Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

मराठी मुलुख जिंकायला आला अन मराठ्यांनी खंडणी वसूल करून परत पाठीवला.

शंभुराजेंच्या स्वर्गवासानंतर औरंगजेब अक्षरशः चवताळला होता, आता मराठी मुलुख जिंकून घ्याचाच या त्वेषाने मुघलांचे महाराष्ट्रात आक्रमण चालू झाले. यावेळी छत्रपती राजाराम महाराज जिंजीच्या प्रवासात होते त्यामुळे मुघलांसाठी मराठी मुलुख म्हणजे मोकळे मैदानात वाटले. मराठे नक्कीच खचले होते पण हरले नव्हते. यावेळी संताजी-धनाजी, शंकरजी नारायण आणि रामचंद्रपंत यांनी कारभार हाती घेत मराठ्यांच्यात उत्साह पैदा केला आणि हळू हळू मराठे मुघलांच्या हाती गेलेला प्रदेश पुन्हा एकदा स्वराज्यात घेऊ लागले. मराठा इतिहासातील (Maratha History) या मोहिमेत सर्जाखानचा पाडाव हा विशेष महत्वाचा.

सर्जखान मुळात आदिलशाहीतील मातब्बर सरदार, मुघलांनी आदिलशाहीला धूळ चारल्यानंतर हा त्यांच्या चाकरीत आला. औरंगजेब त्याच्यावर लय खुष. सर्जखानाने औरंजेबासाठी अनेक लढाया जिंकल्या होत्या, त्याच्या या कामगिरीवर खुष होऊन औरंगजेबाने त्याला “रुस्तमखान” हा ‘किताब देऊन मराठी मुलुख जिंकण्याच्या मोहिमेवर धाडले. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात हा वाईच्या भागात वावरत होता, त्या वेळीच त्याच्याशी लढताना सेनापती हंबीरराव मोहिते तोफेचा गोळा लागून धारातीर्थी पडले.

मराठ्यांचा सेनापती मारला या बातमीने तर त्याचे वजन आणि दरारा अजूनच वाढला.

असा हा मुघलांचा मातब्बर सरदार अख्खा मराठी मुलुख जिंकणार अश्या भावात महाराष्ट्रातच येऊन मोठ्या दिमाखात वावरत होता.

संताजी-धनाजी, सर्जखान, मराठा इतिहास, Maratha History, Santaji, Dhanaji, मराठे,
Source – YouTube

यावेळी मराठा सैन्य अनेक ठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत होते. यामुळे पद्धतीत बदल करत सैन्याचे तीन विभाग केले गेले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी राखीव ठेवण्यात आले. हे सैन्य संबंधित स्थळापासून काहीच अंतरावर होते. तिकडे संताजी घोरपडे आपल्या तुकडीसह रुस्तमखानावर चालून गेला. रुस्तमखानाने गजदल आघाडीवर ठेवले होते. ( गजदल म्हणजे हत्तीची तुकडी ) याचाच फायदा घेत मराठ्यांनी बंदुकीने मारा केला, गोळ्यांच्या वर्षामुळे रुस्तमखानाचे हत्ती मागच्या दिशेने पळू लागले आणि अनेक मुघल सैन्य त्यांच्या पायी चिरडले गेले. ते पाहून रुस्तमखानाने आपल्या सैन्यासाहित धावून आला आणि मराठ्यांनी आपले गजदल पुढे केले त्यामुळे मुघलांवर पुन्हा एकदा नामुष्की ओढवली. मुघलांचे घोडे घाबरून उधळू लागले, खानाच्या सैन्याने घोड्यावर यावर घालून लढण्याचा प्रयत्न केला पण घोडं काही मैदानात थांबेना. या सगळ्यात मराठे गठ्याने अचानक येत आणि मुघल सैनिकाला शांत करून पुढे जात.

आपल्याला इथं, मराठ्यांच पारडं जड दिसत आहे पण अजूनही मुघलांकडे मातब्बर सरदार रुस्तमखान आणि अफाट सैन्यबळ होत आणि मराठे फक्त मूठभर.

काही वेळ असाच गेल्यानंतर दोन्हीकडील सैन्य स्थिरावले. रुस्तमखानाने खेळी बदलत आपल्या पांगलेल्या सैन्याला एकत्र आणले आणि संताजी असलेल्या मराठ्यांच्या मुख्य ताफ्यावर जोरदार हल्ला केला. जोरदार झटपट होऊ लागली आणि मुघलांचे पारडे जड होऊ लागले. यावेळी लढाई ऐन रंगात अली होती आणि अचानक मराठे युद्धभूमी सोडून पळू लागले. मुघलांना काही कळेना, आपला जोर पाहून मूठभर मरहट्टे घाबरले आणि आता जीव वाचवण्यासाठी पळून जात आहेत असा सरळ अर्थ लावला. यामुळे मुघलांच्यात फुकटच स्फुरण चढलं. त्यांनी मराठ्यांचा पाठलाग चालू केला. रुस्तमखान मात्र उरलेल्या सैन्यासोबत तिथेच बसला.

मराठे घाबरून पळाले आणि आता आपले लवकरच विजयाची बातमी घेऊन येणार या विचारात राहिलेले मुघल सैन्य अगदी निर्धास्त होते. इतक्यात अचानक मराठ्यांच्या दुसरा तुकडीने जोरदार प्रहार केला. आणि मुघलांच्यात एकाच खळबळ उडाली. नव्या दमाचे मराठा सैन्य अक्षरशः मुघलांवर तुटून पडलं, आणि त्यांच्या छावण्या लुटायला सुरवात केली. पहिल्या क्षणापासून गनिमी काव्याच्या जोरावर आघाडी घेतलेल्या मराठ्यांनी रुस्तमखानच्या सैन्याची अक्षरशः दाणादाण उडवली होती. यावेळी ठरल्याप्रमाणे सातारच्या किल्ल्यातून हंबीरराव मोहिते (दुसरे) यांची तुकडी बाहेर पडली अन मुघलांवर शेवटचा प्रहार केला. मराठी मुलखात मोठ्या दिमाखात वावरणारा सर्जखान उर्फ रुस्तमखान मराठ्यांच्या ताब्यात आला.

स्वतःचा जीव वाचवण्याच्या आकांताने सर्जखानाने मराठ्यांना एक लाख होन खंडणी देण्याचं काबुल केलं आणि ते देईपर्यंत आपली आई आणि मुलाला ओलीस ठेवून आपली सुटका करून घेतली. पुढे हा मातब्बर सरदार कसाबसा सांगोल्यात पोचला आणि त्याने औरंगजेबला निरोप धाडला पण खानाने अश्याप्रकारे नामुष्की पदरात घेऊन खंडणी देण्याचे कबूल केलेलं कळताच बादशाह चवताळला आणि सर्जखानाला फर्मान धाडले.

स्वतःचा जीव मुठीत घेऊन पळलेला सर्जखान पुन्हा मराठ्यांच्या नादी लागल्याचे ऐकवीत नाही….


Leave A Reply

Your email address will not be published.