१ डॉलर = १ रुपया झाल्यास अशी होईल तुमच्या आयुष्याची उलथापालथ
अनेक स्वयंघोषित अभ्यासक तज्ज्ञ वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय रुपया आणि अमेरिकन डॉलर बाबत लोकांना ज्ञान पाजवत असतात, काही लोक तर रुपया आणि डॉलर सामान झाले तरच भारताची प्रगती झाली समजावे असं सांगून पार सत्यनाशच करतात. सध्याचे १ $ = ७२ ₹ हे समीकरण जर १ $ = १ ₹ असे बदलले तर ? असा विचार केलाय का तुम्ही कधी ? पण आम्ही केलाय, चला बघुयात तुमच्या आयुष्याची काय उलथापालथ होईल या बदलाने.
युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजेच USA हि महासत्ता आहे हे तर आपण जाणतोच. ह्या महासत्तेचे चलन आहे अमेरिकी डॉलर (US$). अमेरिकेचा डॉलर हा भारताच्या रुपयापेक्षा तब्बल ६५ ते ७० पटीने मजबूत आहे. सध्या जरी अमेरिकन डॉलर भारतीय रुपयांपेक्षा मजबूत असला, तरी भविष्यात एकवेळ अशी नक्की येईल, जेंव्हा भारतीय रुपयाने अमेरिकन डॉलरची बरोबरी केलेली असेल. तुम्ही कधी कल्पना केली आहे का, कि काय होईल जेंव्हा १ US $ = १ ₹ होईल.
कल्पना केली असता, काही मजेदार निष्कर्ष निघाले आहेत. हे निष्कर्ष आम्ही तुमच्या समोर मांडू इच्छितो. आपल्या आयुष्यात कोणते बदल झालेले असतील, जेंव्हा १ डॉलरची किंमत हि १ रुपयाच्या बरोबर झालेली असेल. सध्याच्या १ $ = ७२ ₹ हे समीकरण जर १ $ = १ ₹ असे बदलले तर ? असा विचार केलाय का तुम्ही कधी ? पण आम्ही केलाय, चला बघुयात तुमच्यात आयुष्यात काय बदल होतील.
१) जर १ $ = १ ₹ असे झाले तर कित्येक लोकांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर पगार हा साधारणतः २५०० ते ३००० $ ह्या दरम्यान असतो. म्हणजेच प्रचंड पैसे खर्च करून मेहनतीने डॉक्टर व इंजिनियर बनलेल्या लोकांना सुद्धा इतरांप्रमाणे २५०० $ इतक्या पगारावर काम करावे लागेल. जर १ $ = १ ₹ असे झाले तर लोक २५०० $ वर नोकरी करण्यास मजबूर होऊ शकतील.
२) जर १ $ = १ ₹ अशी परिस्थिती आलीच, तर कंपनीचा मालक माणसांना कामावर न ठेवता त्याऐवजी रोबोचा वापर करून काम करून घेईल. कारण माणसाला तीन हजार ते चार हजार डॉलर रुपये वेतन देण्यापेक्षा तो १००० डॉलर किमतीचा रोबो का नाही वापरणार ? जर १ $ = १ ₹ अशी परिस्थिती आलीच तर भारतीय लोकांना भारता बाहेर मिळणाऱ्या, खासकरून अमेरिकेत मिळणाऱ्या नोकऱ्या धोक्यात येतील.
३) १ $ = १ ₹ असे झाले तर बँकांची स्थिती दयनीय होऊन जाईल व बँकांना वाचवण्यासाठी सरकार बँकांनाच पैसे देण्यास मजबूर होईल.
४) भारत निर्यातीद्वारे परकीय चलन कमावतो ज्याचा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होतो. रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत असल्यामुळे वस्तू व सेवा निर्यात केल्यानंतर भारताला त्याचा भरपूर फायदा होतो. पण जर १ $ = १ ₹ असे झाले, तर निर्यातीमुळे होणाऱ्या नफ्यात खूप मोठी घट झालेली असेल.
