Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

श्रीमंत व्हायचंय ? रोज करत असलेल्या ह्या चुका टाळा

पैसा, श्रीमंती हे शब्द आकर्षक असतातच परंतू प्रत्येकाला श्रीमंत होण्याची भूक असते. मात्र त्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी करायला हव्यात हे लक्षात आले पाहिजे. एक नक्की की श्रीमंत व्यक्ती त्यांना हवे ती कोणतीही आणि प्रत्येक गोष्ट विकत घेऊ शकतात. कारण त्यांच्याकडे पैसे असतात.

मात्र एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की श्रीमंत आहेत म्हणून ते डाव्या उजव्या हाताने पैसा उडवत जात नाहीत. तर ते पैशाचे योग्य नियोजन, गुंतवणूक आणि व्यवस्थापन करतात. साहाजिकच त्यांच्या संपत्तीत वाढ होते.

त्यामुळेच आपल्या जवळ जेव्हा पैसा येऊ लागतो तेव्हा काही गोष्टी किंवा चुका टाळल्या तर आपण नक्कीच श्रीमंत होऊ शकतो. बघुयात काय आहे श्रीमंत होण्याचा मार्ग ?

वॉरेन बफेट सारखा अब्जाधीश गुंतवणूकदारही एक सल्ला देऊ करतो की तुम्हाला न लागणाऱ्या गोष्टी जेव्हा तुम्ही विकत घ्याल, लवकरच तुमच्या गरजेच्या वस्तू तुम्हाला विकाव्या लागतील. अनेकदा अत्यंत हुशार व्यक्तीही काही चुका करतात आणि त्यांचे बजेट कोलमडते आणि पैसा नाही असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर येते.

how to get rich, successful people, rich people, money mistakes, money management, recovering from financial mistakes, financial mistakes, invest, save, money, financial literacy, श्रीमंत होण्याचा मार्ग, पैशाचे नियोजन, पैसे गुंतवणूक, श्रीमंत होण्याचे उपाय, How to become rich in marathi

पैशांची बचत केली पाहिजे, ही सवय हळूहळू मागे पडते त्याने नुकसानच होते. म्हणूनच आपल्याला श्रीमंत व्हायचे असेल तर काही चुका तुम्ही जरूर टाळायला हव्यात. आपण मेहनत करून कमावलेला पैसा खात्यात टिकून रहावा असे वाटत असेल तर असे अनेक खर्च आहेत जे करण्यापुर्वी दोनदा विचार करा.

जसे एखादा नव्याने बाजारात आलेला मोबाईल घ्यायलाच हवा का असा विचार करा. दिखाऊपणापायी कदाचित गरज नसलेल्या वस्तू घेतल्या जातील. इतरांना त्या वस्तू दाखवण्यापलिकडे खरोखरच त्याची निकड आहे का हा विचार करा. अन्यथा बफेट यांनी म्हटल्याप्रमाणे पश्चातापाची वेळ येऊ शकते.

श्रीमंत व्हायचं असेल तर ह्या चुका टाळा (Avoid these mistakes if you want to become rich)

घाईने निर्णय नकोच (Avoid Hasty Decisions)

पैसा वाढवायचा म्हणजेच पैशाची बचत करायची हे एक अत्यंत साधे गणित आहे. त्यामुळेच कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. अति घाई आणि संकटात जाई या म्हणीप्रमाणे आपली गत होऊ नये.

मनाला वाटले आज फोन घेतला, उद्या काय उंची हॉटेलात पार्टी दिली. काम सोडून वाटेल त्या ठिकाणी फिरायलाच गेलो, असे करता कामा नये. पैसा वृद्धींगत करायचा तर नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. पैसा खर्च करण्यापुर्वी शांतपणे विचार फार गरजेचा आहे.

महिन्याचा अर्थसंकल्प (Monthly Budget)

देशाचा, राज्याचा अर्थसंकल्प असतो त्यानुसार आपल्या पातळीवर महिन्याचा अर्थसंकल्प ठरवूया. महिन्याचे असे नियोजन नसणे ही मोठी चूक असू शकते. महिन्यामध्ये ठराविक खर्चाची मर्यादा ठरवून घेणे म्हणजेच बजेट.

महिन्याच्या सुरुवातीला महत्त्वाच्या गरजा, गोष्टी प्राधान्याने कराव्यात. एखाद्या वेळी अचानक मोठा खर्च करायची वेळ आली तर पुन्हा दुसऱ्यांदा असा खर्च करणे टाळा. त्यानंतर गरजेचा असाच खर्च करावा. म्हणजे फालतू खर्च टाळता येईल.

महिन्याच्या शेवटी जे काही पैसै वाचतील ते गुंतवून टाका. एखाद्या आकस्मिक खर्चासाठी त्याचा वापर करू शकतो. असा वाचवलेला पैसा आपल्याला नंतर उपयोगात येतो. पैसे बचत करणे हा श्रीमंत होण्याचे उत्तम उपाय.

