Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

रुबाबदार दाढी वाढवण्यासाठी भन्नाट उपाय

गेल्या अनेक वर्षांपासून एक भन्नाट ट्रेंड पाहायला मिळत आहे, तो म्हणजे पुरुषांचा दाढी वाढवण्याचा आणि याला सगळ्यात मोठं करण आहे ते पुरुषांची रुबाबदार आजच्या मुलींना जास्तच आवडते इतकी की अनेक मुली डेटिंग साईट ते लग्नाच्या प्रोफाइलवर अगदी स्पष्ट शब्दात लिहितात की रुबाबदार दाढी असणाऱ्याला अधिक महत्व. या प्रकारामुळे मुलांनी आता रुबाबदार दाढी वाढवण्यासाठी अक्षरशः कंबर कसली आहे.

अनेक तरुणांना नैसर्गिकरित्या उत्तम केसांची वाढ होत असल्याने याचा आनंद घेता येत आहे पण ईच्छा असूनही बाकी तरुणांना ही स्टाईल करता येत नाहीय. बाजारातील अनेक तेलापासून ते WhatsApp University मधील अनेक कोर्स करून सुद्धा पाहिले पण रुबाबदार दाढी काही येईना. चिंता करू नका, आज InfoBuzz तुम्हाला सांगणार आहे भन्नाट आणि घरगुती उपाय ज्यामुळे तुम्हालाही येईल रुबाबदार दाढी. चला तर पाहूया How to grow beard fast

दाढी वाढवण्याचे भन्नाट उपाय

दाढी वाढवण्याचा उपाय 01

चेहऱ्यावर योग्य आकारात केस येण्यासाठी आणि त्याची वाढ भारदस्त होण्यासाठी सगळ्यात आधी तुमचा चेहरा स्वछ आणि घातक रसायनापासून मुक्त हवा. यासाठी दिवसातून 2-3 वेळा चेहरा स्वछ पाण्याचे धुवा तर प्रवास करत असाल तर चेहऱ्याच्या सरंक्षणसाठी काहीतरी घाला यामुळे नैसर्गिकरित्या दाढी येण्याच्या शक्यता वाढतात.

beard, How to grow beard fast, home remedies to grow beard faster,  रुबाबदार दाढी, रुबाबदार दाढी वाढवण्यासाठी, Simple tips to grow thicker beard, Grow Thicker Beard Faster, tips to grow beard in marathi, dadhi vadhavnyache upay marathi, Beard Hair Growth, home remedy, Natural Remedy, Hair Care Tips

दाढी वाढवण्याचा उपाय 02

खोबरेल तेल आपण दररोज डोक्याच्या केसांना लावतोच याचा थोडा वेगळ्या पद्धतीने दाढीसाठी उपयोग करायचा आहे. कढीपत्त्याची काही पाने खोबरेल तेलात मिसळून त्याला उकळी द्या, थंड झाल्यानंतर त्याने दाढीच्या भागात मसाज करा. यानंतर चेहरा धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावरील केस वाढण्यास पोषक वातावरण तयार होईल.

दाढी वाढवण्याचा उपाय 03

आवळा आपल्या दाढीच्या वाढीसाठी महत्वाचा आहे. आहारात आवळ्याचा समावेश केल्याने मदत होईल पण आवळ्याच्या तेलाने चेहऱ्यावर दररोज 20 मिनिटे मसाज केल्याने आपल्याला जास्त फायदा होईल. फक्त आवळ्याच्या तेलाचा उपयोग केल्याने त्रास होऊ शकतो त्यामुळे तिळाच्या तेलाचा त्यात उपयोग करावा.

दाढी वाढवण्याचा उपाय 04

सगळ्यात सोपा दाढी वाढवण्याचा घरगुती उपाय म्हणजे दूध. कच्चे दूध दररोज रात्री चेहऱ्यावर अगदी सॉफ्टपने लावा. यामुळे केसांची अगदी रुबाबदार वाढ होण्यास मदत होईल.

दाढी वाढवण्याचा उपाय 05

dadhi vadhavnyache upay marathi साठी गाजर हा तुमच्यासाठी महत्वाचे आहे. आहारात भरपूर गाजरे खा सोबतच गाजराच्या ज्यूस सुद्धा परिणामकारक ठरेल. गाजर वर्षभर मिळत नसल्याने ज्यावेळी गाजराचा सिझन असेल तेव्हा भरपूर गाजर खाऊन घ्या.

