Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

काय आहे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा इतिहास ?

नवीन सरकार येऊन दोन वर्षाचा काळ लोटला असला तरी महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही उलथापालथ चालूच आहे. सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असणारा विषय आहे तो म्हणजे शिवसेनेचा दसरा मेळावा (Shivsena Dasara Melava) . महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ सारखीच पण कदाचित त्यापेक्षा मोठी राजकीय घडामोड जनसामान्यांनी काही महिन्यांपूर्वी पुन्हा अनुभवली. याआधी शिवसेनेत (Shivsena) फूट झाली आणि मोठ्या संख्येने आमदार, खासदार, कार्यकर्ते यांनी उध्दव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडली आणि महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झालं. भाजप आणि शिंदे गटाचं सरकार स्थापना झालं. सेना कुणाची हा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला. केवळ पक्ष, गट यांच्यावरच नाही तर पक्षाच्या चिन्ह व परंपरांवरही दावे – प्रतिदावे केले गेले पण निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार सध्या हा पक्ष अधिकृतरीत्या शिंदे यांच्याकडे आहे.

आपला आज मूळ मुद्दा दशहरा मेळावा कडे परत येऊया, यंदा शिंदे गटाने शिवाजी पार्क मैदान पाहिजे म्हणून अर्ज केला आणि पहिल्यांदा आम्हीच केला आहे असं पण सांगितलं पण शिवसेनेचे नेते अनिल परब पेशाने वकील आणि त्यांना यातील खाचा माहित आहेत. त्यांनी यातील गंडवेगिरी समोर आणली आणि मग शिंदे गटाचा नाइलाईज झाला आणि वाद नको असं कारण सांगत त्यांनी अर्ज मागं घेतला, विश्लेषक निखिल वागले यांच्या मते तर शिंदेनी असं करणं म्हणजे मूळ शिवसेना उद्धव ठरे यांचीच आहे असं मान्य केल्याचा प्रकार आहे. तर असा हा दसरा मेळावा शिवसेनेसाठी का महत्वाचा आहे? कधी झाली त्याची सुरुवात? काय आहे त्याचा इतिहास? आपण जाणून घेणार आहोत.

शिवसेनेची स्थापना आणि दसरा मेळाव्याची सुरुवात..

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात जशी विविध ठिकाणच्या नवरात्र आणि दसरोत्सवाची परंपरा आहे तशीच राजकीय इतिहासात या दसरा मेळाव्याची (Shivsena Dasara Melava) परंपरा आहे. दसरा आणि दसरा मेळावा म्हणून सामान्य शिवसैनिकांचा उत्साह दुप्पट होतो. कायमच ते या दिवसाची आतुरतेने वात पाहत आले आहेत आणि यादिवशी मुंबईत गर्दी करत आलेत. याला आज पाच दशकांहून अधिकची परंपरा आहे. १९ जून १९६६ या दिवशी शिवसेना जन्माला आली. पण स्थापना झाल्यानंतर मोठा कार्यक्रम-सभा असं काही झालंचं नव्हतं म्हणून मग एक सभा घेण्याचं ठरलं. त्याचवर्षीच्या दसऱ्याला म्हणजे ३० ऑक्टोबरला शिवसेनेचा हा मेळावा पहिल्यांदा शिवाजी पार्क मैदानावर घेतला गेला. हा पहिलाच दसरा मेळावा कसा होणार याबद्दल सर्वांच्याच मनात धाकधूक होती. बाळासाहेब (Balasaheb Thackeray) थोडे सचिंत होते. पण सुरुवातच जोरदार व्हावी यासाठी या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच शाहीर साबळे यांनी महाराष्ट्र गीत सादर केलं आणि कार्यक्रमाला रंग चढू लागला. शेवटी बाळासाहेब बोलायला उभे राहिले. भाषणादरम्यान बाळासाहेब बोलले की महाराष्ट्राला आता महाराष्ट्रावादाची आवश्यकता आहे, हे वाक्य ऐकून सर्व जनसमुदायाने टाळ्यांचा गजर केला. अशी दसरा मेळाव्याची दमदार सुरुवात झाली. 

दसरा मेळाव्याची परंपरा

दसरा मेळावा हा शिवसैनिकांसाठी खूपच खास आहे. या दिवशी शिवाजी पार्कची २८ एकरात असलेली विस्तीर्ण जागा खचाखच भरून जाते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक हे शिवाजीपार्कात दाखल होतात. त्याचं नाव जरी शिवाजी पार्क असलं तरी शिवसैनिकांसाठी हे फक्त एक मैदान नाही तर ‘शिवतीर्थ’ आहे. या मेळाव्यात सुरुवातीला सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. मग शस्त्रपूजन होई आणि यानंतर नेत्यांची भाषणे होत असत. अखेरीस बाळासाहेब बोलायला उभे राहत. त्यांचं भाषणच खरंतर खास आकर्षण असे. पुढच्या वर्षीच्या मेळाव्यापर्यंत  सेनेची रणनीती काय असेल? याबद्दलचं मार्गदर्शन बाळासाहेब सर्वांना करत, अशी प्रथाच पडली होती. बाळासाहेबांच्या त्या भाषणातून शिवसैनिक प्रेरणा, ऊर्जा घेऊन घरी परतत असत. या मेळाव्यामध्ये मित्र असो की विरोधक; विविध पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee), स्व. जॉर्ज फर्नांडीस (George Fernandes), शरद पवार (Sharad Pawar) अशा मात्तबर नेत्यांची या मेळाव्यात उपस्थिती राहिलेली आहे. ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो” हे शब्द कानावर पडेपर्यंत शिवाजी पार्क शिवसैनिकांच्या घोषणांनी दणाणून जायचं. ठाकरी शैलीतून विरोधकांचा समाचार घेणं, घणाघात करणं यासाठी दसरा मेळाव्याची उत्सुकता असायची.

