Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

घसा दुखीवर घरगुती उपाय.

अनेकदा वातावरणातील बदलामुळे, पित्ताच्या त्रासामुळे तसेच फ्लूमुळे घसा दुखणे, घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटणे, घास खवखवणे किंवा खोकल्याची ढास येत असल्याचा त्रास अनेकांना होतो. अन्नमार्गातील तसेच श्वसनमार्गातील एक महत्त्वाचा अवयव म्हणजे घास, आपण आवाज काढत असलेले स्वरयंत्र सुद्धा याच भागात असल्यामुळे घशाच्या तक्रारींवर त्वरित उपाय करून योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी लगेच डॉक्टर कडे जायची गरज नाही कारण कोणताही आजार होताच शरीरात प्रतिकात्मक ऊर्जा निर्माण होते आणि याला आपण अनेक घरगुती उपायांची जोड दिल्यास घशाच्या समस्या आपण मिटवू शकतो.

घशाच्या समस्येवर घरगुती उपाय खालील प्रमाणे –

घास दुखणे –

अनेकांना सकाळी उठल्यावर अचानक आपला घास दुखत असल्याची जाणीव होते. यावर रामबाण उपाय म्हणजे दूध, हळद आणि साखर यांचे गरमागरम मिश्रण. दररोज रात्री हळद दूध पित असाल तर सहसा ही समस्या तुम्हाला कधीच जाणवणार नाही. यासोबत लवंग चघळण्यानेही घास दुखीवर मात करता येईल.

घास खवखवणे –

कोणत्याही फ्लूची लागण झाल्याची सुरवात ही घास खवखवणे पासून होते. अनेकदा यानंतर सर्दी येऊन ताप भरायला सुरवात होते. अश्यावेळी खडीसाखर आणि चिमूटभर कात यांचे मिश्रण जिभेवर ठेवून चघळावे. यामुळे आराम मिळून घास खवखवणे बंद होईल.

Ghasadukhi var gharguti upay, घसा दुखीवर घरगुती उपाय, घसा दुखणे, घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटणे, घास खवखवणे, खोकल्याची ढास येणे, घशात जळजळ, घसा बसणे, घरगुती उपाय, घराचा वैद्य, घरगुती उपाय, Gharguti Upay
Source – Health Tips

खोकल्याची ढास येत असल्यास –

तेलकट पदार्थ आणि पाकिटबंद गोष्टी खाल्याने तसेच फ्लूमुळे आपल्याला खोकल्याची ढास येते. यासाठी वेलदोडा कामी येईल. आख्खा सालासकट वेलदोडा गालात धरावा. तसेच कफ असल्याचा त्रास होत असल्यास छाती, पाठ शेकण्यानेही कफ सूटून येतो.

घशात जळजळ, घसा बसणे –

घशातील जळजळ बंद करण्यावर उपाय म्हणजे कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या गुळण्या. यामुळे घसा दुखणे, बसणे कमी कमी होत जाईल आणि आराम मिळेल.

आपल्या शरीरात असलेल्या प्रतिकार शक्तीमुळे घशाचे त्रास बऱ्याचदा आपोआप दूर होतात. त्यावर घरगुती उपायांची जोड देऊन आपण हा आजार बरा करू शकतो. वरील सांगितलेल्या उपायांमुळे किंवा इतर कोणत्याही घरच्या उपायांमुळे तुमचा त्रास कमी होत नसेल तर तात्काळ तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.


Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More