Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

प्रदूषण आणि आजारांपासून वाचायचे असेल तर घरात मशीन लावण्यापेक्षा हि झाडे लावा

हि १० झाडे घरात लावल्यास विषारी घटक शोषून तुम्हाला शुद्ध ऑक्सिजन देतील, तेही अगदी फुकटात.

आपल्या सगळ्याचं जीवन धावपळीचं आणि घडाळ्याच्या काट्यावर चालणारे झाले आहे. प्रत्येकाच्या मागे, ऑफिस, व्यवसाय आणि टार्गेटचं टेन्शन असतेच. ऑफिसचा प्रवासाचा वेळही अधिक वाढला आहे. रस्त्यावर वाहनांची संख्या अधिक पण झाडांची संख्या कमी झाली आहे.

विकासाच्या मार्गाने पुढे जाताना झाडांची संख्या कमी करण्यासही आपणच हातभार लावला आहे. त्याचा परिणाम म्हणून प्रदुषणाला तोंड द्यावे लागतेच, परिणामी शरीराला ऑक्सिजनचा पुरवठाही योग्य प्रमाणात होत नाही.

बरं घराच्या आसपासही झाडांची संख्य़ा कमीच झाली कारण शहरीकरण वाढले आहे. त्यामुळे घरातही पूर्ण शुद्ध हवा मिळेल असेही नाही. तुम्ही म्हणाल की कुठेच चांगली हवा नाही मिळत तर काय करायचे. तर असे निराश होऊ नका.

indoor plants to purify air, best indoor plants to purify air in marathi, indoor plants that clean the air and remove toxins, air purifying plants for bedroom, air purifying plants india, air purifying plants indoor low light, non toxic houseplants that clean the air, air purifying indoor plants with names in marathi, वायुप्रदूषण, घरात लावायची झाडे, घरात कोणती झाडं लावावीत, ऑक्सिजन देणारी झाडे
City Pollution

किमान आपल्या घरात आपण हवा शुद्ध ठेवण्यासाठी प्रयत्न जरूर करू शकतो. नाही नाही कोणतीही मशीन वगैरे नाही आणायची आपल्याला तर फक्त निसर्गाला शरण जायचे आहे.

पण कसे जाणार तर त्यासाठी घरातच काही झाडे लावायची आहेत जी हवा शुद्ध ठेवण्यासाठी आणि विषारी घटक शोषून घेण्यासाठी मदत करतील. एक लक्षात ठेवूया की शरीराला ऑक्सिजन कमी पडला तर अनेक विकार ओढावू शकतात. त्यामुळे हवा अशुद्ध राहिली तर शारिरीक समस्या वाढीस लागणार आहेत.

मग घरापासूनच बदलाला सुरूवात करूया आणि घरात काही झाडे लावूया. पण घरात झाडे लावायची कोणती ? काळजी करू नका आम्ही तुम्हाला सांगू Air Purifying Indoor Plants कोणते आहेत.

घरात हि झाडे लावा आणि शुद्ध ऑक्सिजन मिळवा (Indoor Plants to Purify Air)

कोरफड (Aloe Vera)

कोरफडचे औषधी उपयोग माहित नसणारा व्यक्ती तसा दुर्मिळच असेल. त्वचारोग, केस यांच्यासाठी कोरफडीचा गर अत्यंत उपयुक्त असतो. त्याचबरोबर कोरफड हवा शुद्ध करण्यासाठीही अत्यंत उपयुक्त आहे.

स्वच्छता करण्यासाठी घरात जी रसायने वापरली जातात त्यातील हानीकारक घटक शोषून घेण्याचे काम कोरफड करते.

तुळस (Basil)
indoor plants to purify air, best indoor plants to purify air in marathi, indoor plants that clean the air and remove toxins, air purifying plants for bedroom, air purifying plants india, air purifying plants indoor low light, non toxic houseplants that clean the air, air purifying indoor plants with names in marathi, वायुप्रदूषण, घरात लावायची झाडे, घरात कोणती झाडं लावावीत, ऑक्सिजन देणारी झाडे
Basil

आपल्याकडे बहुतेकांच्या अंगणात तुळशीच्या रोपाला विशेष जागा दिली जाते. तुळशीला धार्मिक महत्त्वही आहे मात्र महत्त्वाचे म्हणजे तुळस दिवसा ऑक्सिजनचे उत्सर्जन करते, त्यामुळे हवा शुद्ध राहाण्यास मदतच होते.