१९७५ च्या मेळाव्यात आणीबाणीला पाठिंबा देण्यात आला होता. १९७८ मध्ये सेनेचा महानगरपालिकेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला म्हणून सामान्य शिवसैनिकांमध्ये पुन्हा उत्साह भरण्याचं काम या मेळाव्याद्वारे केलं गेलं.  १९८२ च्या गिरणी कामगारांच्या संपाबाबत घोषणा करण्यात आली होती. १९८५ च्या दसऱ्याला सेनेने शिवतीर्थावरून हिंदुत्वाचा हुंकार दिला. १९९१ सालच्या मेळाव्यात बाळासाहेबांनी घोषणा केली की मुंबईत भारत – पाकिस्तानचा सामना होऊ देणार नाही, यानंतरच शिवसैनिकांनी वानखेडेची खेळपट्टीच उकरली आणि त्यावर डांबर ओतला. १९९५ चा दसरा मेळावा हा युतीची महाराष्ट्रात सत्ता आल्यानंतरचा पहिलाच मेळावा होता. १९९६ च्या मेळाव्यात शिव उद्योग सेनेच्या स्थापनेची घोषणा केली, ज्याचं नेतृत्व राज ठाकरे यांनी केलं होतं. २००६ च्या दसऱ्याला पावसाची संततधार लागल्यामुळे मेळावा रद्द केला गेला. २००९ मध्ये निवडणुका तोंडावर होत्या म्हणून आचारसंहितेच्या कारणाने दसरा मेळावा रद्द करावा लागला होता. २०१० मध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वात असलेल्या युवा सेनेची स्थापना या मेळाव्यात करण्यात आली. २०११ चा मेळावा हा सगळ्यात खास ठरला. बाळासाहेबांची उपस्थिती असणारा हा शेवटचा दसरा मेळावा ठरला. २०१२ च्या मेळाव्यात बाळासाहेबांना उपस्थित राहता आलं नाही, म्हणून त्यांचं रेकॉर्डेड भाषण प्रसारित करण्यात आलं. पुढील महिन्यात बाळासाहेबांचं निधन झालं. २०१३ पासून हा दसरा मेळावा उद्धव ठाकरे घेत आहेत. 

Shivsena Dasara Melava 2023 –

दसऱ्याचा दिवस हा शिवसेना- शिवतीर्थ- दसरा मेळावा या समीकरणाचा राहिलेला आहे. एका संघटनेने एका मैदानावर एक कार्यक्रम इतकी वर्षे घेणे हा एक विक्रमच आहे. खरंतर २०२०-२१ मध्ये कोरोनाच्या साथीमुळे हा मेळावा शिवतीर्थावर झालाच नव्हता. पण या वर्षीचा मेळावा होणार आहे तो वेगळ्याच पार्श्वभूमीवर. सेनेने मागच्या वर्षी आजवरचं अभूतपूर्व बंड पाहिलं आहे आणि दसरा मेळावा घेता यावा यासाठी शिवतीर्थासाठी चाललेली रस्सीखेच पाहिलेली आहे पण यंदा मात्र अशी रस्सी खेच झालीच नाही. शिंदे गटाने डायरेक्ट मन टाकून अर्ज मागे घेतला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दसरा मेळावा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आजही जनसामान्यांत उद्धव ठाकरे यांच्या बद्दल सहानभूती आहे आणि त्यातच राष्ट्रवादी सोबत झालेल्या सेम गेम नंतर आता उद्धव ठाकरे मेळाव्यात काय बोललात याकडे राजकारणी, राजकीय विश्लेषक, जनता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. शक्तीप्रदर्शनाची मोठी संधी या मेळाव्यात आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा अनुयायी कोण, हे कळणार आहे. पक्ष कोणाचा? हे समजणार आहे. चिन्ह आणि पक्षावर दावा अधिक बळकट करण्याची ही संधी मिळणार आहे.  निवडणुकीपूर्वी जनतेला संदेश देण्यासाठीचं हे मोठं व्यासपीठ ठरणार आहे. येणाऱ्या काळात शिवसेनेची दिशा, रणनीती काय असेल याची माहिती मिळणार आहे. एकूण काय तर यंदाचा दसरा मेळावा हा एक वेगळाच इतिहास घडवणार आहे.

दसरा मेळाव्यासाठी Shivsena Dasara Melava दमदार टिझर


Leave A Reply

Your email address will not be published.