बचतीचे सोपे मार्ग (Save and Invest)

आपल्या पैशाची गुंतवणूक करताना कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. स्मार्ट आणि पैसे दुप्पट करणाऱ्या योजनांना भुलू नका. गुंतवणुकीतील ५० टक्के पैसे हे उत्तम परतावा देणाऱ्या ठिकाणी गुंतवावेत.

how to get rich, successful people, rich people, money mistakes, money management, recovering from financial mistakes, financial mistakes, invest, save, money, financial literacy, श्रीमंत होण्याचा मार्ग, पैशाचे नियोजन, पैसे गुंतवणूक, श्रीमंत होण्याचे उपाय, How to become rich in marathi

म्युचुअल फंड हा बचतीचा उत्तम मार्ग आहे. विविध फंडातून हे पैसे गुंतवले जातात. त्या व्यतिरिक्त योग्य विश्वासू ठिकाणी जमिनीतही पैसे गुंतवू शकतो परंतू दीर्घकाळासाठी ही गुंतवणूक फायदेशीर नसते. बचतीच्या पैशांपैकी ५ टक्के हिस्सा सोन्यामध्ये गुंतवू शकतो.

उधारीच्या जाळ्यात फसू नका (Never Borrow Money)

श्रीमंत होण्याच्या मार्गातील हा मोठा अडथळा आहे. उद्योगपतींचे उदाहरण पहा, त्यांचा व्यवसाय तोट्यात असला तरीही वैयक्तिक उधारीच्या विळख्यात ते अडकत नाहीत. सामान्यांसाठी उधारीचे जाळे म्हणजे क्रेडिट कार्ड. ही एक प्रकारची उधारीच आहे.

क्रेडिट कार्डच्या मोहात अडकून वारेमाप खरेदी केली जाते. त्यामुळे अनेकांना गोत्यात आलेले पाहिलेही असेल. क्रेडिट कार्डावर खर्च किंवा खरेदी करणे म्हणजे महिन्याचे पैसे हाती येण्याअगोदरच ते खर्च करणे. प्रत्यक्ष हातात पैसे नसल्याने त्यावर व्याजही भरावे लागते.

थोडक्यात नसलेल्या पैशातून खर्च कऱण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणे म्हणजे वाढीव खर्च करणे. क्रेडिट कार्डचा खर्च आवाक्याबाहेर गेला तर ते कर्ज फेडता नाकी नऊ येऊ शकतात.

बिलांचा भरणा (Bill Payments)

मोबाईल, क्रेडिट कार्ड यांची बिले वेळेवर मुदतीत भरावी. कारण नंतर त्याच्यावर मोठाच दंड भरावा लागतो, जो एक अनाठायी खर्च आहे. महिन्याच्या अर्थसंकल्पावर गदा आणणारी ही गोष्ट आहे. ही सर्वात मोठी चूक ठरते.

वेळेच्या दिरंगाईने आपले पैसे विनाकारण दंड भरण्यातच खर्च होऊन जातात. उशिरा बिल भरल्याने जो दंड भरावा लागतो तोच पैसा आपण बचत म्हणून एखाद्या फंडात गुंतवणूक करू शकलो असतो हा विचार करून पहा.

दंडापायी रक्कम भरण्याऐवजी दर महिना १००० रूपये जर आपण SIP (Systematic Investment Planning) मध्ये गुंतवू शकलो तर दहा वर्षांनी त्याचा चांगला फायदा मिळेल.

पैशांच्या व्यवस्थापना व्यतिरिक्त ह्या गोष्टी तुम्हाला श्रीमंत होण्यास मदत करू शकतात

लक्ष्य ठरवा

आपल्या क्षमतेप्रमाणे लक्ष्य ठरवा. मग त्यासाठी भरपूर मेहनत करा. स्वाभीमानाने जगू शकण्याचे बळ मिळते. जगातील ८० टक्के श्रीमंत लोक ही सदैव लक्ष्याचा पाठलाग करत होती.

विषयासंबंधीचे ज्ञान

आपल्या विषयात पारंगत होण्यासाठी सातत्याने त्या विषयाचे वाचन करा, आपले ज्ञान अद्ययावत करा. इतरत्र वेळ घालवण्यापेक्षा म्हणजे समाज माध्यमांवर अतिरिक्त वेळ घालवण्यापेक्षा विषय खोल समजून घ्या.

how to get rich, successful people, rich people, money mistakes, money management, recovering from financial mistakes, financial mistakes, invest, save, money, financial literacy, श्रीमंत होण्याचा मार्ग, पैशाचे नियोजन, पैसे गुंतवणूक, श्रीमंत होण्याचे उपाय, How to become rich in marathi
भविष्य आपल्या हाती

‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे.’ योग्य त्या दिशेने योग्य ते प्रयत्न करणे महत्त्वाचे. कोणत्याही शॉर्टकट शिवाय मेहनत आणि योग्य आर्थिक नियोजन आपल्याला साथ देते.

बचत आणि गुंतवणूक

वर म्हटल्याप्रमाणे बचत करा तर पैसा वाढतो. कारण बचतीचा पैसा गुंतवला तर त्याचे फायदे तर मिळणारच. मिळणाऱ्या पैशातील २० टक्के पैसे वाचवले तर त्याचा फायदाच होतो.

संधी दवडू नका

योग्य ती संधी दवडू नका. योग्य विचार करून वेळ साध्य करा. योग्य वेळ पैशात रूपांतरीत होऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.