Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

प्रमोशन मिळवण्यासाठी ह्या १० टिप्स फॉलो करा… प्रमोशन पक्कं समजा

उत्तम नोकरी मिळवण्याचे स्वप्न महाविद्यालयीन शिक्षण घेताना बहुतेक प्रत्येकाने पाहिलेले असते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, आवश्यक ते व्यावसायिक ज्ञान मिळवून, कौशल्य आत्मसात केल्यानंतर, आपल्याला हव्या त्या क्षेत्रातील नोकरी मिळू शकते. एकदा नोकरीतील खाचा खोचा लक्षात आल्यानंतर वेध लागतात ते प्रमोशनचे म्हणजेच पदोन्नतीचे.

अर्थात पदोन्नती किंवा प्रमोशनसाठीही काही विशेष प्रयत्न करावे लागू शकतात. प्रामाणिकपणे केलेले योग्य काम नेहमीच मदतीस येते. मात्र त्या व्यतिरिक्त कोणत्या गोष्टी किंवा मार्गाची मदत घेऊन आपण सहजपणे आपले हे ध्येय गाठू शकतो ते बघुयात.

ऑफिसमध्ये प्रमोशन कसं मिळवायचं (How to get a promotion at work)

ध्येयावर लक्ष (Focus on your Goal)

tips for promotion, career tips for promotion, how to get a promotion at work fast, how to convince you deserve promotion in marathi, work promotion plan, how to earn promotion, tips for getting promotion, पदोन्नती, प्रोमोशन मिळवण्यासाठी टिप्स, प्रोमोशन कसं मिळवायचं

पदोन्नती ही काळाबरोबर मिळतेच असे गृहित धरणे योग्य नाही. आपले काम बोलते वगैरे गोष्टी ठीक आहेत, मात्र काम दिसणेही महत्त्वाचे असते. त्याचबरोबर जी नोकरी करतोय तिथेच पदोन्नती हवी की दुसऱ्या ठिकाणी नोकरीतील वरिष्ठ पद मिळवायचे आहे ही गोष्ट मनाशी पक्की ठरवून घ्या. जेणेकरून योग्य दिशेने आणि योग्य प्रयत्न करू शकतो.

त्यामुळे फक्त प्रामाणिकपणे काम न करता, ते वरिष्ठांपर्यंत पोहोचवणेही गरजेचे आहे. सध्याच्या काळात तंत्रज्ञानाचा मोठाच प्रभाव आपल्या कामांवर होतो आहे, म्हणूनच एखाद्या चांगल्या कामासाठी दाद मिळवणेही महत्त्वाचे आहे.

पदोन्नती (promotion) ही त्याच पदावरील असू शकते किंवा संपूर्ण नवी जबाबदारी पार पाडण्याचे पदही असू शकते.

ज्ञानवृद्धी आणि कौशल्यप्राप्ती (Improve Knowledge & Skill)

आपल्या कामाची सवय होणे, सरावाने ते बिनचूक होणे यात वेगळेपणा नाही. परंतू प्रमोशनची अपेक्षा असेल तर मात्र त्या त्या क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान मिळवणे अगदीच गरजेचे असते. कोणतेही क्षेत्र सातत्याने बदलत राहाते, त्यातील ज्ञानविशेष अद्ययावत होतात. नव्या नव्या संकल्पना रूजतात.

या सर्वांना आपलेसे करताना त्यातील आवश्यक नवी कौशल्ये आत्मसात करणेही खूप अधिक महत्त्वाचे आहे. आपल्या तज्ज्ञतेच्या बाहेरचेही ज्ञान, माहिती अद्ययावत ठेवणे अत्यंत गरजेचे. प्रमोशनची अपेक्षा ठेवत असाल तर व्यावसायिक दृष्ट्या स्वतःला विकसित करणेही गरजेचे आहे.

त्याशिवाय सातत्याने नव्या गोष्टी अंगिकारणे, शिकणे त्यांच्या जुळवून घेण्याची क्षमता असल्याचे दाखवणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकणे शक्य होईल.

जबाबदारी अंगावर घ्या (Take Responsibilities)

tips for promotion, career tips for promotion, how to get a promotion at work fast, how to convince you deserve promotion in marathi, work promotion plan, how to earn promotion, tips for getting promotion, पदोन्नती, प्रोमोशन मिळवण्यासाठी टिप्स, प्रोमोशन कसं मिळवायचं
Career tips

मी बरा आपले काम बरे अशी कूपमंडूक वृत्ती सोडून द्या. नव्या नव्या जबाबदाऱ्या अंगावर घेण्यास किंवा पेलण्यास सक्षम असल्याचे आणि त्यात सर असल्यास त्यात तुमच्या विभागाला फायदाच होईल.

पर्यायाने तुम्हाला प्रगतीचा वाव मिळेल. काम करत असलेल्या कंपनीचा आपल्या कौशल्यामुळे, धडाडीमुळे फायदा होणार असेल तर त्याचा वापर करा.

