Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

दूध आवडत नसणाऱ्या माणसानेच देशात दुधाचा महापूर आणला

वर्गीस कुरियन यांनी भारतात “Operation Flood” चालवले होते. त्यांनी भारतामध्ये दुधाची अशी काही नदी आणली कि ज्यामुळे आज भारत देश दुधाच्या उत्पादनासाठी जगामध्ये पहिल्या क्रमांकावर येऊन पोहचला.

“Milk Man Of India”, “Father Of White Revolution” आणि भारताची सर्वात मोठी मिल्क कंपनी “AMUL” चे संस्थापक ज्यांना म्हटले जाते असे “डॉ.वर्गीस कुरियन”… वर्गीस कुरियन यांनी भारतात “Operation Flood” चालवले होते. त्यांनी भारतामध्ये दुधाची अशी काही नदी आणली कि ज्यामुळे आज भारत देश दुधाच्या उत्पादनासाठी जगामध्ये पहिल्या क्रमांकावर येऊन पोहचला. सोबतच “AMUL” कंपनी आज ६०० कोटी डॉलरची कॉपरेटिव्ह कंपनी बनली आहे, जिचे प्रॉडक्ट्स आज जगामधील ६० पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात केली जातात. तर चला पाहूया कसे डॉ. वर्गीस कुरियन यांनी त्यांच्या बळाच्या आणि बुद्धीच्या जोरावर आपल्या भारत देशाचे नाव पूर्ण जगामध्ये गाजवले.

डॉ. वर्गीस कुरियन कोण होते ?

डॉ.वर्गीस कुरियन यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२१ मध्ये केरळच्या ‘कोजिकोड’ या शहरामध्ये एका ख्रिश्चन परिवारामध्ये झाला. वर्गीसजी लहानपणापासूनच अभ्यासामध्ये हुशार होते. त्यांनी १९४० साली विज्ञान या विषयात बॅचलर डिग्री घेतली. डिग्री घेल्यानंतर त्यांनी काही वेळासाठी ‘TISCO’ म्हणजेच “Tata Steel Limited” मध्ये काम केले. वर्गीसजी यांनी काम करता करताच त्यांचे पुढचे शिक्षण सुरु ठेवले.

वर्गीसजींबद्दल एक खास गोष्ट सांगायची झाली तर, त्यांना डेअरी फार्मिंग मध्ये अजिबात रस नव्हता. पण, जेव्हा वर्गीसजी यांना डेअरी इंजियनीयरिंगसाठी भारत सरकारकडून स्कॉलरशिप मिळाली तेव्हा त्यांनी पहिले बंगलोरच्या “Imperial Institute Of Animal Husbandry And Dairy College” मध्ये ९ महिने शिक्षण घेतले आणि त्यांनतर भारत सरकारने विशेष ट्रेनिंगसाठी त्यांना “Michigan State University America” इथे पाठवले. त्या ठिकाणी डेअरी टेकनॉलॉजी मध्ये काम करताना त्यांना या विषयात रस वाढत जाऊ लागला आणि अमूलच्या स्थापनेच्या अगोदर वर्गीसजी १९५२ आणि १९५३ साली सरकारी कामासाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला गेले. तिथे त्यांनी मिल्क प्रोडक्शनचा अभ्यास केला.

अमेरिकेवरून भारतात परत आल्यावर ते भारत सरकारद्वारे संचालित केलेल्या डेअरी विभागात सहभागी झाले. त्याच्या पुढच्या वर्षी त्यांना त्यांच्या कर्मभूमी गुजरातमधील आनंदमध्ये पाठविले जिथे सरकारी अनुदानामध्ये चालत असलेल्या ‘क्रीमरी’ मध्ये डेअरी इंजिनियर बनविले गेले. हा असा काळ होता जेव्हा डेअरी उद्योग प्रायव्हेट हातात असायचा आणि शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाची योग्य किंमत दिली जात नसायची. या प्रायव्हेट कंपन्यांमुळे शेतकऱ्यांचे शोषण केले जात असायचे. वर्गीसजी यांना त्यांच्या नोकरीमध्ये काही रस राहिला नव्हता, म्हणून त्यांनी त्यांची सरकारी नोकरी सोडून दिली.

वर्गीसजी आनंदमधून जाणार होतेच तेवढ्यात, “Kaira District Co-operative Milk Producers” चे संस्थापक ‘त्रिभुवनदास पटेल’ यांनी त्यांना थांबवले आणि काही दिवस स्वतःसोबत काम करण्यासाठी मनवले. त्यासोबतच आनंद मधील शेतकऱ्यांनी वर्गीस कुरियनजी यांच्या कामावर जो विश्वास दाखवला होता त्यामुळे वर्गीसजी यांना शेतकऱ्यांची मदत करण्याची प्रेरणा मिळाली.

