Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

पावसाळ्यात मेकअप जास्त वेळ टिकवण्याचे भन्नाट उपाय.

उन्हाचा तडका जसा जसा वाढू लागतो तसं तसं प्रत्येकाला पावसाळ्याची आस लागते. पावसाळा हा तसा सगळ्यांच्या आवडीचा ऋतू. मस्त थंडगार हवा, प्रसन्न वातावरण, मातीचा दरवळणारा सुगंध आणि बरसणाऱ्या सरी पण या सगळ्यात स्टायलिश राहण्यासाठी होणारा मेकअप मात्र धोक्यात येतो. पावसाळ्यात पाण्यामुळे चेहरवरच्या मेकअपचे कधी तीन तेरा होतील याचा नेम नाही त्यामुळे विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. या लेखात आम्ही सांगत आहे पावसाळ्यात मेकअप जास्त वेळ टिकवण्याचे भन्नाट उपाय.

  • मेकअप करण्याआधी तुमचा चेहरा स्वछ धुवून घ्या. कोणतेही केमिकल प्रॉडक्ट न वापल्यास उत्तम.
  • पावसाच्या पाण्यापासून काळजी घेण्यासाठी वॉटरप्रूफ कॉस्मेटिक प्रॉडक्ट वापरणे जास्त सोयीस्कर. खास पावसाळी साहित्य तुम्हाला मार्केट मध्ये मिळेल.
  • मेकअप जास्त वेळ टिकून राहण्यासाठी साधी ट्रिक म्हणजे बर्फ. बर्फाचे तुकडे चेहऱ्यावरन फिरवल्याने तुम्हाला मदत होईल.
पावसाळ्यात मेकअप, monsoon and makeup, monsoon and makeup tips, Mansoon makeup tips, mansoon, मेकअप, मेकअप जास्त वेळ टिकून राहण्यासाठी, सौंदर्य खुलवण्यासाठी, Everyday Monsoon Makeup, Water Proof Makeup
Source – Health and Beauty Tips
  • मेकअपसाठी वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर लावणे उत्तम ज्यामुळे घाम येण्याचे प्रमाण कमी होईल. तर पावसाळ्यात चेहऱ्यावर फाऊंडेशन करणे पूर्णपणे टाळा अन्यथा चेहऱयावर पॅचेस दिसतील.
  • पावसाळ्यात हवेत आद्रता अधिक असते त्यामुळें क्रीम बेस सौंदर्यप्रसाधने वापरणे टाळा. अन्यथा आद्रतेमुळे चेहरा अधिक तेलकट दिसू शकतो.
  • लिपस्टिक तर मेकअपचा आत्मा आहे. पावसाळ्यात लाईट रंगाची लिपस्टिक वापरणे अधिक उत्तम तर तुमचे ओठ मुलायम करण्यासाठी पारदर्शक लीप ग्लास वापरा.
  • सौंदर्य खुलवण्यासाठी डोळ्यांचा मेकअप महत्वाचा आहे पण पावसाळ्यात शक्यतो काजळ वापरू नका. यापेक्षा आयब्रो पेन्सिलचा वापर करू शकता.
  • तुमच्या केसांचा पोत खराब होऊ नये यासाठी तेल वापरा.

Leave A Reply

Your email address will not be published.