तुळशीच्या भोवतालीचे वातावरण स्वच्छ आणि निरोगी राहाण्यास मदत होते. ह्या व्यतिरिक्त तुळशीचे इतरही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

पीस लीली (Peace Lily)

पीस लीली याच नावाने हे झाड ओळखले जाते आणि त्याच्या नावातच शांतता आहे. आरोग्यघातक असा कार्बनमोनॉक्साईड वायू शोषून घेण्याचे महत्त्वाचे काम हे झाड करते.

त्यामुळेच घरात हे झाड लावण्याची सूचना केली जाते. या झाडाला खूप अधिक उजेड लागत नसल्याने घरातील कोपऱ्यातही हे झाड लावू शकतो.

मनीप्लांट (Money Plant)
indoor plants to purify air, best indoor plants to purify air in marathi, indoor plants that clean the air and remove toxins, air purifying plants for bedroom, air purifying plants india, air purifying plants indoor low light, non toxic houseplants that clean the air, air purifying indoor plants with names in marathi, वायुप्रदूषण, घरात लावायची झाडे, घरात कोणती झाडं लावावीत, ऑक्सिजन देणारी झाडे
Money Plant – Air purifying indoor plant

हिरवेगार राहाणारे, आकर्षक पाने असलेले मनीप्लांट सहजपणे उपलब्ध होते. अनेक घरांमध्ये सजावटीसाठी म्हणून बैठकीच्या खोलीत एखाद्या कोपऱ्यात हे वेलवर्गीय झाड लावले जाते.

विशेष म्हणजे मातीच्या कुंडीसह, पाण्याच्या बॉटलमध्येही हे रोप रूजते. त्यामुळे सजावटीबरोबर घरातील हवा शुद्ध करण्याचा हेतूही साध्य होईल.

स्नेकप्लांट (Snake Plant)

घरात हे झाड लावण्याची शिफारस जाणकारांकडून केली जाते. हे झाड लावल्याने हवा शुद्ध राहाण्यास मदत होते कारण हवेतील आरोग्याला हानीकारक घटक शोषून घेण्याचे महत्त्वाचे काम केले जाते.

झाडाच्या पानांचा वळवळणाऱ्या सापासारखा आकार दिसतो त्यामुळे या झाडाला स्नेक प्लांट असे म्हटले जाते.

बांबू प्लांट (Bamboo Plant)
indoor plants to purify air, best indoor plants to purify air in marathi, indoor plants that clean the air and remove toxins, air purifying plants for bedroom, air purifying plants india, air purifying plants indoor low light, non toxic houseplants that clean the air, air purifying indoor plants with names in marathi, वायुप्रदूषण, घरात लावायची झाडे, घरात कोणती झाडं लावावीत, ऑक्सिजन देणारी झाडे
Bamboo Plant

बहुतेकांच्या घरी लहान लहान बांबूची रोपटी हल्ली पहायला मिळतात. ही रोपे भेट देणे शुभ असते, त्यामुळे सकारात्मकता राहाते असा समज आहे. तो खरा की खोटा याविषयीचा विचार बाजूला ठेवूया. पण हवा शुद्ध करण्याचं काम बांबू करतो आणि तेच आपल्याला हवे आहे.

हे झाड उत्तम वाढण्यासाठी भरपूर प्रकाश येईल अशा ठिकाणी ठेवावे. तसेच कोणत्याही खोलीत हे रोप ठेवले तरी चालेल कारण त्याचे हवा शुद्ध करण्याचे काम होतच राहाते.

अरेका पाम (Areca Palm)

सजावटीसाठी वापरले जाणारे हे झाड आपल्याला बहुतेक ठिकाणी आढळते. मुळात नुसतेच माडाच्या झावळ्यांसारखी दिसणारी पण लहान आकाराची हिरवी लांब पाने असतात. थोडंफार उन या झाडाला गरजेचे आहे त्यामुळे दक्षिण किंवा पश्चिम दिशेला झाड ठेवावे.