Operation Flood

डिसेंबर ते मार्चपर्यंत गायींच्या बछड्यांच्या जन्मामुळे दुधाचे उत्पादन जास्त होत असे. परंतु या वेळी दुधाची मागणी खूप कमी असायची, ज्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत असे. अशावेळी जर दुधाचे पावडरमध्ये रूपांतर केले तरी काम झाले असते, पण त्यावेळी फक्त गायीच्या दुधाचीच पावडर बनवण्याची टेक्निक होती. अशावेळी डॉ. वर्गीस कुरियन यांनी अमेरिकेतील त्यांच्या बॅचमेट ‘एच.एम.दलाया’ यांना आनंदमध्ये बोलवून घेतले आणि त्यांच्यासोबत काहीवेळ काम करण्यासाठी तयार केले. लगेचच एच.एम.दलाया यांनी म्हशीच्या दुधापासून Condense Milk आणि Skin Powder बनवण्याचा अविष्कार केला. जेव्हा एच. एम. दलाया आणि डॉ. वर्गीस कुरियन या रिसर्चमध्ये व्यस्त होते तेव्हा जगातील सर्व डेअरी तज्ञांनी हे काम असंभव आहे असे घोषित केले. परंतु, एच. एम. दलाया आणि डॉ. वर्गीस कुरियन यांनी हे काम संभव करून दाखविले.

एक खास गोष्ट म्हणजे पहिल्या क्रमांकाची डेअरी कंपनी “AMUL” चे नामकरण K.D.C.M.P.U.L. पासून “AMUL” हे नाव डेअरी लॅबोरेटरी मध्ये काम करण्याऱ्या एका केमिस्टने दिले होते, जो तिथेच काम करत होता. “AMUL” आत या “ Nestle” सारख्या विदेशी कंपनीला टक्कर देत होती जी कंपनी फक्त गायीच्या दुधापासून पावडर बनवत होती. डॉ. कुरियन आणि अमूल कंपनीच्या यशाचा भारत देशाचे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्यावर इतका प्रभाव पडला कि त्यांनी अमूलच्या उत्पादनांना संपूर्ण देशात प्रदर्शित करण्यासाठी “N.D.D.B. Dairy Services” ची स्थापना केली. त्यासोबतच त्यांनी डॉ. वर्गीस कुरियन यांना या संस्थेचा अध्यक्ष बनविले. या पदावर राहून त्यांनी “Operation Flood” सुरु केले. अमूल उत्पादनांना देशाच्या काही राज्यांमध्ये चालू केले, आणि भारताला जगभरात दूध उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावर नेवून ठेवले.

अनेक पुरस्काराद्वारे सन्मानित

डॉ. वर्गीस कुरियन यांच्या या कामगिरीसाठी, त्यांच्या या यशासाठी त्यांना “Ramón Magsaysay Award” जो आशियामधील सर्वात मोठा सन्मानित पुरस्कार आहे. त्यासोबतच वर्गीसजी यांना भारत सरकारद्वारे भारतातील सर्वात मोठा “पदमश्री पुरस्कार”, “पदमविभूषण पुरस्कार”, “पदमभूषण पुरस्कार” या पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात आले. तसेच, “World Dairy Expo” यांनी १९९३ मध्ये डॉ. वर्गीस कुरियन यांना “International Person Of The Year” म्हणून देखील निवडले.

डॉ. वर्गीस कुरियन यांच्याबद्दलची सर्वात खास गोष्ट म्हणजे, वर्गीसजी यांना दूध अजिबात आवडत नाही, त्यांना दुधाची चव अजिबात आवडत नाही. परंतु, याच “AMUL” ची चव आज भारताची ओळख बनला आहे. आज बघितले असता रोज सकाळी १३ हजार गावांमधून २७ लाख लोक AMUL मध्ये दूध घेऊन येतात. आज दुरून पहिले तर “AMUL” एक यशस्वी डेअरी ब्रँड वाटतो, पण यशाच्या या प्रवासात अमूलने आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या ग्रामीण शेतकऱ्यांचे आयुष्य बदलून टाकले.

देशाला अमूल सारखा वर्ल्ड क्लास प्रॉडक्ट देणाऱ्या “Milk Man Of India” ‘डॉ.वर्गीस कुरियन’ यांचे वयाच्या ते ९०व्या वर्षी ९ सप्टेंबर २०१२ रोजी निधन झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.