजस्वी आणि ज्ञान यांचे प्रतीक म्हणून पाहिला जातो.

(Oct 19) तृतीयेच्या दिवशी देवीचे रूप आहे चंद्रघटा. देवीच्या या रूपाची आराधना करताना पांढरा रंग घालावा. पांढरा रंग हा शांतता, पावित्र्य, स्थिरता, शुद्धता यांचे प्रतीक आहे.

(Oct 20) चतुर्थीच्या दिवशी कुष्मांडा रूपात देवीची आराधना केली जाते. त्या दिवशीचा रंग आहे लाल. हा रंग उत्कटता, शुभ गोष्टींचा तसेच रागाचे प्रतीक आहे. दुष्टांचा संहार करण्यासाठी आवश्यक असलेला रंग म्हणून ओळखला जातो.

(Oct 21) पंचमीच्या दिवशी स्कंद माता म्हणजे कार्तिकेयाची माता. या रूपात देवीची पूजा केली जाते. त्या दिवशीचा रंग आहे निळा. निळा रंग हा दैवी उर्जेचे प्रतीक आहे.

(Oct 22) सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा बांधतात. त्या दिवशीचा रंग पिवळा आहे. हा रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतीक आहे.

(Oct 23) सातव्या दिवशीच्या दुर्गेचे रूप आहे कलारात्रीचे. त्या दिवशीचा रंग आहे हिरवा. हिरव्या रंग हा निसर्गाचा असतो. हा रंग निसर्गाची विविध रूपे आणि गुणांचे प्रतीक आहे.

(Oct 24) आठव्या दिवशी महागौरीचे पूजन केले जाते. त्या दिवशीचा रंग आहे मोरपंखी. हा रंग पूर्ण होणाऱ्या इच्छा आणि मनोकामनांचा असतो. अष्टमीच्या दिवशी घागरी फुंकल्या जातात.

(Oct 25) नवव्या दिवशी म्हणजे नवमीला सिद्धीधात्री रूपात दुर्गेची पूजा केली जाते. त्या दिवशीचा रंग आहे जांभळा. हा रंग महत्त्वाकांक्षा, लक्ष्य आणि उर्जा यांचे प्रतीक म्हणून पाहिले जाते.

नवरात्र हा शक्तीच्या आराधनेचा सण आहे. काही ठिकाणी अखंड नंदादीप, काही ठिकाणी नऊ दिवस फुलांच्या माळा तर काही जणांचे शेतावर कलश ठेवलेला असतो. परंतू देवीचे हे नवरात्रीचे नऊ रंग मात्र सर्वदूर समान आहेत.

नवरात्रीचे नऊ रंग (Navratri 9 Colors) चे महत्त्व आपल्या आयुष्यात अंगिकारूया आणि आयुष्य आनंदी, उर्जावान बनवूया. दर वर्षी मात्र प्रत्येक तिथीला तेच रंग येतील असेही नाही. कारण हे रंग दिवसाच्या वारावरून ठरवले जातात. त्यामुळे तिथी कोणत्या वाराला येते त्यावरून हे रंग ठरवले जातात.

Leave A Reply

Your email address will not be published.