Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

कोरोना बाबतची ही सत्यता मोदी सरकार लपवत आहे ?

दोन महीने इतका कालावधी होऊनही लॉकडाऊन अजून वाढवण्याची का गरज पडली असावी? नक्की देशातली परिस्थिती काय आहे?

कोरोनाच्या विळख्यात जगाला अडकून आता ४ महीने होऊन गेले आहेत. भारतात लॉकडाऊन होऊन ५० पेक्षा जास्त दिवस झाले आहेत. लॉक डाऊनचा तिसरा टप्पा संपत आला आहे. ११ मे ला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री व पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, अर्थमंत्री सीतरामन् आणि संरक्षणमंत्री सिंह यां सर्वांची महत्वाची बैठक पार पडली ज्यामध्ये ढासळणारी अर्थव्यवस्था, कोरोनाच्या राज्यानुसार असलेल्या परिस्थितीचा आढावा व लॉकडाऊनच्या चौथ्या टप्पा व अन्य महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. उद्धव ठाकरे व अन्य मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केंद्रसरकारकडे केली. दोन महीने इतका कालावधी होऊनही लॉकडाऊन अजून वाढवण्याची का गरज पडली असावी? नक्की देशातली परिस्थिती काय आहे?

कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ७० हजारांच्या घरात गेली आहे. दिवसागणिक या आकडेवारीमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या वाढीचा वेग जास्त आहे, व ही चिंतेची बाब आहे. याची सुरुवात या महिन्यापासूनच झाली. ५ मे ला पहिल्यांदा देशात मागच्या २४ तासांत ३००० पेक्षा जास्त रुग्ण मिळाले. एवढ्या संख्येने रुग्ण मिळणे म्हणजे परिस्थिती धोकदायक आहे. मग भारतामध्ये community transmission ची सुरुवात झाली आहे का? हा प्रश्न साहजिकच मनामध्ये येतो.

काय आहे community transmission?

कोविड-१९ या रोगाच्या संक्रमणाचे ४ टप्पे मानले गेले आहेत, जेंव्हा व्यक्ति प्रवास करून आलेला असतो, व त्याला रोगाची लागण होते, त्याला रोगाचा पहिला टप्पा मानला गेला आहे. सुरूवातीला बहुतांश व्यक्ति ज्या परदेश दौरा करून आलेल्या होत्या व कोरोना संक्रमित झालेल्या होत्या. रोगाचा फैलाव संबंधित व्यक्तीच्या जवळच्या लोकांमध्ये झालेला नसतो. संक्रमित व्यक्तींची संख्याही अगदीच कमी असते. जेंव्हा जे संक्रमित व्यक्ती जे प्रवास करून आलेले होते. त्यांच्या संपर्कात आल्यामुळे घरातील व अन्य जवळच्या व्यक्तींना याची लागण होण्याची शक्यता दाट असते. अशा व्यक्तींना शोधून त्यांना अलग केले जाते. जेंव्हा व्यक्ती संक्रमित असतो पण त्याने ना प्रवास केलेला असतो किंवा कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेला नसतो. अशा व्यक्तींच्या संक्रमणाचा स्त्रोत जेंव्हा शोधता येत नाही, तेंव्हा तो तिसरा टप्पा असतो. यासाठी मोठ्या प्रमाणावर लॉकडाऊन जाहीर करण्यात येतो, कारण संक्रमित होत जाणारे लोक ठराविक भागातूनच नाही तर देशाच्या कुठल्याही भागातून असतात. जेंव्हा मोठ्या संख्येने रुग्ण सापडतात, संपूर्ण देशभर याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होतो तेंव्हा तो चौथा टप्पा असतो.

Modi-Shah, Corona, covid19 in india, Corona situation india, कोरोना, कोरोना बाबतची सत्यता, मोदी सरकार, community transmission, ICMR, community spread, लॉकडाऊन, कोविड-१९
Source – Google

रोज रुग्णसंख्येत होत जाणारी वाढ, एकूण रुग्णसंख्या याचा आकडा पहिला तर भारत तिसर्या टप्प्यात आहे की नाही, याबद्दलची भीती मनात वाढत जाते. बरं केंद्र सरकार हे अजून का मान्य करत नसेल? हा प्रश्न पडतो. कारण ५ मेलाच झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी संगितले की भारतात अजून community transmission ला सुरुवात झालेली नाही. काही वृत्तपत्रांच्यानुसार अमेरिकेत जेंव्हा रुग्णसंख्या साठच होती, कॅलिफोर्निया प्रांतात कोणताही प्रवास न करता व संक्रमिताच्या संपर्कात न येताही रुग्ण सापडला, तेंव्हा २६ फेब्रुवरीलाच अमेरिकन सरकारने community transmission सुरू झाल्याचे संगितले. तर भारत सरकारनेही २८ मार्चला मर्यादित स्वरूपाचे community spread असल्याचे मान्य केले होते. बरं तेंव्हाचे आकडे किती होते? १५० ते १७० च्या दरम्यान. मग सध्या ३००० पेक्षा जास्त संख्या असूनही सरकार community transmission सुरू झालं आहे हे मान्य का करत नसावे? हे न करण्यामागची कारणे काय असावीत?

