Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

इंजिनियर झालेल्या मुलीने रागाच्या भरात जेआरडी टाटांना एक पत्र लिहिलं, त्याचे परिणाम काय झाले वाचाच

ह्या एका पत्राने जणू इतिहासंच घडवला, असं काय होतं त्या पत्रात ?

क्रोध हा वाईट असतो, आरोग्यासाठी घातक असतो, रागात घेतलेले आपले निर्णयही चुकतात वगैरे ऐकत आपण लहानाचे मोठे झालेलो असतो. मनाविरुद्ध का होईना, परंतु रागावर नियंत्रण ठेऊ लागतो. परंतु कधी कधी ना, हाच क्रोध आवश्यक असतो. सतत शांत, समजूतदार किंवा न पटणाऱ्या बाबींकडेही दुर्लक्ष करण्याला लोक आपली कमजोरी समजू लागतात आणि खरं सांगायचं तर पूर्वी समाजातील स्त्रीवर्ग हा या तथाकथित “कमजोर” शब्दासाठी चपखल समजण्यात येत होता.

आजही तसं कमी अधिक प्रमाणात समजण्यात येतं. ह्या गोष्टी स्त्रियांच्या इतक्या अंगवळणी पडल्या आहेत की यात काही गैर आहे असं अर्ध्या अधिक जणींना वाटतच नाही. ज्यांना या गोष्टीचा राग येतो त्यांना तो दाखवण्याची हिम्मत नसते.

sudha murthy, sudha murthy infosys, sudha murthy biography in marathi, sudha murthy life story, sudha murthy and jrd tata, sudha murthy education, n. r. narayana murthy wife, sudha murthy interesting facts, sudha murthy letter to jrd tata, telco, sudha murthy images hd, sudha murthy in marathi, sudha murthy letter to jrd tata, sudha murthy in telco pune, JRD Tata, सुद्धा मूर्ती माहिती, सुद्धा मूर्ती टेल्को, जे आर डी टाटा, नारायण मूर्ती, इन्फोसिस

या सगळ्यात एक जी यशस्वी झाली – जिला आपल्याला कमी लेखलेलं अजिबात आवडलं नाही ! एवढंच नव्हे तर ती आपला राग व्यक्त करायला कचरली नाही… ती म्हणजे – सुधा मूर्ती !

त्यावेळी कॉलेजला जाणाऱ्या इतर मुलींसारखी होती सुधा. M.Tech च्या शेवटच्या वर्षाला असतांना त्यांनी एक जाहिरात बघितली… टेलको कंपनीला हुशार, मेहनती, शैक्षणिक आलेख उत्तम असणारे इंजिनियर्स हवे होते. सुधाचे डोळे लकाकले. तिला आत्ता नोकरी वगैरे करायची नव्हती परंतु कंपनीला हवे असणारे सगळे गुण तिच्यात होते. औत्सुक्यापोटी तिने सगळी जाहिरात नीट वाचून काढली.

पण जाहिरातीच्या शेवटच्या ओळीने तिची नजर वेधली. तिच्या कपाळावर आठ्या आल्या. ते वाक्य होतं “महिलांनी या पदासाठी अर्ज करू नयेत.”…

झालं… तिरिमिरीतच ती होस्टेलच्या आपल्या रूमवर आली. पोस्टकार्ड पुढ्यात ओढून चक्क टेलकोच्या सर्वेसर्वा असणाऱ्या टाटांनाच पत्र लिहू लागली. आपली नाराजी तिने स्पष्टपणे लिहिली आणि हे पात्र थेट JRD Tata यांना धाडलं. काही दिवसांनी हि गोष्ट ती विसरूनही गेली.

पण आश्चर्य म्हणजे केवळ दहा दिवसांच्या आत सुधाला टेलकोकडून पत्र आलं – इंटरव्ह्यूला हजर व्हा ! आता आली का पंचाईत ! सुधाला नोकरी नाही तर शिक्षण घ्यायचं होतं….आणि त्यासाठी परदेशी जायची तिची तयारी सुरू होती…त्यात हे पत्र ! वडिलांनी बजावलं – तुला नोकरी करायचीच नव्हती तर नसत्या उठाठेवी कशाला केल्यास ? आता इंटरव्ह्यूला जा. मागे हटू नकोस.”

