Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

पावसाळ्यात वाहनांची अशी घ्या काळजी.

मान्सून महाराष्ट्रात येऊन दाखल झाला आहे याची जाणीव सगळ्यांना गेल्या चार पाच दिवसाचा पाऊस पाहून झालीच असेल. पावसाळ्यात व्हायरल फ्लू पासून कशी काळजी घायची याबाबत मागील लेखात आपण बोललो. यानंतर सगळ्यात मोठा धोका आहे तो पावसाळ्यात रस्त्यावर वाढणारे अपघात. हे अपघात टाळण्यासाठी काही उपाय तर काही खबरदारी घेणे घरजेचे आहे. (Take Care Of Your Car) थोडी खबरदारी घेतल्यानेच दुर्घटना टळू शकतात.

आजच्या या लेखात इन्फोबझ्झ सोबत पहा पावसाळ्यात वाहनांची कशी घ्यायची काळजी.

वाहनांची वेळेवर सर्व्हिसिंग

तुमच्याकडे कार असो किंवा बाईक, सगळ्यात आधी जवळच्या मेकॅनिककडे जाऊन तुमच्या वाहनांची चांगल्या प्रकारे तपासणी करा आणि गरजेच्या गोष्टींची पूर्तता करून घ्या. पावसाळ्यात आपले वाहन कोणत्याही प्रॉब्लेम शिवाय चालण्यासाठी सर्व्हिसिंग करणे गरजेचे आहे.

उत्तम टायर

या पावडल्यात तुमच्या कारला किंवा बाईकला बाहेर काढण्याआधी त्याच्या टायरची तपासणी नक्की करा. तुमच्या गाडीचे टायर झिजले असतील किंवा ग्रीप पकडण्यास त्रास देत असतील तर तात्काळ बदलून घ्या. पावसाळ्यात जास्तीत जास्त अपघात टायर घसरून होत असल्याने ही काळजी घेणे आवश्यक आहे.

Car care, पावसाळ्यात वाहनांची काळजी, टायरची तपासणी, pavsala, bike care in mansoon, bike care, gadichi kalji ghya, mansoon

वाहन सावकाश चालावा

तुम्ही कार घेईन बाहेर पडला आहेत तर इतर वेळेपेक्षा वाहन हळू चालावा. पावसाळ्यात पाण्यात वाहन सांभाळू शकाल इतकाच वेग असावा. घाईत पाण्यामुळे लवकर ब्रेक लागत नाहीत आणि अपघात होतात.

उत्तम दर्जाचे हेल्मेट

तुम्ही बाईकवर बाहेर पडत आहेत तर हेल्मेट घालणे आवश्यक आहे. पावसाळ्यात तर बाईक स्लिप होण्याचे प्रमाण अधिक असल्याने हेल्मेट असायलाच हवे. पावसाळ्यात हेल्मेटच्या काचेवर धुके जमा होतात त्यामुळे अँटी फोग हेल्मेट घेतल्याचे खात्री करा.

ब्रेकवर लक्ष

आपण मागच्या अनेक मुद्यांमध्ये ब्रेक बाबत बोललो आहे. पावसाळ्यात गाडीच्या टायर ओल्या झाल्यामुळे ब्रेक तेवढ्या तातडीने लागत नाही त्यामुळे सतत तुमच्या ब्रेकची तपासणी करून घ्या. ब्रेक मध्ये पाणी जाऊन तो खराब होण्याचा धोका असतो.

पाण्यात उतरू नका.

अनेकदा वाहचालक पाण्यातून गाडी घालण्यासाठी पाण्यात उतरून त्याचा अंदाज घेतात. लक्षात घ्या हे अत्यंत धोकादायक कृत्य आहे. पाण्याच्या वेग प्रचंड असल्यामुळे तुम्हाला ही कृती महागात पडू शकते. मुळात रस्त्यावर पाणी वाहताना दिसत असल्यास त्यावरून वाहन नेण्याचा धाडसी प्रयोग करू नका.

चालताना योग्य अंदाज घ्या.

मुंबई आणि पुण्यासारख्या अनेक शहरात भुयारी गटारे आहेत तर त्यांचे मॅनहॉल रस्त्यावर आहेत. पावसाच्या पाण्याच्या वेगाने याची झाकण वाहून जातात त्यामुळे वाहन नेताना किंवा त्या तिथून चालताना योग्य अंदाज घ्या. मॅनहॉल मध्ये पडून गडमरून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.