Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

पावसाळ्यात मोबाइलची काळजी घेण्यासाठी सोप्या टिप्स

जून महिना सुरु झाल्यानंतर वातावरण कधी बदलेल आणि पाऊस पडेल याचं काही सांगता येत नाही. नेमकं तुम्ही घरातून बाहेर पडल्यानंतर अचानक ढग दाटून जोराचा पाऊस आला असं तुमच्यासोबत पण झालं असेलंच. अश्यावेळी छत्री, रेनकोट सोबत नसेल तर मोठी पंचाईत होते.

एकवेळ आपण ओलं झालो तर चालेल हो पण आपला महागडा फोन ओला होता कामा नये. फोनची स्क्रीन ओली झाली तर टच व्यवस्थित होत नाहीच पण Phone च्या आत पाणी गेलं तर आतील सर्किट खराब होण्याची दाट शक्यता असते.

पावसाळ्यात फोनची काळजी घेणं फार महत्वाचं आहे म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत जेणेकरून पावसाळ्यात तुम्हाला तुमचा फोन जपता येईल.

मान्सून ऋतूत अशी घ्या फोनची काळजी (Tips to take care of your phone during Monsoon)

फोन स्विच ऑफ करा (Switch Off your Phone)
protect phone from rain, save from from water, rainy season, water damage, smartphone, mobile phone, पावसाळ्यात मोबाइलची काळजी घेण्यासाठी टिप्स, वॉटर डॅमेज

अचानक पाऊस आला आणि फोन तुम्ही ओला होण्यापासून वाचवू शकत नसाल तर तो स्विच ऑफ करा आणि शक्य असल्यास बॅटरी काढून ठेवा. कारण पाण्यात ओला झालेला फोन वापरणे फार धोकादायक आहे. चालू फोन पाण्यात ओला झाल्यास तो कोणत्याही क्षणी बंद पडू शकतो आणि पुन्हा सुरु होण्याची शक्यता देखील फार कमी असते, म्हणून पावसात भिजत असाल तर फोन बंद करायला विसरू नका.

झिप लॉक पाऊच (Zip Lock Pouch)

बाजारात तुम्हाला झिप लॉक असलेले प्लास्टिक पाऊच मिळतील. असे प्लास्टिक पाऊच तुम्हाला झोमॅटो आणि स्विगीच्या डिलिव्हरी बॉय जवळ पावसाळ्यात बघितले असणार. पावसाळ्याच्या दिवसात असं एक प्लास्टिक पाऊच सोबत ठेवा जेणेकरून अचानक पाऊस आल्यास तुम्ही तुमचा Phone त्यात सुरक्षित ठेऊ शकाल.

सिलिका जेल (Silica Gel)
protect phone from rain, save from from water, rainy season, water damage, smartphone, mobile phone, पावसाळ्यात मोबाइलची काळजी घेण्यासाठी टिप्स, वॉटर डॅमेज

झिप लॉक असलेले प्लास्टिक पाऊच तुमचा फोन ओला होण्यापासून नक्कीच वाचवेल परंतु तरीही त्या पाऊचमध्ये काही प्रमाणात Moisture असण्याची शक्यता दाट असते. हे मॉइश्चर तुमच्या फोनसाठी धोकादायक आहे पण यावर सुद्धा इलाज आहे. कुठलीही नवीन इलेकट्रॉनिक वस्तू घेतल्यावर त्याच्या बॉक्समध्ये तुम्हाला पांढऱ्या रंगाचे छोटे पॅकेट्स दिसतील, हे पांढरे पॅकेट्स म्हणजे सिलिका जेल. Silica Gel मॉइश्चर शोषून घेण्याचे काम करते.

म्हणून पाऊस आल्यावर प्लास्टिक पाऊचमध्ये फोनसोबत सिलिका जेलचे पॅकेट्स पण ठेवा जेणेकरून मॉइश्चर असल्यास सिलिका जेल ते शोषून घेईल आणि तुमचा फोन सुरक्षित राहील.

ब्लूटूथ इअरफोन (Bluetooth Earphones)

पावसात जर तुम्हाला कुणाला फोन करण्यासाठी अथवा गाणी ऐकण्यासाठी फोन वापरायचा असेल तर ब्लूटूथ इअरफोन (Bluetooth Earphone) वापरायला प्राधान्य द्या. फोन बॅग मध्ये टाकून तुम्ही बिनधास्तपणे एअरफोनचा वापर करू शकता आणि पावसाने काही खराब झालेच तर ते Bluetooth Earphone होतील पण तुमचा महागडा फोन मात्र सुरक्षित असेल.

ओला फोन चार्ज करू नका (Don’t charge wet Phone)
protect phone from rain, save from from water, rainy season, water damage, smartphone, mobile phone, पावसाळ्यात मोबाइलची काळजी घेण्यासाठी टिप्स, वॉटर डॅमेज

Phone पावसात भिजला असेल तर ताबडतोब चार्जिंगला लावू नका. जरी तुम्हाला फोनवर पाणी दिसत नसलं तरी त्यावर Moisture असण्याची दाट शक्यता असते. अश्यावेळी फोन चार्ज केल्यास तो खराब होऊ शकतो. म्हणून फोन चार्ज करण्याअगोदर तो पूर्णपणे कोरडा आहे का ह्याची खात्री करून घ्या.

वॉटरप्रूफ फोन (Waterproof Phone)

तुम्ही जर जास्त पैसे खर्च करू शकत असाल तर नवीन फोन विकत घेताना Waterproof Phone विकत घ्या. असे केल्यास तुम्हाला पावसात किंवा पाण्यापासून तुमच्या फोनची सुरक्षा करण्याची कटकट कायमची निघून जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.