Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

तुम्ही एक टीम लीडर आहात हे जगाला असं दाखवून द्या

नेतृत्व (Leadership) हे परिस्थितीतून मिळत नाही तर आपल्यामध्ये नेतृत्वगुण आहे याची जाणीव करून द्यावी लागते किंवा ते सिद्ध करावे लागते.

नेतृत्वगुण (Leadership qualities) हा व्यक्तिमत्व फुलण्यासाठी महत्त्वाचा गुण असतो. कोणत्याही यशाला गवसणी घालताना आपल्यातील नेतृत्वगुण कमी असून चालणार नाही. नेते घडवता येत नाहीत तर जन्मालाच येतात असेही म्हटले जाते. पण कोणत्याही क्षेत्रातील नेता हा त्याच्यातील अंगभूत गुण फुलवल्यामुळेच नेत्याच्या पदापर्यंत पोहोचू शकतो हे तथ्यही नाकारता येत नाही.

थोडक्यात नेतृत्वगुण अंगी बाणवण्यासाठी आपल्या स्वतःवर मेहनत घ्यायला हवी. नेता मग तो राजकारणातला, उद्योगातील किंवा नोकरी व्यवसायातील असो त्याच्या अंगी तीन गुण असणे महत्त्वाचे आहे. १. जबाबदारीची जाण, २. इतरांप्रती आदरभाव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कल्पकता, सर्जनशीलता.

Qualities of a Good Leader, good leadership qualities, leadership qualities essay in marathi, leadership skills, what makes a good leader, leadership qualities in marathi, Characteristics of a Good Leader, नेतृत्वगुण, नेतृत्व विचार, नेतृत्व गुण मराठी, लीडरशिप गुण, नेता कसा असावा, नेतृत्व शैली, लीडर कसा असावा, लीडरशिप गुण, टीम लीडर

नेतृत्व हे परिस्थितीतून मिळत नाही तर अनुयायांच्या पाठिंब्यामुळे नेतृत्वाची माळ गळ्यात पडते. त्याआधी आपल्यामध्ये नेतृत्वगुण (Leadership Qualities) आहे याची जाणीव करून द्यावी लागते किंवा सिद्ध करावे लागते.

तुमच्यात नेतृत्वगुण आहेत याची जगाला अश्याप्रकारे जाणीव करून द्या (How to prove you have Leadership Qualities)

सकारात्मक विचार (Think Positive)

काम करताना लक्षपूर्वक केले तरीही त्रुटी राहू शकतात. कामाच्या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण होते त्यावेळी नेतृत्वाचा कस लागतो. शांत राहून खंबीरपणे आलेली संकटाची परिस्थिती हाताळणे ही खरी कसोटी असते. समोर आलेल्या परिस्थितीचे योग्य विश्लेषण करून, नुकसान भरून काढून ध्येय कसे गाठता येईल यासाठी सकारात्मक विचार केला पाहिजे.

आत्मपरीक्षण (Introspection)

नेतृत्व म्हणजे समुहाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी असते. म्हणूनच आत्मपरिक्षण फार महत्त्वाचे आहे. आपल्यातील कमतरता, मर्यादा, तसेच मेहनतीची तयारी, ज्ञानाच्या कक्षा या सर्वांची जाणीव ठेवून त्या आजमावून पाहायला हव्यात.

जोखीम (Risk)

तुमच्या ग्रुपला सोबत घेऊन लक्ष्य साध्य करताना येणाऱ्या सर्व अडचणींतून मार्ग काढणे, तसेच आर्थिक अडचण सोसण्याचीही तयारी आणि क्षमता नेत्याच्या अंगी असायला हवी.

झटपट निर्णय (Instant Decision Making)

झटपट निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे घाईने निर्णय घेणे नव्हे. तर ध्येय साध्य करण्यासाठी योग्य तो निर्णय सर्वंकष विचार करून वेळेत घेणे. अर्थात त्या निर्णयाची सर्व जबाबदारी ही नेत्यावरच असते आणि त्याने ती स्वीकारणे अपेक्षित असते.

