Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

सध्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण सातत्याने तपासणे का गरजेचे आहे ?

व्यक्तीला कोणतेही लक्षणे नसतील तरीही योग्य काळजी न घेतल्यास रक्तातली ऑक्सिजन झपाट्याने कमी होऊ शकतो आणि यामुळे रुग्णाची स्थिती गंभीर बनते.

कोरोनाच्या उदयामुळे जगभरात गोंधळ आणि भीतीचे वातावरण काही थांबण्याचे चिन्हे दाखवत नाही. आता लोकांच्या आयुष्यात अनेक बदल घडत आहेत आणि त्यापैकी एक म्हणत्वाचा म्हणजे जीवनावश्यक गोष्टी. होय, आता माणसाच्या जीवनावश्यक गोष्टी मध्ये अन्न, निवारा, पकडा सोबतच थर्मल गण आणि प्लस ऑक्सिमीटरचा समावेश झाला आहे. थर्मल गणचा वापर दुरून तापमान मोजण्यासाठी तर रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्यासाठी Pulse oximeter उपयोग केला जातो. सध्या कोरोना महामारीला रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मोठमोठ्या गृहनिर्माण संस्था, कार्यालये, दुकाने आणि घरीसुद्धा या उपकरणांचा वापर वाढत असल्याने मार्केटमध्ये याना जोरदार मागणी आहे.

कोरोनाच्या काळात लोकांच्या शब्दसंग्रहात अनेक नव्या शब्दांची भर पडली आहे त्यापैकी एक म्हणजे Oxygen Saturation. अनेकांनी संसर्ग झाल्याचे चाचणीत दिसते पण कोणतेही लक्षणे दिसत नाहीत अश्या रुग्णांना त्यांच्यातील Oxygen Saturation सतत तपासण्याचा सल्ला दिला जातो.

रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण, ऑक्सिजन, Oxygen Saturation, प्लस ऑक्सिमीटर, थर्मल गण, Pulse oximeter
Insider

याचे कारण म्हणजे व्यक्तीला कोणतेही लक्षणे नसतील तरीही योग्य काळजी न घेतल्यास रक्तातली ऑक्सिजन झपाट्याने कमी होऊ शकतो आणि यामुळे रुग्णाची स्थिती गंभीर बनते. यावेळी रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी तातडीने ऑक्सिजन लावणे गरजेचे असते. पण सध्याच्या परिस्थितीनुसार अश्यावेळी बेड न मिळण्याच्या घटना घडत आहेत आणि अनेक रुग्णांना ऑक्सिजन अभावी प्राणांना मुकावे लागले आहे.

याबाबत इंडियन मेडिकल असोशिअनचे राज्य अध्यक्ष अविनाश भोंडवे म्हणतात,

माणसाच्या फुफुसांना झालेली इजा शरीरातील ऑक्सिजन कमी करण्यास सुरवात करतो त्यामुळे सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवला तरी डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे घ्यावीत.

काय काळजी घ्यावी ?

मुळात संसर्ग होऊच द्याचा नाही ही सरावात महत्वाची गोष्ट आहे. तरीही एखाद्या रुग्णाच्या संपर्कात आल्यास तातडीने जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे घ्यावीत. आणि शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण Pulse oximeter ने पाहावे त्यामध्ये घट दिसत असल्यास तातडीने आरोग्य यंत्रणेला संपर्क साधावा.

घरच्या घरी ऑक्सिजनचे प्रमाण पाहण्यासाठी अनेक प्लस ऑक्सिमीटर उपलब्ध आहेत. खरेदी करण्यासाठी येथे क्लीक करा.


Leave A Reply

Your email address will not be published.