हृदयावर मोफत शस्त्रक्रिया करणारं भारतातलं हॉस्पिटल

0
709
मोफत शस्त्रक्रिया, श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल, हृदयाच्या आकारात बांधलेलं रुग्णालय, Sri Sathya Sai Sanjeevani Hospital, Sri Sathya Sai Sanjeevani Hospital in marathi, फ्री हार्ट हॉस्पिटल

आजकाल चांगल्या प्रतीचे उपचार मिळण्यासाठी पैसे भरपूर खर्च करावे लागतात, ही वस्तुस्थिती आहे. श्रीमंत व्यक्ती त्याही परिस्थितीत कुटुंबाची निगा राखण्यासाठी महागड्या हॉस्पिटलमध्ये उपचार करूनही घेईल, मात्र गरीब व्यक्तींनी या महागड्या हॉस्पिटलमध्ये उपचार कसा घ्यायचा त्यांना हे सर्व परवडेल काय याचा विचार कुठलेही महागडे हॉस्पिटल करताना आज-काल दिसत नाही. पण या सगळ्यांमध्ये एक हॉस्पिटल असे आहे जे गरीब मुलांसाठी अगदी मोफत आहे.

होय भारतात आजही सेवाकार्य करणारी अनेक मंडळी उपस्थित आहेत. या हॉस्पिटलमध्ये भारतातीलच नव्हे तर भारताच्या बाहेरूनही लहान मुलं उपचारांसाठी येत असतात. या हॉस्पिटल चे नाव आहे “श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल”. हे देशातील एकमेव असे हॉस्पिटल आहे जे लहान मुलांच्या हृदय रोगांवर मोफत उपचार करते.

“श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल”. हे देशातील एकमेव असे हॉस्पिटल आहे जे लहान मुलांच्या हृदय रोगांवर मोफत उपचार करते.

या हॉस्पिटलची स्थापना नोव्हेंबर 2012 मध्ये करण्यात आली होती आणि त्याच वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये एका 13 वर्षीय मुलीवर यशस्वी उपचार देखील करण्यात आले. सुरुवातीला इथे कुठल्याही वयाच्या व्यक्तीवरती उपचार करण्यात येत होते पण नंतर फेब्रुवारी 2014 पासून येथे फक्त लहान मुलांवर उपचार करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून हे रुग्णालय लहान मुलांच्या हृदयाची काळजी घेत आहे.

मोफत शस्त्रक्रिया, श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल, हृदयाच्या आकारात बांधलेलं रुग्णालय, Sri Sathya Sai Sanjeevani Hospital, Sri Sathya Sai Sanjeevani Hospital in marathi, फ्री हार्ट हॉस्पिटल
Source – Justdial

तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे भारतातील असे रुग्णालय आहे जिथे कॅश काउंटरच नाही. म्हणजेच इथे राहणं, प्राथमिक उपचार, ऑपरेशन, खाणे सर्व मोफत आहे. या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या बारा वर्षापर्यंतच्या मुलांना दोन व्यक्तींसोबत तर, बारा वर्षांवरील मुलांना एका व्यक्ती सोबत राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था मोफत करण्यात येते.

रुग्णालयात बांगलादेश, पाकिस्तान, नायजेरिया, नेपाळ, श्रीलंका, अफगाणिस्तान, लायबेरिया, यमन येथील लहान मुलांवर देखील यशस्वी उपचार करण्यात आलेले आहेत.

या रुग्णालयात लहान मुलांच्या हृदय रोगावरती एकूण पंचवीस प्रकारचे ऑपरेशन केले जातात. याच ऑपरेशनचे प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये कमीत कमी 3 ते 15 लाख रुपये घेतले जातात. इथे तज्ञ डॉक्टरांची टीम आहे जी दिवसातून कमीत कमी पाच ऑपरेशन नक्कीच करते. ज्यातील तीन ऑपरेशन हे ओपन हार्ट सर्जरीचे असतात. रुग्णालय सुरू झाल्यापासून आजपर्यंत इथे 4500 पेक्षाही जास्त मुलांचे यशस्वी ऑपरेशन केले गेले आहे. या रुग्णालयात बांगलादेश, पाकिस्तान, नायजेरिया, नेपाळ, श्रीलंका, अफगाणिस्तान, लायबेरिया, यमन येथील लहान मुलांवर देखील यशस्वी उपचार करण्यात आलेले आहेत.

मोफत शस्त्रक्रिया, श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल, हृदयाच्या आकारात बांधलेलं रुग्णालय, Sri Sathya Sai Sanjeevani Hospital, Sri Sathya Sai Sanjeevani Hospital in marathi, फ्री हार्ट हॉस्पिटल
Source – Sri Sathya Sai Vrinda

हृदयाच्या आकारात बांधलेलं हे रुग्णालय जवळपास ३० एकर मध्ये पसरलेले आहे. इथे नर्सिंग कॉलेज देखील आहे. या परिसरामध्ये कला-संस्कृती, शिक्षा तसेच सामाजिक उत्थानाचे देखील कार्यक्रम घेतले जातात. येथील डॉक्टर या वास्तूला हॉस्पिटल न संबोधता “टेंपल ऑफ हे हीलिंग” असे संबोधतात. इथे काम करणारा प्रत्येक डॉक्टर ईश्वराकडे फक्त एवढेच मागतो की इथे येणाऱ्या प्रत्येक लहान मुलाचे हास्य त्याला परत कर…


*आपल्याला हा लेख कसा वाटला हे खाली कमेंट करून सांगा. आपल्याला इतर कोणत्या विषयावर वाचायला आवडेल त्याबाबतची कमेंट करा. टीम इन्फोबझ्झ लवकरच त्यावर लेख सादर करेल.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here