Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

Bose Speakers हि अमेरिकेतली सर्वात मोठी कंपनी एका भारतीयाने उभी केली आहे ?

जगभरात नावाजलेली बोस कॉर्पोरेशन, जिची ऑडिओ सिस्टीम आज ‘अमेरिकेतील एक ब्रँड’ म्हणून ओळख आहे अशी हि कंपनी एका भारतीय स्वातंत्र्य सैनिकाच्या पोराने उभी केली आहे

प्रत्येकाने अगदी वैज्ञानिकच बनावं अथवा व्यवसायिकच बनावं किंवा डॉक्टरंच बनावं असा काही नियम नाही. कोऱ्या चेहऱ्याने, अगदी गंभीर वातावरणात काम करत जगावं असं थोडीच आहे ? कुणीतरी फक्त आनंदासाठी जगावं की ! काहीतरी नवीन, सुंदर, सर्वोत्तम असं जगाला देता यावं म्हणून झडझडून मेहनत करावी ना ! अमर गोपाळ बोस या भारतीय-अमेरिकन पुत्राने हे करून दाखवलं. … “मी पैसा कमावण्यासाठी या व्यवसायात आलो नाही तर जगाला काहीतरी वेगळं व उत्कृष्ट द्यावं म्हणून आलोय” असं म्हणणारे बोस आपलं वेगळेपण सिद्ध करतात.

amar bose, is bose an indian company, bose company founder, bose corporation history, amar bose biography, amar bose in marathi, bose corporation information in marathi, freedom fighter, bose speakers owner, amal gopal bose, बोस स्पिकर्स, अमर बोस, बोस कॉर्पोरेशन, अमर गोपाळ बोस, founder of Bose Corporation
Amar Bose – Founder of Bose Corporation

कोण आहेत हे अमर बोस ?

भारतातीलच नव्हे तर जगातली नावाजलेली, दिमाखात उभी असलेली बोस कॉर्पोरेशन ! जिची ऑडिओ सिस्टीम आज ‘अमेरिकेतील एक ब्रँड’ म्हणून ओळख आहे. आकर्षक स्पीकर्स, रेडिओ कार सस्पेंशन सिस्टीम, हेड फोन्स अशा विविध गोष्टीत नावाजलेली अशी ही कंपनी !

एकदा कॉन्सर्ट हॉल मधले स्पीकर्स ऐकले अन अमरच्या मनात आलं – हे आवाज या हॉलच्या भिंतींवर, सिलिंगवर आदळून मग कानापर्यंत येत आहेत … या आवाजाचं आपल्या कानांशी डायरेक्ट कनेक्शनच नाही ! यात काही मजा नाही….काहीतरी करायला हवं.

त्यांनी एकदा स्टीरिओ स्पीकर विकत आणला. त्या काळचा उच्च दर्जाचा असा तो स्टीरिओ स्पीकर होता. परंतु त्याची सुमार गुणवत्ता बघून अमर (Amar Bose) प्रचंड निराश झाले. संगीत ऐकण्याची एक मजा असते, ती इथे मिळत नाहीये… काहीतरी बदलायला हवं. अमरच्या मनानं घेतलं आणि त्याने ठरवलं, ह्यातच करियर करायचं.. पुढे जायचं…..

बोस कॉर्पोरेशन कशी उभी राहिली ?

वर्ष १९२०…… वडील गोपाळ बोस हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक – ब्रिटिश पोलिसांचा ससेमिरा मागे लागलेला. त्यातून वाचण्यासाठी ते अमेरिकेला गेले आणि तेथेच स्थायिक झाले. अमेरिकन मुलगी ‘शेरलॉट’च्या प्रेमात पडले. तिच्याशी लग्न केलं. शेरलॉट एका शाळेत टीचर होती. १९२९ मध्ये ह्या दाम्पत्याला पुत्ररत्न झालं – नाव ठेवलं – अमर !

amar bose, is bose an indian company, bose company founder, bose corporation history, amar bose biography, amar bose in marathi, bose corporation information in marathi, freedom fighter, bose speakers owner, amal gopal bose, बोस स्पिकर्स, अमर बोस, बोस कॉर्पोरेशन, अमर गोपाळ बोस, founder of Bose Corporation
Amar Bose, Gopal Bose, Amar Bose Parents

आपल्या कुटुंबाला हातभार लागावा म्हणून अमर १३ वर्षांचा असल्यापासून रेडिओ दुरुस्तीचं काम करायचा. मुळातच त्याला इलेक्ट्रॉनिक्स या विषयात आवड होती. रेडिओ दुरुस्ती करताना ही आवड वाढत गेली. अमरचा यामध्ये हातखंडा आहे, त्याचं निरीक्षण सूक्ष्म आहे आणि मुख्य म्हणजे त्याला अश्या गोष्टी हाताळण्याचं प्रचंड वेड आहे हे वडिलांनी ओळखलं..