‘द हिंदू’ या नावाजलेल्या वृत्तपत्राच्या संपादकीयमध्ये सांगितल्याप्रमाणे हे नाकारण्याचं कारण म्हणजे एकदा community spread ला मान्यता दिली की ‘चाचण्या’ करणे सक्तीचं करावं लागेल आणि मोठ्या संखेने चाचण्या करणे गरजेचं होईल. एकदम मोठ्या प्रमाणावर चाचण्या करण्याची आपल्या देशाची क्षमता नाही ही वस्तुस्थिती आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने ९ एप्रिलला एक जर्नल प्रसिद्ध केलं आहे, त्यामध्ये १५ राज्यांमधल्या ३६ जिल्ह्यांमध्ये community transmission झाल्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. जेंव्हा Severe Acute Respiratory Infection ने पीडित रुग्ण दवाखान्यात दाखल झाले त्यातील १०२ पैकी ४० व्यक्ती अशा होत्या ज्यांनी प्रवास केला नाही किंवा संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात आले नाहीत तरीही बाधित झाले होते. ५९ व्यक्तींबद्दल त्यांना बाधा कशी झाली याबद्दलची माहिती मिळवता नाही आली. community transmission ला रोखणे अशक्य गोष्ट आहे हे ICMR ने दोन महिन्यांपूर्वी नमूद केले आहे. बरं जर हजारोंच्या संख्येने जे रुग्ण सापडत असूनही जर community spread नाही म्हटलं तर सरकारला व्यक्ती संक्रमित होतात त्याचे स्रोत माहीत झाले असावेत.

ज्या ४ टप्प्यांबद्दल आपण माहिती घेत आहोत त्यांचं वर्गीकरण खूप विचारपूर्वक केलं गेलं आहे, कारण टप्प्यांनुसार याची दाहकता वाढत जाते, सरकार व जनता या दोघांनाही हे समजावे की एका मोठ्या संकटाशी सामना करायचा आहे. सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदांमध्ये सांगण्यात येतं की कोरोनाच्या आलेखात सर्वोच्च शिखर गाठता येऊ नये, हा आलेख समतल राहावा. ही चांगली इच्छा आहे आणि पार्श्वभूमीवर सरकारने निर्णय घेतला आहे की ७५ हॉटस्पॉट जिल्ह्यांमध्ये community transmission आहे की नाही याबद्दल सर्वेक्षण केलं जाणार आहे. यांत अजून संभ्रम वाढवणारी बाब AIIMS या संस्थेने मांडलेल्या मतानुसार येत्या जून-जुलै दरम्यान या आलेखातील सर्वोच्च शिखर बिंदूची परिस्थिती उद्भवू शकते. पण लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू होताना शिथिलता देण्याबद्दलचाही विचार होतो आहे. लॉकडाऊन मध्ये शिथिलता तेंव्हाच दिली गेली जेंव्हा संक्रमणाचा वेग कमी झाला. आता वेगाने वाढणारे संक्रमितांचे आकडे आणि देण्यात येणारी शिथिलता यामुळे कदाचित भयावह परिस्थिती उद्भवू शकते, ही चिंतेची बाब आहे. त्याचबरोबर सरकारने अजून निर्णय घेतला आहे की कोविड संक्रमित व्यक्तीमध्ये जर रोगाची कोणतीच लक्षणे आढळून येत नसतील, तर चाचणी न घेता त्याला घरी सोडण्यात येईल व त्या व्यक्तींना घरातच ७ दिवस विलगीकरण करण्यात येईल.

लॉकडाऊन ज्या पद्धतीने हटवण्याची किंवा शिथिल करण्याचा आटापिटा चालू आहे, आणि संक्रमणाचा वाढता वेग देशासमोर नवीनच प्रश्न निर्माण करतो आहे. सरकारचं म्हणणं की जर community transmission सुरू झाला असं जाहीर केलं तर जनतेच्या मनात भीतीचं वातावरण तयार होईल, लोक बिथरतील पण जर देण्यात आलेल्या माहिती मध्ये व घेतलेल्या निर्णयामध्ये पारदर्शकता असेल तर चांगलं आहे. जर संभ्रमाची परिस्थिती राहिली तर अमेरिका व युरोपसारखा हाहाकार उडू शकतो. भीती व भ्रम दूर सारून पारदर्शकता ठेवून आपण भारतीय निर्धाराने योजनाबद्ध पद्धतीने या महामारीशी दोन केले तर नक्कीच या संकटातून सुखरूपपणे बाहेर पडू शकतो.


Leave A Reply

Your email address will not be published.