Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

तुम्हीही प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिता का? मग या गोष्टी लक्षात ठेवाच

गेल्या तीसेक वर्षात प्लॅस्टिक चा वापर (Use of plastic) खूप वाढला आहे. पूर्वीच्या लाकूड किंवा धातूच्या वस्तूंना आता प्लॅस्टिकच्या वस्तूंनी बदललेलं आहे. म्हणून प्लॅस्टिकने आपलं आयुष्य व्यापून टाकलं आहे. हे प्लॅस्टिक जितकं उपयोगी आहे. तेवढंच ते घातक आहे. हे आपल्याला सूचित केलेलं असतं पण आपल्याला ते कळत नाही. म्हणून त्याबद्दलच माहिती घेऊयात

आपण प्रवासात असलो अन्यथा दुसऱ्या गावात गेलो की शक्यतो बाटलीबंद पाणी पिण्याला प्राधान्य देतो. कारण ते पाणी शुद्ध असते, व त्यामुळे आपली तब्येत चांगली राहावी हा आपला उद्देश असतो. पण आपल्याला पुढचा धोका आपल्याला लक्षात येत नाही.

कारण मिनरल वॉटर (Mineral Water) संपल्यावर पुन्हा आपण त्यात आपलं घरचं पाणी भरून ती बाटली वापरत राहतो. ती बाटली पुन्हा पुन्हा वापरू नये! का म्हणाल?

कारण ती बाटली एकदाच वापरावी. या बाटलीचं नीट निरीक्षण केलं तर त्यावर बाणांचा एक त्रिकोण असतो. त्यात 1 असा आकडा लिहिलेला असतो. त्याखाली PET अशी अक्षरे असतात. त्याचा अर्थ काय? तर ती बाटली पॉलीएथिलीन टेराफ्थालेट (Polyethylene terephthalate) या प्लॅस्टिक पासून बनवलेली आहे.

या प्लॅस्टिक पासून पिण्याच्या पाण्याच्या, सोड्याच्या किंवा माऊथवॉशच्या बाटल्या बनवल्या जातात. या प्रकारच्या बाटल्यांमध्ये जीवाणू जमा होऊ शकतात, त्यामुळे आपल्या तब्येतीला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून या बाटल्या वापरून झाल्यावर चुरगळून टाकून द्याव्यात, असा सरळ निर्देश त्यावर असतो.

अशाच अजून एका प्रकारचे प्लॅस्टिक जे सगळ्यात घातक असते, ज्यावर वर सांगितल्याप्रमाणे त्रिकोणात 7 हा आकडा लिहिलेला असतो आणि others असंही त्रिकोणाच्या खालच्या बाजूस लिहिलेलं असतं. आता हे others म्हणजे काय? तर याची बनावट बायस्फेनॉल ए (Bisphenol A) आणि पॉलीकार्बोनेट (polycarbonate) यांच्या मिश्रणातून बनलेली असते. संगणकाचे विविध भागांचे बाहेरील भाग, तसेच मोठे पाणी भरण्याचे जार या प्लॅस्टिक पासून बनवले जातात. बायस्फेनॉल ए हे विषारी रसायन असते. यामुळे आपल्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

म्हणून 1 आकडा असलेल्या बाटल्या या पुन्हा वापरणं टाळायला हवं. 7 आकडा असणाऱ्या तर बाटल्या नकोच. यामध्ये 2,4 व 5 हे आकडे असणाऱ्या प्लॅस्टिक वस्तू वापरल्या तर नुकसान होणार नाही. किंवा या ऐवजी काच किंवा धातूच्या बाटल्या मिळतात, त्या वापरण्यास चांगल्या असतात.


हे ही वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.