रिलेशनशिप मध्ये आहात ? ब्रेकअप पासून दूर राहायचं असेल तर ह्या टिप्स नक्की फॉलो करा

0
940
how to be happy in a relationship tips, relationships advice, relationship advice for couples, healthy relationship tips for couples in marathi, how to keep a relationship strong and happy, successful relationship tips, how to keep a long-term relationship strong, रिलेशनशिप टिप्स, मजबूत नात्यासाठी टिप्स, Tips for Building Healthy Relationship In Marathi

जोडीदारावर खूप प्रेम असूनही तुमचे वाद होतात ? वाद टाळून आयुष्यभर त्याच व्यक्तीबरोबर आयुष्य घालवायचं असेल तर ह्या टिप्स नक्की फॉलो करा

अगोदरच्या काळात Relationship किंवा Dating वगैरे असा काही प्रकार नव्हता… मुलामध्ये आणि मुलीमध्ये ओळख आणि जवळीक लग्न झाल्यावरंच व्हायची. तेव्हा त्यांना एकमेकांच्या आवडी-निवडी, एकमेकांचे स्वभाव, एकमेकांमधील गुण हे लग्नानंतरच कळायचे.

पण आता अशी पद्धत राहिली नाही. आता मुलं व मुली डेटिंग आणि रिलेशनशिपमुळे आधीच एकत्र येतात, एकमेकांना ओळखून घेतात आणि मग जर त्यांचे जुळले तर मग लग्नाचा निर्णय घेतला जातो. या मागचा असा हेतू असतो कि, लग्नाअगोदर दोघांनी एकमेकांना पूर्णपणे जाणून घेतलं पाहिजे जेणेकरून, त्यांच्या मध्ये लग्नानंतर स्वभाव, आवडी-निवडी या गोष्टीवरून वाद होऊ नये. जर त्यांचा स्वभाव पटत नसेल तर त्यांना ते रिलेशनशिप मध्ये राहूनच कळते.

Relationship मध्ये राहिल्याने लोकांना त्यांचा योग्य Life Partner शोधण्याची संधी मिळते. पण, अनेकदा तुमचे आणि जोडीदारा मध्ये प्रेम असते, जवळीक असते, पण काही गोष्टींमुळे तुमचे आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद होतात व नात्यामध्ये दुरावा वाढतो. म्हणूनच, जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत आयुष्य घालवायचं असेल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि काही गोष्टींच्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत.

how to be happy in a relationship tips, relationships advice, relationship advice for couples, healthy relationship tips for couples in marathi, how to keep a relationship strong and happy, successful relationship tips, how to keep a long-term relationship strong, रिलेशनशिप टिप्स, मजबूत नात्यासाठी टिप्स, Tips for Building Healthy Relationship In Marathi
healthy relationship tips for couples

तुमचे नाते घट्ट करण्यासाठी खाली काही टिप्स दिल्या आहेत त्या जर तुम्ही लक्षात घेतल्या आणि अंमलात आणल्या तर तुमच्या नात्यातील वाद आणि दुरावा कमी होऊ शकतो. बघुयात काय आहेत ह्या टिप्स

स्वभाव जुळवून घ्या (Adjust and Understand each others Nature)

सगळ्यात आधी तुम्ही एकमेकांचा स्वभाव (Nature) जाणून घ्यायला शिका. कारण, स्वभाव जुळणे, हा तुमच्या रिलेशनशिपचा पाया आहे. स्वभाव जुळत नसेल तर तुम्ही तुमचे नाते पुढे घेऊन जाऊ शकत नाही. हेही खरे आहे कि, प्रत्येक लोकांचा स्वभाव एकसारखा नसतो आणि काहीवेळा असेही होते कि लोकांना नातं टिकवायचं असतं परंतु स्वभावामुळे नात्यात अडचणी येत असतात. अशावेळी तुम्ही नात्यात ऍडजस्टमेन्ट केली पाहिजे. ऍडजस्टमेम्ट केली तर तुमचं नातं कदाचित टिकू शकतं. त्यामुळे स्वभाव जुळत नसेल तर ऍडजस्टमेन्ट करून बघावी.

एकमेकांचा आदर करा (Respect each other)

नातं कोणतंही असो त्या नात्यामध्ये आदर असणे आवश्यक असते. कारण प्रत्येक व्यक्तीचा आदर करणे हि आपली संस्कृती आहे. अनेकदा लोक आपल्या जोडीदाराचा आदर (Respect) करत नाही. Relationship मध्ये मुलीवर हात उचलने, एकमेकांना शिवीगाळ करणे, लोकांसमोर टाकून बोलणे या सर्व गोष्टी आपण घडताना बघतो आणि जर असंच घडत राहील तर तुमचे नाते कधीच टिकू शकत नाही. ‘एकमेकांबद्दल आदर आहे तर नातं आहे’, हे नेहमी लक्षात ठेवा.