Qualities of a Good Leader, good leadership qualities, leadership qualities essay in marathi, leadership skills, what makes a good leader, leadership qualities in marathi, Characteristics of a Good Leader, नेतृत्वगुण, नेतृत्व विचार, नेतृत्व गुण मराठी, लीडरशिप गुण, नेता कसा असावा, नेतृत्व शैली, लीडर कसा असावा, लीडरशिप गुण, टीम लीडर
मर्यादित वर्तन (Limited behavior)

टीमला बरोबर घेऊन जाताना प्रत्येक सदस्याला आपुलकीने वागवणे, त्यांच्या कामातील चुका योग्य वेळी मर्यादेत राहून दाखवल्या तर कामातही अडथळे निर्माण होत नाहीत. लीडर म्हणून सहकाऱ्यांच्या मनात आपला आदर दुणावतो. आपल्या भावना व्यक्त करताना संयमपणा बाळगला पाहिजे.

शिकण्याची वृत्ती (Learn from others)

नेता (Leader) म्हणून कार्यरत असतानाही दुसऱ्याकडून शिकण्याची वृत्ती सोडू नये. ती अंगी बाणवल्यास फायदाच होईल. जगात अनेक उत्तम सकारात्मक व्यक्ती आहेत ज्या त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उत्तम नेता मान्य झाल्या आहेत. अशा अनेकांकडून आपल्याला चांगल्या गोष्टी अंगीकारता येऊ शकतात.

आरंभशील (Initiative)

नेतृत्व करत असताना अनेक गोष्टींची जबाबदारी असतेच शिवाय आरंभशील वृत्ती अंगी असावी. लक्षात घ्या आरंभशूर पणा नेतृत्वाला घातक असतो. तर आरंभशीलता ही आपण जबाबदार, कर्तव्यदक्ष असल्याची जाणीव करून देतात.

जबाबदारीचे विभाजन (Division of responsibilities)

नेतृत्व करतो म्हणजे सर्व गोष्टीत स्वतःच जातीने लक्ष द्यायला हवे असे नाही. टार्गेट पूर्ण करण्यासाठी काम अपेक्षित वेळेत आणि दर्जात्मक होण्यासाठी टीम मधील सदस्यांनी सहभागी होणे आवश्यक असते. नेतृत्व करताना सदस्यांच्या क्षमता आणि अनुभव लक्षात घेऊन त्यांना कामाची विभागणी करून त्यांच्यावर जबाबदारी सोपवा. तसेच ठरलेल्या निकषांप्रमाणे ते काम कसे पूर्ण करता येईल याचेही स्वातंत्र्य द्या.

यामुळे कामाचा वेग आणि दर्जा दोन्हीही कायम ठेवता येतो. सदस्यांनाही आपल्यावरील जबाबदारीची जाणीव होते आणि कामाचे स्वातंत्र्य मिळाल्याने दर्जा टिकून ठेवता येतो.

प्रोत्साहन (Encourage)

गटनेता म्हणून प्रत्येकाला प्रोत्साहन देऊन कामाचा दर्जा, वेग टिकवून ठेवणे हे देखील जमवावे लागते. सहकाऱ्यांच्या कष्टांची योग्य दखल योग्य वेळेला घेऊन त्याची प्रशंसा केली पाहिजे. कर्मचाऱ्यांच्या अडचणीत त्यांना मदतीचा हात देऊन त्यांना कामासाठी प्रोत्साहन द्यावे.

संवाद क्षमता (Communication)

कामाच्या ठिकाणी विविध प्रकारच्या लोकांना हाताळावे लागते. भिन्न स्वभाव एकत्र येत असल्याने कामाच्या ठिकाणचे वातावरण खेळीमेळीचे राखण्यासाठी नेता म्हणून प्रयत्न करायला हवेत. समूहातील प्रत्येक सदस्याशी आपुलकीने आणि नियमित संवाद साधला पाहिजे.

