Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

ह्या टिप्स वापरून दिवाळीत अगदी कमी खर्चात घर सजवा आणि घराला द्या नवा लूक

नवरात्र संपता संपता चाहूल लागते दिवाळीची, वर्षातील मोठा आणि त्या अर्थी शेवटचा सण. त्यामुळेच गरीब-श्रीमंत, लहान-थोर सर्वच जण आतुरतेने दिवाळीची वाट पाहतात. मनात अनेक गोष्टींचे प्लानिंग तयार असते त्यासाठीही दिवाळीची आतुरतेने वाट पाहिली जाते. घर लहान असो की भलेथोरले प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार ते Diwali साठी सज्ज करू इच्छित असतो.

आजीआजोबांच्या किंवा माझ्या लहानपणी देखील गणपती, दिवाळी असे सण तोंडावर आले की घराचा रंग काढणे अगदी सर्रास केले जात असे. कारण हेच घर छान चकाचक नाही पण प्रसन्न आणि नवखे दिसावे.

काळ बदलला, त्यानुसार decoration च्या कल्पनांना पंख फुटले आहेत. याचा अर्थ असा मुळीच नाही की खिशाला चाट देऊनच घराची सजावट करायला लागेल. तर अगदी छोटे छोटे बदल करून आपण घर उत्तम सजवू शकतो. घरातील फर्निचर, सजावटीच्या वस्तू यांच्या जागा बदलून, नवीन पडदे लावूनही छान अल्हाददायक सजावट करून घराचे रूपडे पालटू शकतोच.

अगदी कमी खर्चात दिवाळीत घराला देऊया नवा लूक (Tips to decor home this Diwali)

रंगांची निवड (Color)

घराचा रंग नवा करून घेणार असाल तर त्यातही छान छान पर्याय आहेत. एकाच रंगात घर रंगवण्याची संकल्पना केव्हाच मागे पडली आहे. त्याऐवजी एकाच रंगाच्या वेगवेगळ्या छटा वापरता येतात. बैठकीच्या खोलीत एका भिंतीला वेगळाच रंग देऊनही खोली लक्ष वेधक करता येते. ज्या खोलीला फिका रंग होता तिथे जरा गडद छटा, जिथे गडद रंग तिथे फिका रंग वापरू शकतो. त्यामुळे आपल्याला वेगळेपणा, नवेपणा जाणवतो.

diwali decoration ideas for home, traditional diwali decorations, diwali decorations at home, diwali decoration ideas in marathi, kitchen decoration for diwali, Home Decor Tips For Diwali, festival, interior decoration tips in marathi, diwali home decoration, diwali decoration ideas for living room, दिवाळी डेकोरेशन टिप्स, दिवाळी सजावट, दिवाळी इंटेरिअर डेकोरेशन, दीपावली सजावट, होम डेकोर, दिवाळी टिप्स
Diwali decoration ideas for home
वॉलपेपर (Wallpaper)

वॉल पेपर हा देखील बेस्ट पर्याय आहे. त्यात विविध रंग, टेक्सचर येतात. एखाद्या खोलीत रंगाऐवजी वॉलपेपरचा वापर करू शकतो. रंग लावण्यापेक्षा थीम ठरवूनही वॉलपेपरची निवड करू शकतो. स्वयंपाकघरात त्यातील साहित्यांची चित्रे असलेला, बैठकीच्या खोलीत वेगळे पोत (texture) असलेले वॉलपेपर लावता येतील.

भिंतीवरील चित्रे (Wall Painting)

जर आपल्यातील कलाकार उचल खात असेल आणि स्वतःच्या हाताने काही प्रयोग करायचे असतील तर काय हरकत आहे. घरातील एखादी भिंत छान विविध चित्रांनी रंगवू शकता. वरली पेटिंग, फुले पाने रेखाटून ही भिंती जरा आगळीवेगळी होऊ शकते.

घरात झाडे (Indoor Plants)

घरात लावू शकणारी झाडे नक्कीच उजवी ठरतील. मनीप्लांट सारखी झाडे अनेक जण हौसेने लावतात. पण काही बोन्साय सारखे पर्याय वापरता येतील. ही झाडे लावताना रंगवलेल्या कुंड्या, मातीची विविध आकाराची भांडी वापरता येतील. त्यामुळे पर्यावरणस्नेही सजावट करता येईलच पण निसर्गाचा वास घरात राहू शकेल.