आवडी-निवडी जाणून घ्या (Know likes and dislikes)

नातं टिकवण्यासाठी एकमेकांच्या आवडी-निवडी जाणून घेणे गरजेचे आहे. बहुतेकदा असे दिसून येतं असते कि, तुमची आवड-नाआवड (Likes and Dislikes) तुमच्या जोडीदाराला माहिती नसते, त्यामुळे सुद्धा नात्यामध्ये छोट्या मोठ्या वादाला तोंड फुटतं. एखाद्याने आपल्या जोडीदाराच्या नाआवडती गोष्ट केली कि, त्या जोडीदाराला राग येतो किंवा वाईट वाटते. एकमेकांची पसंती-नापसंती एकमेकांना कळली तर अशा गोष्टी घडण्याची शक्यता अधिक कमी असते.

एकमेकांना वेळ द्या (Take out time for your partner)

रिलेशनशिप मध्ये एकमेकांना वेळ देणे खूप गरजेचे असते. जर तुम्ही एकेमकांना वेळ दिला तर तुमच्यामधील नातं अजून जास्त घट्ट होतं. त्यासोबतच तुम्हाला एकमेकांना जाणून घेण्याची संधी मिळते. परंतु, जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला वेळ देत नसाल तर तो द्यायला सुरुवात करा. कारण यामुळे जोडीदाराच्या मनात चुकीच्या शंका येणे, संशय घेणे, वाईट वाटणे, एकटे वाटणे, विश्वास कमी होणे, प्रेम कमी होणे या प्रकारच्या गोष्टी येत राहतात.

आता यात तुमच्या जोडीदाराची काही चूक नसते. तुम्ही जर वेळ दिला नाही तर अश्या गोष्टी घडणे अगदी सहाजिक आहे. तुमच्या जोडीदाराची समजूत काढणे आणि त्याच्या मनातील सर्व शंका दूर करणे हे तुमचे कर्तव्य आहे. तुमच्यावर तुमच्या जोडीदाराचा विश्वास असला तरीही अश्या गोष्टी उद्भवणे साहजिक आहे. म्हणूनच तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मनात असे विचार येण्याची संधीच देऊ नका.

how to be happy in a relationship tips, relationships advice, relationship advice for couples, healthy relationship tips for couples in marathi, how to keep a relationship strong and happy, successful relationship tips, how to keep a long-term relationship strong, रिलेशनशिप टिप्स, मजबूत नात्यासाठी टिप्स, Tips for Building Healthy Relationship In Marathi
how to be happy in a relationship tips

जोडीदाराचे कौतुक करा (Appreciate your partner)

कौतुक केलेलं कुणाला आवडत नाही हो…. जोडीदाराचं कौतुक केल्याने तुमचं नातं अधिक घट्ट होतं. आपल्या जोडीदाराकडून कौतुकाची थाप मिळणे हि फार महत्वाची गोष्ट आहे कारण तुमचा जोडीदार तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहे. पण कौतुक (Appreciate) करताना उगाच करायचं म्हणून करू नका. केलेलं कौतुक हे मनापासून असावं, नुसतं दिखावा केल्याने तुमचे नटे घट्ट होणार नाही.

इतरांशी तुलना करू नका (Don’t compare with others)

तुमच्या जोडीदाराची इतरांशी कधीही तुलना करू नये….. अनेक Relationship मध्ये लोकं आपल्या जोडीदाराची नकळत किंवा मुद्दाम इतरांशी तुलना करतात. दिसण्यावरून, स्वभावावरून, बोलण्यावरून त्या व्यक्तीच्या राहणीमानावरून तुलना केली जाते. पण असे करणे साफ चुकीचे आहे. यामुळे तुमच्या जोडीदाराला आपण या रिलेशनशिपसाठी आणि तुमच्यासाठी योग्य नाही असे वाटायला लागते. तसेच, त्यांचा स्वतःवरचा विश्वास उडतो आणि आत्मविश्वास डळमळीत होतो. म्हणूनच अशी तुलना करणे टाळावे. जर तुम्ही असे तुमच्या Life partner करत असाल, तर तुम्ही तुमच्यातली माणुसकी आणि जोडीदाराबद्दलचा आदर पूर्णपणे गमावला आहे हे दिसून येते.

*आपल्याला हा लेख कसा वाटला हे खाली कमेंट करून सांगा. आपल्याला इतर कोणत्या विषयावर वाचायला आवडेल त्याबाबतची कमेंट करा. टीम इन्फोबझ्झ लवकरच त्यावर लेख सादर करेल.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here