प्रसिद्ध कंपन्यांच्या लोगो मागे दडलेला अर्थ, तुम्ही विचारही करू शकणार नाही…
आदिदास, अँपल, टोयोटा, बीएमडब्लू, कोकाकोला यांसारखे प्रसिद्ध ब्रँड आपल्या बघण्यात येतंच असतात, पण आपल्याला माहित आहे का ह्या कंपन्यांच्या लोगोचा खरा अर्थ काय आहे ? प्रत्येक लोगोच्या मागे डिझाईन, रंग या प्रत्येकाचे एक वेगळेपण आहे. प्रत्येक कंपनीचा लोगो हा फक्त आपले नाव करण्यासाठी तयार केलेले नसून त्यामागे काहीतरी अर्थ दडलेला असतो. प्रत्येक लोगोचे एक वेगळेपण आहे. चला, तर जगातल्या काही प्रसिद्ध कंपन्यांच्या लोगोची माहिती घेऊया.
HYUNDAI
खूप लोक विचार करतात कि साऊथ कोरिया ची कंपनी HUYNDAI चा लोगो खूप साधा आहे. या लोगोत इंग्रजीतील केवळ H अक्षर दिसून येते. पण तसे बघायला गेल्यास हे केवळ H अक्षर नसून या अक्षरात दोन व्यक्ती हात मिळवत आहेत. एक ग्राहक आणि एक कंपनीचा प्रतिनिधी.
ADIDAS
ADIDAS हे नाव Adolf Dassler या नावावरून घेण्यात आले आहे. कंपनीचा लोगो बऱ्याच वेळा बदलला गेला. पण लोगो मध्ये 3-Strips नेहमीच असत. ह्या स्ट्रिप्स आयत आकारात आहेत. 3-Strips ह्या डोंगराचा चेहरा दर्शवत आहे, जे समोर आव्हान आहे त्यांना खेळाडूंना सामोरे जायचे आहे.
VAIO
VAIO हि एक लॅपटॉप बनवणारी कंपनी आहे. या लोगोतील पहिले दोन अक्षर ऍनोलोग वेव्ह दाखवतात आणि शेवटचे दोन आकडे म्हणजे १० हा नंबर आहे असे दिसते. कारण १ (एक) आणि ० (शून्य) हे दोनच नंबर आहेत जे कॉम्पुटर भाषेत (Digital) वापरले जातात ज्याला बायनरी नंबर्स म्हणतात.
AMAZON
AMAZON बघताच क्षणी आपल्याला त्या लोगो मध्ये काहीच दिसत नाही, केवळ ऍमेझॉन हे नाव दिसते. पण या लोगोसाठी कंपनीची फिलॉसॉफी लक्षात घेऊन तयार केलेला आहे. लोगोतील ऑरेंज रंगातील तीर स्माईलचे चिन्ह दाखवतो, कारण कंपनी कोणत्याही प्रकारे ग्राहकांना खुश ठेवण्यासाठी लक्ष देते. हा ऑरेंज रंगातील तीर A पासून Z पर्यंतच आहे, म्हणजेच A to Z सगळ्या वस्तू आमच्याकडे मिळतात असे कंपनीला दाखवून द्यायचे आहे.
BASKIN ROBBINS
BASKIN ROBBINS हि जगभरातील सगळ्यात मोठी ICE CREAM बनवणारी कंपनी आहे. यातील B आणि R ह्या अक्षरांचा काही भाग हा गुलाबी रंगातून ३१ हा नंबर दाखवतो. याचे कारण म्हणजे हि कंपनी ३१ प्रकारच्या Flavors मध्ये ICE CREAMS बनवते.
TOYOTA
TOYOTA च्या लोगोत दिसणारे अंडाकृती गोल ग्राहकाचे हृदय आणि कंपनीचे हृदय दर्शवतात. एवढंच नव्हे तर तर ग्राहक आणि कंपनी यांचे एकमेकांसोबतचे संबंध आणि दृढ विश्वास हा लोगो दर्शवतो. तसेच निरखून बघितल्यास TOYOTA चा लोगो ‘T’ हे अक्षर देखील दर्शवतो.
पिंटरेस्ट या प्लॅटफॉर्म वर लोक फोटोज पोस्ट करत असतात आणि ते फोटोज आपल्या बोर्ड वर पिन करत असतात. म्हणून वेबसाईटच्या लोगो च्या P मध्ये पिन लपलेली तुम्हाला दिसून येईल.
BEATS
BEATS हि हेडफोन बनवणारी कंपनी असून त्यांचे हेडफोन तुम्ही जरूर वापरलेले असतील. त्यांच्या हेडफोनवर तुम्हाला b दिसून येईल. b हे अक्षर कंपनीचे नाव तर दर्शवतेच पण यातला गोल आकार माणसाचे कान दाखवतो आणि जणू कानावर हेडफोन घातले असे दिसून येते.
TOBLERONE
Toblorone हि जगातील प्रसिद्ध चॉकलेट कंपनी आहे. त्यांची मुख्य ब्रँच स्विझलॅण्ड मधील बर्न येथे आहे. यांच्या लोगो मध्ये पांढऱ्या रंगात अस्वल (Bear) आहे. या मागील कारण असे कि ज्या देशात हि कंपनी आहे, ते शहर सिटी ऑफ बेअर (अस्वल) या नावाने ओळखले जाते.
BMW
BMW या कंपनीच्या लोगोचा मधला भाग विमानाचा समोरचा फिरता पंखा दर्शवतो. कारण हि कंपनी आधी airlines चे इंजिन बनवत असे. पण खरे तर हे कि बव्हेरियाचा झेंडा देखील असाच आहे. बव्हेरिया हा जर्मनीचा भाग असून कंपनीची सुरवात तिथूनच झालेली आहे.
LG
हि साउथ कोरियाची इलेक्ट्रॉनिक कंपनी आहे. LG च्या लोगोत L हे अक्षर माणसाचे नाक दर्शवते तर गोल बिंदू डोळा दर्शवतो. थोडक्यात काय तर हा लोगो हसणाऱ्या माणसाचा चेहरा दर्शवतो.
EVERNOTE
EVERNOTE हे एक नोट्स लिहायचं एप्लिकेशन आहे. त्यात तुम्ही DOCUMENT देखील सेव्ह करू शकता. EVERNOTE च्या लोगो मध्ये हत्तीचे चित्र आहे. कारण आपल्याला सगळ्यांना माहित आहे कि हत्तीची मेमरी खूप शार्प असते. हत्ती खूप वर्षांपर्यंत काहीही लक्षात ठेऊ शकतात, म्हणून कंपनीने लोगो मध्ये हत्तीचा चेहरा वापरला आहे. तसेच लोगोत जसा हत्तीचा कान फोल्ड केला आहे तसेच आपण नोट्स बनवतांना पेज फोल्ड करतो.
COCACOLA
COCACOLA च्या लोगो मध्ये O आणि L अक्षराच्या दरम्यान तुम्ही डॅनिश झेंडा पाहू शकता. कोका कोलाने याचा मार्केटिंग कॅम्पेनसाठी वापर केला होता. कारण कोका कोला हि कंपनी याच देशात प्रथम चालू झाली होती.