Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत तुमचं घर अशाप्रकारे उबदार ठेऊ शकता

भारतात पाश्चिमात्य देशांसारखी थंडी नसली तरीही काही भागात अगदी बर्फासारखी थंडी असते. काही राज्यांचा अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी कडाक्याची थंडी किंवा थंडीची लाट वगैरे येते. हिमाचल प्रदेशासारख्या बर्फाळ प्रदेशात बर्फवृष्टीच्या महिन्यांमध्ये घरातच उब मिळवून बसावे लागते. पण इतरही ठिकाणी नेहमीच्या तापमानापेक्षा अधिक घट होते तेव्हा थंडीही बऱ्यापैकी वाढते. मग बाहेर थंड, बोचरी हवा असते त्यामुळे घरात तरी किमान उबदार वाटावे असे वाटणे साहाजिक आहे.

भारतीय उपखंडात तर काही ठिकाणी पावसाळाही इतका जोरदार असतो की तेव्हाही थंडी (cold) वाजते आणि पावसाळ्यानंतर एक ऑक्टोबर महिन्याचा अवधी वगळता पुन्हा थंडीचा मोसम सुरू होतो. स्वेटर्स, शाल यांचा वापर होतोच पण घरच उबदार राखू शकलो तर या काळा सुखावह होईल.

how to make a cold house warm, how to keep house warm without central heat, how to keep room warm in winter without heater, how to keep room warm at night, how to keep warm in winter in marathi, winter tips in marathi, house warm, घर उबदार ठेवण्यासाठी टिप्स, cold house solutions, how to heat your house for free in marathi, Helpful Tips To Keep Your Home Warm in marathi
Tips to keep your home warm in marathi

घर उबदार राखण्यासाठी एकमुखाने पर्याय सुचवण्यात येतो तो रूम हिटरचा. तो योग्यही आहे पण म्हणून तो एकच पर्याय आहे असेही नाही. घरात काही अंतर्गत बदल करणे शक्य असल्यास त्यातून घर उबदार (warm) ठेवणे शक्य होते. अर्थात हे प्रत्येकाला शक्य होईलच असे नाही. कारण ज्यांची बदली होते किंवा जे भाड्याच्या घरात राहातात त्यांना काही काळाने घर बदलावे लागते. त्यामुळे कायमस्वरूपाचे बदल जसे लाकडी फ्लोअरिंग, इन्सुलेशन हे पर्याय उपयोगात आणता येणार नाहीत.

मात्र अगदी सोपे उपाय करूनही घर उबदार ठेवता येते, पाहुयात ते उपाय कोणते (Tips to keep your home warm in winter)

गडद रंग (Use Dark Colors)

घर उबदार राहाण्यासाठी रंग द्यावा असे नाही पण जर घराचा रंग काढला असेल, हिवाळा अगदी जवळ आला असेल, तर घर उबदार वाटतील असे उष्ण रंगातील छटेची निवड करण्यास हरकत नाही. अगदी संपूर्ण घराला तसा रंग द्यायचा नसेल तर एखादी भिंत उष्ण – गडद रंगाने रंगवून घेतल्यास घर उबदार भासते. रंग करणार नसाल तर उष्ण रंगांमध्ये रंगवलेले एखादे चित्र भिंतीवर लावू शकतो.

सूर्यप्रकाश (Let Sun in your room)

थंडी आहे, बाहेरचा गारवा आत येऊ नये म्हणून खिडक्या बंद ठेवण्याकडे आपला कल असतो. पण असे न करता ज्या खिडक्यांमधून भरपूर लख्ख सूर्यप्रकाश आत येऊ शकत असेल अशा खिडक्या जरूर उघड्या ठेवाव्यात. त्यामुळे घरात उब निर्माण होऊन थंडपणा कमी होतो.

how to make a cold house warm, how to keep house warm without central heat, how to keep room warm in winter without heater, how to keep room warm at night, how to keep warm in winter in marathi, winter tips in marathi, house warm, घर उबदार ठेवण्यासाठी टिप्स, cold house solutions, how to heat your house for free in marathi, Helpful Tips To Keep Your Home Warm in marathi
How to keep room warm in winter without heater
पडद्यांची निवड (Use Curtains)

हिवाळ्यात थोडे जाड पडदे वापरले तर घरात उब टिकून राहू शकते. जेणेकरून खिडक्या उघडल्या तरीही घरातील उब कमी होणार नाही. थंडीच्या काळात वापरण्यासाठी थोडे जाड आणि उन्हाळ्यात हलके पातळ पडदे आणावेत. जाड पडद्यांमुळे बाहेरील थंड हवा घरात येत नाही आणि उबदारपणाही कमी होत नाही. रात्री पडदे लावून थंडपणा वाढू नये म्हणून प्रयत्न करताना सकाळी मात्र सूर्यप्रकाश आत येण्यासाठी पडदे जरूर उघडावे.