सजावटीच्या वस्तू (Decorative items)

त्यासाठीही फार काही खर्च करण्याची आवश्यकता नाही. अगदी भातुकलीतील खेळणी देखील त्यात वापरू शकतो. हल्ली टेराकोटा, तांबे, पितळ, लाकूड यापासून मिनिएचर वस्तू खास सजावटीसाठी मिळतात. प्रदर्शनांमध्ये फेरी मारली तर विविध आकाराचे दिवे, भांडी, फुलदाण्या मिळतात. खोलीच्या एखाद्या कोपऱ्यात छानशी फुलदाणी ठेवून त्यात ताजी फुले ठेवून सजावट करता येईल.

पडदे (Curtains)

दिवाळी दिव्यांचा सण, सगळीकडे रोषणाई झगमगत असताना घरातील खिडक्यांना निव्वळ नवे उठावदार रंगातील पडदे लावले तरीही खोलीचा चेहरामोहरा बदलून जाईल. आता पडद्यांसाठी सुती, सिल्क, नेट, ब्रासो आदी प्रकारच्या कापडांचा वापर करू शकतो. पण घरात जर उत्तम स्थितीतील एक रंगाच्या किंवा छान प्रफुल्लित प्रिंट असलेल्या साड्या असतील तर त्याचाही वापर करून पडदे तयार करू शकतो. एका रंगाच्या दोन पडद्यांच्या मध्ये दुसरा उठावदार रंग वापरू शकतो.

diwali decoration ideas for home, traditional diwali decorations, diwali decorations at home, diwali decoration ideas in marathi, kitchen decoration for diwali, Home Decor Tips For Diwali, festival, interior decoration tips in marathi, diwali home decoration, diwali decoration ideas for living room, दिवाळी डेकोरेशन टिप्स, दिवाळी सजावट, दिवाळी इंटेरिअर डेकोरेशन, दीपावली सजावट, होम डेकोर, दिवाळी टिप्स
Home Decor Tips For Diwali
पलंगपोस (Couch)

बैठकीच्या खोलीत बसण्यासाठी सोफा असेल तर काही दिवसांसाठी तो दुसऱ्या खोलीत ठेवून तिथे भारतीय बैठकीची पद्धत ठेवू शकता. त्यावरील उशा, तक्क्या, लोड यांना सुंदर पलंगपोस घालून वेगळ्या पद्धतीने सजवू शकतो. हा वेगळेपणा नक्कीच प्रसन्नचित होण्यास मदत करेल. बैठकीच्या खोलीतील एखाद्या भिंतीवर छान कौटुंबिक फोटोफ्रेम करूनही लावता येईल. कौटुंबिक जिव्हाळा नक्कीच जपला जाईल.

स्वयंपाकघराची सजावट (Kitchen decor)

घरातील प्रत्येकाच्या मनात जाण्यासाठी रस्ता हा स्वयंपाकघरातूनच जातो. कारण विविधरंगी, विविधढंगी पदार्थ तिथे रांधले जातात. या स्वयंपाक घराची रचनाही थोडी बदलली की वेगळाच नवेपणा जाणवतो. त्यासाठी नुसतेच कप, काचेच्या प्लेटस, वाडगे रचून ठेवण्यापेक्षा ते जरा कलात्मकेने रचले तरीही किचनमधे वेगळेपणा आणता येईल.

भिंतीवर काचेचे कपाट करून घ्या किंवा बाजारात वायर प्लेट हँगर्स मिळतात. त्यांचा वापर करून विविध रंगातील, विविध आकारातील प्लेटस त्यात ठेवूनही भिंतीला टांगता येतील. हल्ली स्वयंपाकघरात टाईल्सवर, भिंतीवर लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्टीकर्स बाजारात तयार मिळतात. ते जरी आणून लावले तरीही भिंती वेगळ्या दिसू लागतील.

दिव्यांची रोषणाई (Lighting)

दिवाळी म्हणून आपण रोषणाई करतोच पण अंतर्गत सजावट म्हणूनही आपल्याला दिव्यांचा वापर करता येतो. विजेच्या दिव्यांचा वापर करून फक्त एखाद्या कोपऱ्यात उजेड करण्यासाठी किंवा जेवताना टेबलावरच उजेड पाडण्यासाठी केला जाऊ शकतो. विविध रंगामध्ये दिवे उपलब्ध असतात. आपल्या कल्पनाशक्तीप्रमाणे मंद प्रकाशाच्या दिव्यांचा वापर सजावटीसाठी करू शकतो.

घरात वरीलप्रमाणे लहान लहान बदल करून आपण सणावाराकरिता घर प्रफुल्लित, आनंदी करू शकतो आणि घर आनंदी म्हणजे आपणही आनंदी राहाणार. तर मग हे छोटे बदल करूया आणि दिवाळीही आनंदाने साजरी करूया.

Leave A Reply

Your email address will not be published.