आपल्याला नोकरी करायचीच नाही, केवळ औपचारिकता म्हणून येथे आलो आहोत अशी मनाशी खूणगाठ बांधून गेल्याने सुधा (Sudha Murthy)ला पॅनलच्या समोर आत्मविश्वासाने जाता आलं. “टेलकोच्या संस्थापकाला पत्र लिहिणारी ती हीच” हे तेथे उपस्थित सर्वांना माहीत झालं होतं. तेव्हा आपल्याला केवळ स्त्री म्हणून दुय्यम वागणूक मिळू नये, पदाला आवश्यक असेच प्रश्न विचारण्यात यावेत असं सुधाला वाटणं साहजिक होतं.

sudha murthy, sudha murthy infosys, sudha murthy biography in marathi, sudha murthy life story, sudha murthy and jrd tata, sudha murthy education, n. r. narayana murthy wife, sudha murthy interesting facts, sudha murthy letter to jrd tata, telco, sudha murthy images hd, sudha murthy in marathi, sudha murthy letter to jrd tata, sudha murthy in telco pune, JRD Tata, सुद्धा मूर्ती माहिती, सुद्धा मूर्ती टेल्को, जे आर डी टाटा, नारायण मूर्ती, इन्फोसिस

त्यामुळे “कृपा करून केवळ तांत्रिक प्रश्नच विचारावेत” असं पॅनेलला सांगून ती मोकळी झाली ! संपूर्ण अडीच तास चाललेल्या ह्या मुलाखतीत सुधाची विषयाची सिद्धता, बुद्धीची चमक सगळ्यांनीच बघितली. आणि केवळ एक ‘स्त्री’ म्हणून हिला नाकारण्यात अर्थ नाही हे कळून चुकलेल्या पॅनेलने तिच्या नावावर शिक्कामोर्तब केलं !

एक स्त्री म्हणून सुधाने आपली ताकद ओळखली, स्त्रियांना कमी समजणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली, या अश्या समजुतीवरच क्रोध दाखवला ज्या योगे तिच्या आयुष्याला एक मार्ग मिळाला.

१९७४ मध्ये TELCO मध्ये लागलेली सुधा ही पहिली महिला इंजिनिअर ! टेलको मध्ये असताना सुधाजींना ज्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचे गुण जवळून बघायला मिळाले ते म्हणजे – जे.आर. डी. टाटा (JRD Tata) ! टेलकोचे सर्वेसर्वा परंतु गर्व, घमेंड नावालाही नाही.

आपल्याला पत्र लिहून जाब विचारणारी सुधा ती हीच हे लक्षात आल्यावरही त्याबद्दल अवाक्षर न काढता केवळ मंद स्मित करणं टाटांनाच जमू शकेल ! एकदा ऑफिस झाल्यावर सुधाजी आपल्या नवऱ्याची वाट बघत रात्रीच्या वेळी ऑफिसच्या बाहेर अश्या एकट्या उभ्या आहेत हे समजल्यावर सुधाजींबरोबर मूर्ती येईपर्यंत थांबणं हेही टाटांनाच जमू शकेल !

Sudha Murthy आपली कंपनी सोडून जाणार आहेत, नवऱ्याबरोबर पुण्यात स्थायिक होऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करणार असल्याचं समजल्यावर हा सज्जन गृहस्थ म्हणाला – “नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा ! भरभराटीचा काळ आल्यावर समाजाला आपण देणं लागतो हे न विसरता समाजाचे ऋण फेड !”

मनात कुठलाही आकस न ठेवणारा हा स्वच्छ माणूस समाजाचं भान ठेवायचं सांगून जातो ! भरभराट होणारच हा विचार नकळत सुधाजींच्या मनात पेरत त्यांना दुर्दम्य आत्मविश्वास बाळगायचं गुपितही सांगून जातो ! अश्या प्रगल्भ विचारांची उंची असणाऱ्या माणसाबरोबर काम करताना सुधाजीही बरंच काही शिकल्या.

sudha murthy, sudha murthy infosys, sudha murthy biography in marathi, sudha murthy life story, sudha murthy and jrd tata, sudha murthy education, n. r. narayana murthy wife, sudha murthy interesting facts, sudha murthy letter to jrd tata, telco, sudha murthy images hd, sudha murthy in marathi, sudha murthy letter to jrd tata, sudha murthy in telco pune, JRD Tata, सुद्धा मूर्ती माहिती, सुद्धा मूर्ती टेल्को, जे आर डी टाटा, नारायण मूर्ती, इन्फोसिस

सुधाजी इन्फोसिसच्या सह संस्थापिका तर आहेतच, त्याचबरोबर त्या प्राध्यापिका, सामाजिक कार्यकर्त्याही आहेत. कर्नाटक सरकारच्या अनेक शाळांना त्यांनी ग्रंथालये, संगणक उपलब्ध करून दिले आहेत. संस्थेच्या मदतीने ग्रामीण भागात सुमारे १०,००० शौचालये बांधून दिली आहेत.

त्सुनामीच्या काळात त्यांनी तामिळनाडू, अंदमान येथे मदत पुरवली. महाराष्ट्रातील दुष्काळी भागातही त्यांची मदत पोचली. बेस्ट टीचर अवॉर्ड, पद्मश्री, भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार अश्या अनेक गुणांनी गौरवांकीत असलेल्या ह्या स्त्रीच्या यशोगाथेला प्रणाम !

Leave A Reply

Your email address will not be published.