गालिचांचा वापर (Carpets and Rugs)

हिवाळ्यात घरातील फरशी किंवा टाईल्स थंड पडतात. त्यामुळे पायाला थंडी वाजते, काही वेळा तर गादीवरून पाय खाली सोडू नये असे वाटते. घरात जर लाकडी फरशी किंवा इन्सुलेटेड फरशी असेल तर थंडी वाजत नाही परंतू तसे नसेल तर बैठकीच्या खोलीत गालिचा वापरू शकतो. त्यासाठी जाड सुती गालिचा किंवा लोकरीचा गालिचा वापरू शतो. या गालिचांमध्ये उष्णता टिकून राहाते, घर उबदार राहाते.

how to make a cold house warm, how to keep house warm without central heat, how to keep room warm in winter without heater, how to keep room warm at night, how to keep warm in winter in marathi, winter tips in marathi, house warm, घर उबदार ठेवण्यासाठी टिप्स, cold house solutions, how to heat your house for free in marathi, Helpful Tips To Keep Your Home Warm in marathi
दरवाजे बंद ठेवा (Keep Rooms Shut)

घरातील सर्वच खोल्यांमध्ये सगळ्यांचा वावर नसतो. त्यामुळे ज्या खोलीत वावर नाही त्या खोल्यांची दारे बंद ठेवा. दारे उघडी ठेवल्याने थंड हवा इकडून तिकडे वाहाते परिणामी घरात गारवा जाणवतो. म्हणून वापरात नसलेल्या खोलीचे दरवाजे बंद ठेवावे.

जुन्या पद्धतीचे दिवे (Old fashioned lights)

पुर्वी म्हणजे ट्यूबलाईटचे प्रचलन वाढण्याआधी आपण पिवळ्या प्रकाशाचे दिवे वापरत असू. हल्ली तर आपण CFL, LED दिवे वापरतो पण पूर्वी फिलामेंटचे दिवे असत. बहुतेक घरांमध्ये तेच दिवे वापरले जात, त्या दिव्यांमुळे घरात उब निर्माण होते. शक्य असल्यास पुन्हा तेच दिवे वापरू शकतो.

how to make a cold house warm, how to keep house warm without central heat, how to keep room warm in winter without heater, how to keep room warm at night, how to keep warm in winter in marathi, winter tips in marathi, house warm, घर उबदार ठेवण्यासाठी टिप्स, cold house solutions, how to heat your house for free in marathi, Helpful Tips To Keep Your Home Warm in marathi
बबल रॅप (Bubble Wraps)

लाकडी खिडक्यांच्या फटीतून थंडी आत येते. ते रोखण्यासाठी बबल रॅपचा वापर करू शकतो. बहुतांश वेळा कुरिअर मार्फत वस्तू येतात तेव्हा हे बबल रॅप मधून येतात. त्याचा वापर आपण लाकडी खिडक्यांच्या फटी बंद ठेवण्यासाठी करू शकतो. त्यामुळे घरात थंड वारे शिरणार नाहीत आणि उब टिकून राहिल.

लाकडे जाळा (Light fire)

भारतीय उपखंडात काही पाश्चिमात्यांसारखी चिमणी नसते की रोज घरात शेकोटी पेटवू शकतो. अर्थात आपल्याकडे पाश्चिमात्यांसारखी थंडीही नसते. अगदी काही प्रदेशात बर्फवृष्टी होते. पण तरीही घरात शेकोटी करू शकत नाही. मात्र मेणबत्त्या लावून आपण घरात उब निर्माण करू शकतो. मेणबत्त्या लावल्याने घर सुंदरही दिसेल.

how to make a cold house warm, how to keep house warm without central heat, how to keep room warm in winter without heater, how to keep room warm at night, how to keep warm in winter in marathi, winter tips in marathi, house warm, घर उबदार ठेवण्यासाठी टिप्स, cold house solutions, how to heat your house for free in marathi, Helpful Tips To Keep Your Home Warm in marathi
ड्रायर आणि ब्लोअर (Dryer and Blower)

ड्रायर आणि ब्लोअर हा देखील एक पर्याय आहे. पण त्यासाठी खोली पूर्णपणे बंद असली पाहिजे तसेच खिडक्याही बंद असाव्यात, पडदे लावलेले असावे. मग उष्ण हवेचा ब्लोअर आणि ड्रायरही वापरून खोली उबदार करू शकतो.

आपल्या आहे त्या घराला उबदार करण्यासाठीचे हे उपाय आहेत. परंतू जर आपण नव्याने घर बांधणार असू तर ते बांधताना सोलर आर्किटेक्चरचा विचार करून बांधावे. म्हणजे सूर्याच्या भ्रमणाची दिशा लक्षात घेऊन घर बांधल्यास ते हिवाळ्यात (winter) उबदार आणि उन्हाळ्यात एसी न लावताही थंड राहू शकते.

घरबांधणीच्या शास्त्रामध्ये सौर वास्तुशास्त्राचा विचार केला जातो. नव्याने घरबांधणीवेळी हा विचार अंमलात आणणे शक्य झाल्यास घर बांधताना त्याचा फायदा होईल. उन्हाळ्यात पडणाऱ्या सूर्याच्या किरणांची भूमिती समजून घेऊन त्यानुसार वास्तू बांधल्यास उन्हाळ्यात घर थंड आणि हिवाळ्यात कुडकुडणारं घर उबदार ठेवू शकतो.

तूर्तास आहे ते घर उबदार ठेवण्यासाठी वरील उपाय तरी करू पाहूच शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.