सांघिक काम (Team Work)

आपल्याकडील कामाचा भार कमी झाल्यास इतर नव्या जबाबदाऱ्या पेलण्याची, इतरांना मदत करण्याची तयारी ठेवा. बऱ्याचदा ‘आपले काम संपले ना दुसऱ्याला कशाला मदत करायची’ अशी वृत्ती दिसून येते. ही कोती वृत्ती पदोन्नतीच्या आड येऊ शकते.

मुळात हातातील काम संपल्यानंतर दाखवलेली मदतीची तयारी नक्कीच वरिष्ठांना नजरेतून सुटणार नाहीय. सांघिक कामाचा निश्चितच फायदा होतो, उलट काही वेळा सांघिकतेने काम न केल्यास कंपनीला नुकसानही होऊ शकते.

त्यामुळे आपल्या गटातील इतरांना काम पूर्ण करण्यास मदत कराच, शिवाय संघसदस्यांच्या कामाचे कौतुक करा जेणेकरून संघभावना कायम राहिल.

वरिष्ठांशी संबंध (Relationship with Boss)

tips for promotion, career tips for promotion, how to get a promotion at work fast, how to convince you deserve promotion in marathi, work promotion plan, how to earn promotion, tips for getting promotion, पदोन्नती, प्रोमोशन मिळवण्यासाठी टिप्स, प्रोमोशन कसं मिळवायचं
how to convince you deserve promotion

कामाशी प्रामाणिक राहाताना आपल्या वरिष्ठांशी सौहार्दाचे संबंध राखण्यालाही तितकेच महत्त्व आहे. वरिष्ठ व्यवस्थापकाशी नियमित सुसंवाद कसा साधता येईल, यावर लक्ष द्या.

आपले काम योग्य पद्धतीने त्यांच्यासमोर मांडणे हे देखील कौशल्य आहे आणि त्याचा फायदा आपल्या करिअरसाठी आणि त्यातील विकास, प्रगती साठी होतोच. लहान लहान लक्ष्य ठेवा आणि ती साध्य करा. त्यामुळे अधिक चांगल्या पद्धतीने आपण काम कसे पार पाडू शकतो हे वरिष्ठांना दिसू द्या.

संस्थेची प्रगती झाली तर वैयक्तिक प्रगती होईल, अशा पद्धतीने नियोजनबद्ध काम करायला हवे. आपल्या कामातील प्रगतीची, लक्ष्य गाठण्याच्या प्रक्रियेची माहिती नियमितपणे वरिष्ठांना देत रहा.

तसेच आपण केलेल्या कामाचे, मिळवलेल्या यशाची कागदोपत्री नोंद जरूर ठेवा. नियमितपणे वरिष्ठांना प्रगतीची माहिती द्या.

टीम लीडर सारखे वागा (Act like a Leader)

एखाद्या ग्रुप मध्ये काम करत असाल तरीही इतरांना मदतीचा हात द्या परंतू, स्वतःच्या अचूक कामाबरोबरच एका चांगल्या टीम लीडरचे गुण आपल्यात आहेत याची चुणूक वेळेनुरूप दाखवणे महत्त्वाचे आहे.

आपल्या स्वतःच्या कामाबरोबरच इतरांच्या कामाची जबाबदारी देखील घ्या. एखाद्या कठीण प्रसंगी पुढे होऊन परिस्थिती हाताळा. अशा संघसदस्यांना प्रमोशन देण्यास व्यवस्थापकालाही आनंदच वाटतो कारण एक आख्खी टीम आपण योग्य प्रकारे हाताळू शकत असतो.

त्यासाठी वेळेवर उपस्थित राहाणे, कमी रजा घेणे तसेच वेळ पडल्यास अधिकचा वेळ देऊन काम करणे, गरज भासल्यास अधिकची जबाबदारी पार पाडणे आदी गोष्टी स्वतःहून कराव्या लागतील.

स्वतःचे नेटवर्क आणि लोकप्रियता (Be Popular and build your Network)

tips for promotion, career tips for promotion, how to get a promotion at work fast, how to convince you deserve promotion in marathi, work promotion plan, how to earn promotion, tips for getting promotion, पदोन्नती, प्रोमोशन मिळवण्यासाठी टिप्स, प्रोमोशन कसं मिळवायचं
tips for getting promotion

आपल्या कामाच्या भरवश्यावर आणि वेळ येईल तेव्हा प्रमोशन मिळेलच, अशा भ्रमात राहूच नका. जग काही इतके सरळ रेषेत चालत नाही. त्यामुळे ऑफिसमध्ये कुरघोड्या, राजकारण होणारच.

यामुळे अगदी पात्र असूनही एखाद्याला प्रमोशन डावलले जाते ते या कुरघोड्या आणि राजकारणामुळे. त्यामुळेच लोकांना आपल्याशी जोडून ठेवणे, प्रत्येकाच्या मदतीसाठी तयार असणे हे फार महत्त्वाचे असते.

