Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

बेन स्टोक्सच्या बहीण, भावाला का मारण्यात आलेलं

बेन स्टोक्सच्या जीवनात घडलेली हि घटना वाचून तुम्हाला धक्काच बसेल

नुकताच पार पडलेला विश्वचषक इंग्लंडने जिंकला. इंग्लंड विश्वविजेता बनला. अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचा या विजयात सिहांचा वाटा होता. बेन स्टोक्स सध्या क्रिकेटविश्वातील काही सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. अश्या ह्या मॅचविनर खेळाडूवर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव झाला. पण ह्याच मॅचविनर खेळाडूच्या आयुष्यातील एक अतिशय दुःखद बाजू सुद्धा जगासमोर आली आहे. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खेळाडू बोलणे टाळतात पण वर्तमानपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमं ह्या खेळाडूंविषयीच्या अश्या काही बातम्या जगासमोर आणतात कि वाचून धक्का बसतो.

अशीच एक बातमी आहे बेन स्टोक्सबद्दल. तुम्हाला माहित आहे का, बेन स्टोक्सच्या बहीण व भावाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. होय! हे सत्य आहे. बेनच्या जन्मापूर्वीच हि दुर्दैवी घटना घडलेली आहे. हि दुःखद घटना उजेडात आणली आहे ‘द सन’ या वृत्तपत्राने. हि अत्यंत वयक्तिक स्वरूपाची माहिती प्रसिद्ध केल्यामुळे बेन स्टोक्स मात्र ‘द सन’वर चांगलाच भडकला.

ben stokes, family, the sun, रिचर्ड स्टोक्स, बेन स्टोक्स
(Source – headtopics)

काय आहे नेमकी घटना

स्टोक्सचा जन्म होण्यापूर्वी १९८८ साली बेन स्टोक्सच्या आईचा एक्स बॉयफ्रेंड रिचर्ड डन ह्याने स्टोक्सच्या बहीण आणि भावावर गोळी झाडली व स्वतःवरही गोळ्या झाडून जीवन संपवले. रिचर्ड आणि बेन स्टोक्सची आई डेब ह्यांचा घटस्फोट झाला होता. एका विकेंडला दोन्ही मुले रिचर्डकडे राहायला गेली होती. तेव्हा हि दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे बेन स्टोक्सच्या आईला जबर मानसिक धक्का बसला होता. पण बेनचे वडील गेरार्ड स्टोक्स डेबच्या आयुष्यात आले आणि त्या सावरल्या. त्यानंतर तीन वर्षांनी बेन स्टोक्सचा जन्म झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.