Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

गर्लफ्रेंडच्या आई-वडिलांना पहिल्यांदा भेटायला जाताना ह्या गोष्टी नक्की पाळा

एक वेऴ प्रेमात पडणे सोपे, मात्र प्रिय व्यक्तीच्या पालकांसमोर जाताना भल्याभल्यांची तंतरते. बहुतांश वेळा ही भेट कशी टाळता येईल याकडेच कल असणारे अनेक जण आपल्या पाहाण्यात असतील.

कदाचित आपल्यापैकी काहीजण याच द्वंद्वात अडकले असतील. पण प्रेमात पडल्यानंतर पुढची पायरी जर लग्नाची असेल तर प्रेयसीच्या आईवडिलांना भेटल्याशिवाय, त्यांच्या होकाराशिवाय पुढे कसे जाणार. प्रेमविवाह करण्यापुर्वीचा हा मोठा कठीण भाग असतो आणि त्यातून तरून बाहेर पडायचे असते.

first meeting, girlfriend, meeting girlfriends parents, girlfriends dad, relationship tips in marathi, tips to meeting the parents, guys guide, गर्लफ्रेंड, प्रेयसी, आई वडिलांची भेट, रिलेशनशिप टिप्स मराठी

एकमेकांना समजून घेतल्यानंतर जेव्हा लग्न करायचे असे ठरवून प्रेयसीला पालकांना भेटायला जातेवेळी काही गोष्टी जरूर लक्षात ठेवा. ‘अति घाई संकटात जाई’ ही म्हण लागू होण्याआधी जरा सबुरीनेच घेतलेले बरे.

पहिल्याच भेटीत आपल्या मनातील गोष्ट बोलणे जरा घाईचे ठरेल आणि सगळाच बट्ट्याबोळ होईल. त्यासाठी प्रेयसीच्या किंवा गर्लफ्रेंडच्या घरी तिच्या आईवडिलांना भेटायला जाण्यापुर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा, नियोजन करा. त्यामुळे भविष्यात जेव्हा लग्नाचा प्रस्ताव मांडाल तेव्हा त्याला यश मिळण्याची शक्यता अधिक असेल.

गर्लफ्रेंडच्या आई-वडिलांना भेटायला जाताना ह्या टिप्स फॉलो करा (Tips for Meeting Your Girlfriend’s Parents)

मैत्रिणीच्या पालकांविषयी जाणून घ्या

मैत्रिण किंवा प्रेयसी कडून तिच्या आईवडिलांच्या स्वभावाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर एखाद्या सुट्टीच्या दिवशी निवांतपणे भेटा. त्यासाठी घरीच भेटायचे की बाहेर कुठे भेटायचे हे मैत्रिणीच्या आईवडिलांच्या मतानुसार ठरवा.

पहिल्यांदाच भेटता आहात त्यामुळे तिच्या आईवडिलांना काय भेट देता येऊ शकते याचाही विचार करा. मैत्रिणीच्या आईवडिलांना भेटायला जाताना फार शो ऑफ करायची गरज नसली तरीही कपड्यांची योग्य निवड करणेही महत्त्वाचे आहे.

पहिल्यांदाच भेटायला जाताना अगदीच गांभीर्य नाही असे वाटू नये पण त्यांच्यावर छापही पडली पाहिजे. त्यामुळे भेटल्यावर काय करायचे हेही आम्ही तुम्हाला सांगू.