Qualities of a Good Leader, good leadership qualities, leadership qualities essay in marathi, leadership skills, what makes a good leader, leadership qualities in marathi, Characteristics of a Good Leader, नेतृत्वगुण, नेतृत्व विचार, नेतृत्व गुण मराठी, लीडरशिप गुण, नेता कसा असावा, नेतृत्व शैली, लीडर कसा असावा, लीडरशिप गुण, टीम लीडर

पदाचे अंतर मिटवूनही काही वेळा लीडरने साधलेल्या अनौपचारिक संवादामुळे सहकाऱ्यांमध्ये आपुलकी निर्माण होते. परिणामी कामातील सातत्य टिकून राहाते आणि गटाची कामगिरी उत्तम होते.

चांगला श्रोता (Good listener)

टीममधील प्रत्येक सदस्याचे मत ऐकून घेणे महत्त्वाचे आहे त्यातून सुसंवाद होऊ शकतो. टीममधील सदस्यांकडूनही नव्या संकल्पना कळू शकतात. सदस्यांना त्यांचे मत ऐकून घेतले जाते, विचारात घेतले जाते हे समजल्याने ते दुप्पट उत्साहाने काम करतात.

समूह परीक्षण (Group test)

टीममधील प्रत्येक सदस्याच्या कमतरता, मर्यादा, क्षमता आणि अडचणी जाणून घ्यायला पाहिजे. त्यानुसार प्रत्येक सदस्याला त्याचे काम,जबाबदारी ठरवून देता येते. प्रत्येकाचे अनुभव, शैक्षणिक क्षमता, शारिरीक-मानसिक क्षमता पडताळून त्याविषयी चर्चा केल्यास, सदस्यांना नेतृत्वाचा विश्वास वाढतो.

प्रामाणिक (Honest)

लीडरने आपले वर्तन आणि विचार यामध्ये प्रामाणिक असले पाहिजे. सहकाऱ्यांना त्याची जाणीव झाल्यास संघ नेतृत्व अधिक परिणामकारक ठरते. नेतृत्व करत असूनही आपल्या चुका सहकाऱ्यांसमोर मान्य केल्यास सहकाऱ्यांना आपल्या प्रामाणिकपणाची साक्ष पटते.

विश्वासार्हता (Reliability)

आपल्या वागण्या बोलण्यातूनच विश्वासार्हता निर्माण होऊ शकते. नेता म्हणून अचूक काम, वक्तशीरपणा आणि उत्तम वर्तन याच्या जोरावर प्रत्येक सहकाऱ्याच्या विश्वासाला पात्र ठऱता येते. आणि नेता म्हणून सहकाऱ्यांसमोर आदर्शही निर्माण करता येतो.

विनोदबुद्धी (Sense of humour)

कामाचे लक्ष्य गाठताना तणाव हा प्रत्येकालाच जाणवतो. मात्र तणाव जाणवू न देता वातावरण हलकेफुलके ठेवून परिस्थिती आपल्या हातात ठेवता येते. विनोदबुद्धीचा वापर करून कोणालाही न दुखावता कठीण परिस्थितीला सहजपणे सामोरे जाता येईल.

Qualities of a Good Leader, good leadership qualities, leadership qualities essay in marathi, leadership skills, what makes a good leader, leadership qualities in marathi, Characteristics of a Good Leader, नेतृत्वगुण, नेतृत्व विचार, नेतृत्व गुण मराठी, लीडरशिप गुण, नेता कसा असावा, नेतृत्व शैली, लीडर कसा असावा, लीडरशिप गुण, टीम लीडर
बोलण्याची कला किंवा वक्तृत्व (The art of speaking)

बोलण्यातून सहकाऱ्यांच्या मनाचा ठाव घेता आला पाहिजे. त्यासाठी उत्तम वक्तृत्वगुण असलेच पाहिजेत. बोलण्यातील सुसुत्रता, मुद्देसूद आणि कळकळ ही समोरच्या पर्यंत पोहोचली पाहिजे.

भाषाही सर्वांना समजेल अशी सोपी वापरून प्रभावीपणे मुद्दे मांडून इच्छित ध्येयाची वाटचाल कशी संघभावनेने करायची आहे हे प्रत्येकाच्या मनात रूजवले पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.