५) १ $ = १ ₹ झाले तर भारताचे केवळ नुकसानच होईल असे तुम्हाला वरील ४ मुद्दे वाचून वाटत असेल तर थांबा, हि खुशखबर वाचा. जर १ $ = १ ₹ असे झाले तर भारत अमेरिकेकडून ज्या वस्तू आयात करतो त्याची किंमत खूपच कमी झालेली असेल. समजा तुम्ही आयफोन घेऊ इच्छित असाल तर सध्या तुम्हाला ६५ हजार, ७० हजार एवढी रक्कम मोजावी लागेल. पण १ $ = १ ₹ असे झाले तर अमेरिकेत ९५० डॉलरला मिळणारा आयफोन तुम्हाला भारतातही ९५० रुपयांनाच मिळणार आहे. आयफोन प्रेमी हे वाचून नक्कीच सुखावले असतील.
६) उच्चशिक्षण घेऊन अमेरिकेत नोकरी करण्याचे स्वप्न अनेक भारतीय बाळगतात याचे कारण आहे तिथे मिळणारा गलेलठ्ठ पगार. पण जर १ $ = १ ₹ असे झाले तर कुणी कशासाठी जाईल अमेरिकेत नोकरी करायला ? साहजिकच तो उच्चशिक्षित भारतातच नोकरी करणे पसंद करेल.
समजा तुम्हाला अमेरिकेत ५००० अमेरिकन डॉलर एवढा पगार असेल तर तुम्ही ते ५००० अमेरिकन डॉलर भारतात आपल्या कुटुंबियांना पाठवताना ५००० X ६५ असे येतील. म्हणजेच तुम्ही पाठवलेले ५००० डॉलर ३२५,००० रुपये बनून भारतात येतील. पण जर १ $ = १ ₹ असे झाले तर काय होईल ? तुम्ही समजला असालच.
७) आयात स्वस्त होईल. होय ! जर १ $ = १ ₹ असे झाले तर आयात केलेले सर्व सामान, उत्पादने स्वस्त होतील. आपल्यासाठी सार्वधिक चिंतेचा विषय असलेली बाब म्हणजे पेट्रोल, डिझेलच्या किमती. पण जर भारतीय रुपया १ $ = १ ₹ इतका मजबूत झाला तर नक्कीच पेट्रोल व डिझेलही स्वस्तात मिळेल आणि हे वेगळे सांगायला नकोच कि त्यामुळे दळणवळणासाठी लागणारा खर्चही (ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट) कमी लागेल.
८) अमेरीका मधील कंपन्या भारतीय लोकांना जॉब देतात कारण त्यांना अगदी स्वस्तात मनुष्यबळ उपलब्ध होते म्हणून. १ डॉलरची किंमत जर १ रुपया झाली तर अमेरिकी कंपन्या अर्थातच भारतीय लोकांना नोकरी देण्याऐवजी प्रथम प्राधान्य अमेरिकन व्यक्तींनाच देतील. कारण जर समान वेतन द्यावे लागत असेल तर कोणतीही अमेरिकी कंपनी आपल्याच अमेरिकी तरुणांना प्रथम संधी का नाही देणार. त्यामुळे भारतीय लोकांच्या आपल्या देशाबाहेरील नोकरींवर गदा येण्याची दाट शक्यता असेल.
९) जर १ $ = १ ₹ असे झाले, तर अमेरिका व भारत ह्यांच्या जीडीपी (GDP) वर ह्याचा नक्कीच परिणाम होईल. जर १ $ = १ ₹ झाले तर काय काय होऊ शकेल ह्या संबंधी काही शक्यता आम्ही वर्तवल्या आहेत. असे भविष्यात कधी होईल का ? होईल तर ते कधी ? ह्याचं उत्तर काळच देऊ शकेल. आम्ही फक्त काही शक्यता तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.