भेटल्यावर काय कराल

मैत्रिणीच्या आईवडिलांना घरी, दारी, देऊळ, हॉटेल कुठेही भेटलात तरीही मोठ्यांचा मान राखण्याची पद्धत विसरू नका. त्यावरून आपले संस्कार दिसून येतात. त्यांना सामोरे गेल्यानंतर वाकून नमस्कार करावा. आपल्या आईवडिलांप्रमाणे मैत्रिणीच्या आईवडिलांना मान देणे काहीच वावगे नाही.

first meeting, girlfriend, meeting girlfriends parents, girlfriends dad, relationship tips in marathi, tips to meeting the parents, guys guide, गर्लफ्रेंड, प्रेयसी, आई वडिलांची भेट, रिलेशनशिप टिप्स मराठी

प्रेयसीच्या आईवडिलांशी बोलणे ही सोपी गोष्ट नाही. आपल्या लहान सहान गोष्टींकडे त्यांचे लक्ष असते. काही विशिष्ट सवयी, लकबी असतात, त्या दुसऱ्याला नावडू शकतात.

त्यामुळे मोठमोठ्याने बोलणे, हातवारे करून बोलणे आदी गोष्टी टाळाव्यात. सतत फोन हाताळणे, मोबाईल मध्ये डोके घालून बसणे टाळावे. शक्यतो त्या वेळेत फोनवर बोलूच नये. कारण त्यात बोलण्याचा वेळ वाया जाऊ शकतो. शिवाय समोरच्या व्यक्ती नाराज होऊ शकतो. टेबल मॅनर्सकडेही लक्ष द्यावे.

प्रश्नांना सामोरे जाताना

आपल्यावर मुलीचे पालक प्रश्नांची सरबत्ती करू शकतात. त्यासाठी तयारी असली पाहिजे. उगाच मोठ मोठ्या बाता मारण्यापेक्षा शॉर्ट अँड स्वीट पण खरी उत्तरे द्यावीत. मुलीचा बॉयफ्रेंड म्हणून त्यांनी लग्नाविषयी बोलणे केले तरच त्याला उत्तरे द्या, स्वतःहून काही सांगायला जाऊ नये.

पहिल्याच मुलाखतीत सर्व काही स्पष्ट बोलण्याची गरज असतेच असे नाही. त्यांना दोघांच्या लग्नाच्या इच्छेविषयी काही कल्पना नाही असे समजू नका.

मुलीचे पालक म्हणून काही गोष्टी त्यांना जाणून घ्याव्याशा वाटणारच. परंतू आपल्याकडील गाडी, घर, पगार तसेच बचत याविषयी बोलणे टाळलेलेच बरे. मैत्रिण त्याविषयी आईवडिलांशी बोलेल.

खानपानाच्या गोष्टी

आपण भेटायला गेल्यावर खानपानाच्या गोष्टी होतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पाहुणचार आपला होत असला तरीही समोरच्या व्यक्तीला खाण्याविषयी विचारावे. मगच स्वतः खायला सुरूवात करावी. ही सवय मुळातच चांगली आहे. त्यामुळे तिची सवय करावी.

निरोपाची वेळ

पहिल्यांदाच भेट होत असल्याचे प्रत्येक जण एकमेकांचा अदमास घेतात. त्यामुळे भेटीसाठी पुरेसा वेळ काढून जा. घाई करू नये. निरोप घेताना त्यांना रिक्षा किंवा कार पर्यंत सोडायला जावे. तसेच निघतानाही त्यांना नमस्कार करायला विसरू नका.

first meeting, girlfriend, meeting girlfriends parents, girlfriends dad, relationship tips in marathi, tips to meeting the parents, guys guide, गर्लफ्रेंड, प्रेयसी, आई वडिलांची भेट, रिलेशनशिप टिप्स मराठी

त्यांना भेटल्यावर बरे वाटले की नाही ते देखील जरूर सांगा. योग्य पद्धतीने निरोप घेणे महत्त्वाचे आहे. अन्यथा भेटीमध्ये एक अपुरेपणा जाणवतो.

या काही गोष्टी अगदी साध्या सोप्या आहेत, परंतू त्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत. एक साधी गोष्ट आहे की आपल्या आईवडिलांप्रमाणेच ते आहेत असे लक्षात घेतले तर वावरण्यात, बोलण्यात सहजता येईल. मोकळेपणाने बोलतानाही आदर ठेवला तर आश्वासक वाटण्यास मदत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.