स्वतःमध्ये गर्क राहू नका, ऑफिसमधल्या इतर व्यक्तींशीही चांगले नाते ठेवण्याचा प्रयत्न करा. कंपनीशी निगडीत कार्यक्रम असतील तर त्याला जरूर उपस्थित रहा.

सहकाऱ्यांशी संपर्क ठेवलात तर स्वतःमधील चांगल्या गोष्टी, कौशल्ये समजतील. सर्वांशी मिळून मिसळून राहिल्याने आपल्या वर्तुळाच्या बाहेरील व्यक्तींकडून कंपनीविषयी, विविध विभागांविषयी अधिकाधिक माहिती मिळू शकते.

व्यावसायिक वृत्ती (Professionalism)

ऑफिसच्या कामात वक्तशीर आहात, उत्तम दर्जाचे काम करत आहात तरीही एक गोष्ट जरूर पाळायला हवी ती म्हणजे व्यावसायिक वृत्ती. सर्वांशी संपर्क ठेवताना, जाळे वाढवताना, वरिष्ठांशी योग्य संबंध राखतानाही अत्यंत व्यावसायिक वृत्ती अंगी बाणवणे महत्त्वाचे आहे.

प्रत्येकच कार्यालयात कुरघोड्या राजकारण सुरू असते पण त्यापासून दूर राहणे महत्त्वाचे. विनाकारण चुगली चहाड्या, इतरांविषयी मत देणे आदी गोष्टी न केलेल्याच बऱ्या. फक्त पदोन्नतीसाठी नव्हे तर नोकरीची सुरक्षितताही धोक्यात येण्याची शक्यता या गोष्टींमुळे असते.

काम करताना, दुसऱ्यांना मदत करताना ऑफिसातील राजकारणापासून स्वतःला चार हात लांबच ठेवा. या व्यावसायिक वृत्तीमध्ये आपल्या पेहरावाकडेही लक्ष असावे. ऑफिसला योग्य अशा पद्धतीने पेहराव करून जावे. त्याचाही योग्य तो प्रभाव पडत असतोच.

व्यक्तिगत गोष्टी दूर असाव्या (Never mix Personal and Work Life)

कोणत्याही ऑफिसमध्ये व्यावसायिक वृत्ती आणि व्यक्तिगत गोष्टी यांची गल्लत करू नये. एकाच ऑफिसमध्ये मित्र असाला तरीही व्यावसायिक पातळीवर कामावर आणि प्रमोशनच्या प्रक्रियेत या गोष्टींना थोडं बाजूलाच ठेवा.

मार्गदर्शक (Mentor)

tips for promotion, career tips for promotion, how to get a promotion at work fast, how to convince you deserve promotion in marathi, work promotion plan, how to earn promotion, tips for getting promotion, पदोन्नती, प्रोमोशन मिळवण्यासाठी टिप्स, प्रोमोशन कसं मिळवायचं

मार्गदर्शक हा कोणत्याही टप्प्यावर व्यक्तीला मदतच करतो. त्यामुळे ऑफिसला जात असाल तरीही मार्गदर्शक हा आपल्याला मदतच करेल. कौशल्ये शिकण्यासाठी मार्गदर्शक मोलाचा पाठिंबा देईल.

हा मार्गदर्शक ऑफिसमधील वरिष्ठ सहकारीही असू शकतो. जो करिअरच्या टप्प्यावर योग्य मार्गदर्शन करेल आणि आपल्याला गाठायच्या असलेल्या लक्ष्याबद्दल दृष्टीकोन देऊ शकेल.

तसेच ऑफिस किंवा संस्था यांच्याविषयी अधिक समजून घेण्यास मदत करेल शिवाय तिथे राहून आपली प्रगती किंवा आपल्यासाठी योग्य संधी कोणत्या आहेत हे शोधण्यासही मदत करेल.

संधी, पद निर्माण करा (Create Opportunities)

काम करताना निरिक्षणदृष्टीही ठेवा. एखाद्या कामामुळे योग्य ती संधी चालून येऊ शकेल. कदाचित आपल्या कामामुळे एखादे नवे पदही आपल्यासाठी आपण निर्माण करू शकतो. एखाद्या नव्या कामामुळे अशी संधी निर्माण होऊ शकते.

हे काम करण्याची तयारी ठेवून वरिष्ठांशी बोलून या पदासाठी, संधीसाठी आपण योग्य उमेदवार आहोत हे पटवून देऊ शकता. पुढाकार घेत जबाबदारी अंगावर घेण्याचे कसब नक्कीच प्रमोशनची संधी मिळवून देऊ शकते.

ह्या सर्वांमध्ये स्वतःशी प्रामाणिक राहून आनंदाने काम करत राहाणेही महत्त्वाचे आहे. आपल्या सकारात्मक वर्तनाने आणि सहकार्याच्या भावनेने वरिष्ठांना आपल्या पात्रतेची जाणीव नक्कीच होत राहाते. वरील गोष्टींनी आपले कामच त्यांच्यापुढे आणले जाईल. मग यशाचा रस्ता काही अवघड राहाणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.