Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

काळ्या पैशांविरोधात मोठं यश, केंद्र सरकार लवकरच मोठा दणका देणार.

केंद्र सरकार सातत्याने काळ्या पैशाविरोधात लढत असून या लढाईला आणखी एक यश आले आहे. स्विस बँकेकडून काळा पैसा असलेल्या भारतीयांची दुसरी यादी सरकारला प्राप्त झाली आहे.

भारत आणि स्वित्झर्लंडमधील काळ्या पैशाची माहिती स्वयंचलितरित्या देवाणघेवाण करण्याच्या कराराच्या अंतर्गत, भारतीय नागरिकांच्या स्विस बँक खात्यांची दुसरी यादी मिळाली आहे.

कुणाचा समावेश :

स्वित्झर्लंडच्या फेडरल टॅक्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने भारतासह 86 देशांसोबत 31 लाख आर्थिक खात्यांबाबत माहिती दिली असल्याचे स्वित्झर्लंडने म्हटले आहे. यातील बहुतेक प्रकरणे जुन्या खात्याशी संबंधित आहेत.

सदरील यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिक तसेच संस्था यांचा समावेश असून गेल्या वर्षभरात 100 पेक्षा अधिक भारतीय नागरिक आणि संस्थांविषयी माहिती स्वित्झर्लंडमधील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

यातील बहुतांश प्रकरणे जुन्या खात्याशी संबंधित असल्याने ती 2018 पूर्वी बंद झालेली असू शकतात. यासाठी परस्पर प्रशासकीय पाठबळाच्या पूर्वीच्या आराखडय़ात भारताला स्वित्झर्लंडने माहिती दिली आहे.

दरम्यान, यातील अनेक खातेधारकांविरोधात कर चुकवल्याप्रकारनी भारतीय अधिकाऱ्यांनी पुरावे उपलब्ध करून दिले होते.


Leave A Reply

Your email address will not be published.