कॅम्ब्रिज या प्रतिष्ठित विद्यापीठाच्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटी मध्ये – मॅसेचुसेट्स येथे अमरचा प्रवेश करवला. वडिलांचा विश्वास आणि अमरची विषयातली आवड यांचा मेळ जमून आला… इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये बॅचलरची पदवी घेऊन अमरने मॅसेचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) येथून पी.एच. डी. केली.

MIT मध्येच ते ४० वर्षे संशोधक, शिक्षक म्हणून राहिले. “सर्वोत्कृष्ट टीचर अवॉर्ड” पासून संशोधन, प्रोजेक्ट्स मधील अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. बोस कार्पोरेशन सुरू करण्यासाठी निधीची आवश्यकता होती आणि ती त्यांना पुरवली त्यांच्या एका प्रोफेसर मित्राने ! वाय. डब्लू. ली हे MIT मधेच प्रोफेसर होते.

अनेक पुरस्कार, नाव, प्रतिष्ठा या सोबतच अमर बोस यांनी कमावली ती लाख मोलाची माणसं ! त्याचं प्रतीक म्हणजे श्री. ली ! आपल्या मित्राच्या बुद्धिमत्तेवर प्रचंड विश्वास असलेल्या Y. W. Lee यांनी आपल्या आयुष्यभराचं सेव्हिंग – $ १०,००० आपल्या ह्या मित्राला दिले !!

१९६४ मध्ये बोस कार्पोरेशनचा पाया घातल्या गेला. जेव्हा ही कंपनी नावारूपाला आली तेव्हा ‘ली’ यांना त्यांनी दिलेल्या पैशांच्या बदल्यात किती पैसे मिळाले असतील ? तर तब्बल $ २६०,००० ! बोस कार्पोरेशनचं पहिलं प्रॉडक्ट् होतं ‘हाय पॉवर ऍम्प्लिफायर्स’ आणि या पहिल्या प्रॉडक्ट्चा पहिला काँट्रॅक्ट करण्यात आला तो अमेरिकेच्या मिलिटरी फोर्स सोबत !!

amar bose, is bose an indian company, bose company founder, bose corporation history, amar bose biography, amar bose in marathi, bose corporation information in marathi, freedom fighter, bose speakers owner, amal gopal bose, बोस स्पिकर्स, अमर बोस, बोस कॉर्पोरेशन, अमर गोपाळ बोस, founder of Bose Corporation

ऑडिओ टेक्नॉलॉजीच्या दुनियेत तीव्र स्पर्धा होती. परंतु बोस कॉर्पोरेशन आज ५० वर्षांनंतरही एक अग्रणी कंपनी म्हणूनच उभी आहे. आपलं काम दर्जेदार असेल, अप्रतिम गुणवत्तेचं असेल तर स्पर्धा ही आपल्यासाठी नसतेच मुळी ! इतरांपेक्षा आपण नेहमीच सरस ठरण्यासाठी जो कष्ट घेतो, त्याचंच नाव घेतल्या जातं.

१०,००० च्या वर कर्मचारी वर्ग असणाऱ्या Bose Corporation ची आजची वार्षिक उलाढाल जवळपास $३ बिलिअन आहे. फॉर्ब्सच्या अहवालानुसार अमर बोस यांची जगातल्या श्रीमंत लोकांमध्ये गणना होते …

संगीत हे नेहमी काळजाला भिडणारं हवं .. तेही थेट ! त्यात कसल्या बाधा नकोत. स्पीकर्समधून ते यावं, हेडफोन्सच्या द्वारे ते कानातून हृदयात झिरपावं आणि यासाठी मनापासून व यशस्वी प्रयत्न करणारे बोस हे खरंच एका उमद्या व्यक्तिमत्वाचे धनी होते !

२०१३ मध्ये फिलाडेल्फिया या आपल्या जन्मगावीच त्यांचा मृत्यू झाला. MIT साठी त्यांनी आयुष्य वाहून घेतलं. त्यांनी दान केलेल्या शेअर्सचे लाभांश MIT च्या रिसर्च प्रोजेक्ट्स साठी वापरले जातात. तशी अटच घातली होती Amar Bose यांनी ! त्यांच्या या अटीतून त्यांची कामाप्रती, MIT साठी असलेली निष्ठाच दिसून येते !!

amar bose, is bose an indian company, bose company founder, bose corporation history, amar bose biography, amar bose in marathi, bose corporation information in marathi, freedom fighter, bose speakers owner, amal gopal bose, बोस स्पिकर्स, अमर बोस, बोस कॉर्पोरेशन, अमर गोपाळ बोस, founder of Bose Corporation
founder of Bose Corporation – Amar Bose
Leave A Reply

Your email address will not be published.