दाढी वाढवण्याचा उपाय 06

लिंबू, काळी मिरी पावडर आणि मध यांचं मिश्रण दाढीच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. याचं मिश्रण करून चेहऱ्यावर लावावे आणि 5 मिटींनानंतर धुवून चेहरा स्वच्छ करावा. रात्री मिश्रण लावून ते रात्रभर ठेवण्याचे टाळावे.

beard, How to grow beard fast, home remedies to grow beard faster,  रुबाबदार दाढी, रुबाबदार दाढी वाढवण्यासाठी, Simple tips to grow thicker beard, Grow Thicker Beard Faster, tips to grow beard in marathi, dadhi vadhavnyache upay marathi, Beard Hair Growth, home remedy, Natural Remedy, Hair Care Tips

दाढी वाढवण्याचा उपाय 07

रोज 1 तास शरीरासाठी देऊन व्यायाम करण्याचे अनेक फायदे तुम्हाला माहीत आहेतच ते नव्याने सांगण्याची गरज नाही. दररोजच्या या व्यायामामुळे तुमच्या केसांची योग्य वाढ होण्यास मदत होते. कसं काय ? तर दाढीचा वाढीसाठी शरीरात टेस्टोस्टेरॉन बुस्ट होणे गरजेचे आहे आणि व्यायाम अभावी ते होत नाही त्यामुळे रोज 1 तास व्यायाम गरजेचा.

दाढी वाढवण्याचा उपाय 08

चिंता मुक्त जीवन. हसत खेळत तुमचे आयुष्य जगात असाल तर तुम्हाला फार ताण येणार नाही आणि शरीरातील सर्व क्रिया अगदी सुरळीत चालू राहतील. यामुळे तुम्हाला नैसर्गिकरित्या योग्य वाढ झालेली दाढी येईल. त्यामुळे जास्तीत जास्त चिंता मुक्त किंवा तणावमुक्त जीवन जगा.

दाढी वाढवण्याचा उपाय 08

तुमच्या शरीरातील चांगल्या आणि वाईट अश्या दोन्ही बदलांसाठी तुमचा आहार कारणीभूत आहे. म्हणूनच केसांच्या वाढीसाठी योग्य आहार घेणे महत्वाचे आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रोटिन्स असावेत ज्यामुळे दाढीच्या वाढीला पोषक घटक मिळून तिला गती मिळेल. जास्तीतजास्त संतुलित आणि प्रोटिन्सयुक्त पदार्थाचा आहारात समावेश करा.

दाढी वाढवण्याचा उपाय 09

जस तुम्ही डोक्यावरील केसांची काळजी घेता अगदी त्याच प्रमाणे दाढीची पण काळजी घ्या. त्यांना योग्य मसाज करा. अनेक लोकांना गैरसमज आहे की शाम्पू फक्त डोक्याच्या केसांना करतात, पण दाढीच्या केसांना शाम्पू करणे तितकेच गरजेचे आहे.

beard, How to grow beard fast, home remedies to grow beard faster,  रुबाबदार दाढी, रुबाबदार दाढी वाढवण्यासाठी, Simple tips to grow thicker beard, Grow Thicker Beard Faster, tips to grow beard in marathi, dadhi vadhavnyache upay marathi, Beard Hair Growth, home remedy, Natural Remedy, Hair Care Tips

दाढी वाढवण्याचा उपाय 10

अगदी शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा. तेलकट आणि फॅटी पदार्थ टाळा. शक्यतो बाहेरील पदार्थ खाण्याचे पूर्णतः बंद करा. सिगरेट आणि दारू टाळा यामुळे तुम्ही आरोग्यादायी राहून नैसर्गिक प्रक्रियांना अडचणी येणार नाहीत.


Disclaimer – विविध तज्ज्ञांशी बोलून आरोग्यविषयक माहिती गोळा करण्यात आली आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ला असू शकत नाही. आपल्याला अति त्रास जाणवत असल्यास किंवा प्रयोग करण्याआधी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा.

Leave A Reply

Your email address will not be published.