हवा शुद्ध करण्यासाठी हवेतील हानीकारक घटक शोषण्याचे महत्त्वाचे काम अरेका पाम करते. रात्री देखील हे झाड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उत्सर्जित करते.

इंग्रजी आयवी (English ivy)
indoor plants to purify air, best indoor plants to purify air in marathi, indoor plants that clean the air and remove toxins, air purifying plants for bedroom, air purifying plants india, air purifying plants indoor low light, non toxic houseplants that clean the air, air purifying indoor plants with names in marathi, वायुप्रदूषण, घरात लावायची झाडे, घरात कोणती झाडं लावावीत, ऑक्सिजन देणारी झाडे
English ivy – Air Purifying Indoor Plant

ही वेलवर्गीय वनस्पती आहे. आपल्याला घरात, ऑफिस अशा ठिकाणीही ही लावता येईल. हवा शुद्ध करण्याचे काम अगदी उत्तमप्रकारे करते. हवेतील फार्मेल्डिहाईड, बेन्झीन आणि ट्रायक्लोरोएथिलीन सारखे दुषित घटक शोषून घेते.

फ्लेमिंगो लिली (Flamingo lily)

हिरव्या पानांमध्ये लाल रंगाची पानसदृश फुले येणारी सुंदर दिसणारी ही वनस्पती आहे. सर्वसाधारणपणे फुलदाणीत किंवा फुलांच्या गुच्छामध्ये याचा वापर केलेला आढळून येतो. हवा शुद्धीकरणाचे काम करणाऱ्या झाडाची देखभाल खूप कमी करावी लागते.

मानवी शरीराला घातक असणारे हवेतील फार्मेल्डिहाईड, टोल्युइन आणि अमोनिया सारखे विषारी वायू नष्ट करण्यासाठी ही वनस्पती मदत करते.

हार्ट लिफ (Heart Leaf)
indoor plants to purify air, best indoor plants to purify air in marathi, indoor plants that clean the air and remove toxins, air purifying plants for bedroom, air purifying plants india, air purifying plants indoor low light, non toxic houseplants that clean the air, air purifying indoor plants with names in marathi, वायुप्रदूषण, घरात लावायची झाडे, घरात कोणती झाडं लावावीत, ऑक्सिजन देणारी झाडे
Heart Leaf – Indoor Plant

माणसाचा मेंदू कार्यक्षम राहाण्यासाठी त्याला योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होणे नितांत गरजेचे असते. रात्री तर मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा अधिक प्रमाणात होणे आवश्यक असते.

हार्ट लिफ हे वेलवर्गीय झुडुप बेडरूममध्ये जरूर ठेवा कारण रात्रीही हे झाड ऑक्सिजनचा पुरवठा करत असते. या झुडुपाच्या हिरव्यागार पानाचा आकारही हार्टचा असतो.

ड्रेसेना (Dracaena)

घराआत लावण्याचे हे झाड आहे. त्याला कमीत कमी ऊन आवश्यक असते शिवाय त्याची फारशी देखभाल करावी लागत नाही. हवेतील घातक वायू शोषून त्यांचे प्रमाण कमी करण्याचे काम ही वनस्पती करते. या झुडुपाचे अनेक प्रकार आहे. मुख्यत्वे उष्णकटिबंधीय प्रदेशांत ही वनस्पती आढळून येते.

वरील वनस्पती घरात लावता येतात, परंतू लहान मुले, पाळीव प्राणी यांच्यासाठी काही वनस्पती तोंडात गेल्यास त्या विषारी ठरू शकतात. म्हणून लहान मुले, पाळीव प्राणी पोचणार नाही अशाच ठिकाणी या वनस्पती ठेवाव्यात.

तसे तर झाडाच्या जवळ रात्री झोपू नये असे म्हणतात कारण झाडे रात्री कार्बनडाय ऑक्साईड (CO2) उत्सर्जित करतात. परंतू वरील सर्व वनस्पती मात्र याला अपवाद असल्यानेच त्या घरात लावता येतील.

Leave A Reply

Your email address will not be published.