Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

भारतातील श्रीमंत व्यक्ती फिरतात ‘या’ गाड्यांमधून….

जगभरात ज्यांची कायम चर्चा होत असते, अशा व्यक्ती म्हणजे उद्योगपती. क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रांपेक्षाही उद्योग जगतातील या सेलिब्रिटी लोकांबद्दल सर्वांनाच जास्त क्रेझ असते. त्यांची दिनचर्या, त्यांची खानपान, त्यांचं राहणीमान त्यांच्या प्रत्येक हालचाली हा चर्चेचा विषय ठरतो. अशीच गोष्ट आहे ज्याच्याबद्दलही चर्चा होत असते, ती म्हणजे या उद्योगपतींच्याकडे (Top Indian Businessmen) असणाऱ्या गाड्या. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोणत्या गाड्या वापरतात? नारायण मूर्ती ते अंबानी यांच्याकडे असणाऱ्या ताफ्यांत कोणत्या गाड्या (luxury cars) आहेत, कोणाला कोणती गाडी आवडते? याबद्दल सर्वसामान्यांना खूप उत्सुकता असते. तर या उद्योगपतींकडे कोणत्या गाड्या आहेत, ते आपण या लेखाद्वारे जाणून घेऊयात,

आदर पुनावाला

कोविड १९ च्या महामारीत परदेशातून येणाऱ्या लसींची वाट न बघायला लावता आपल्याच देशात लसीची निर्मिती करणारे सिरम (Serum institute of India) या लस निर्माण संस्थेचे सीईओ असणारे आदर पुनावाला (Adar Punawala) हे यंग बिजनेस आयकॉन आहेत. तर त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं राहणीमान याबद्दल ते चर्चेत असतातच. त्यांच्याकडे मॅकलारेन ७२०, बेंटली कॉंटिनेंटल, रॉल्स रॉईस फॅन्टम, द बॅट मोबाईल, फेरारी ३६० स्पायडर अशा आलिशान गाड्या आहेत.

नारायण मूर्ती

नावाजलेल्या माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी इन्फोसिस (Infosys) या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष नारायण मूर्ती (Narayan Murthy) हे साधपणाने जीवन व्यतीत करण्यासाठी ओळखले जातात. औद्योगिक क्षेत्रातील त्यांची कुशलता वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्याकडे स्कोडा लॉरा आणि महिंद्रा स्कॉर्पिओ सारख्या कार आहेत.

दिलीप संघवी

औषध निर्माण क्षेत्रातील नामवंत कंपनी असणाऱ्या सन फार्मास्युटिकल (Sun pharma.) इंडस्ट्रीजचे अध्यक्ष दिलीप संघवी (Dilip Sanghavi) हे महागड्या आणि आलिशान गाड्यांचे  चाहते आहेत. त्यांच्याकडे रॉल्स रॉईस घोस्ट, बेंटली, मलसेन, ऑडी, मेर्सेडेझ बेंझ, बीएमडब्ल्यू एक्स ५ अशा एका हून एक गाड्या आहेत.

अझीम प्रेमजी

भारतातील प्रसिद्ध उद्योगसमूहांपैकी एक असणाऱ्या ‘विप्रो’ (Wipro) या नामांकित उद्योगसमूहाचे संस्थापक-अध्यक्ष अझीम प्रेमजी (Azim Premji) हे सुद्धा त्यांच्या साधेपणासाठीच परिचित आहेत. पैसा कमावण्याबरोबरच समाजसेवा करून ते त्या पैशाचा योग्य विनिमय करतात. तसेच त्यांच्याकडे असणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य सोयी-सुविधा देणे यांवरही त्यांचा भर असतो. पण ही सगळी कामे करण्यासाठी ते टोयोटा करोला या गाडीचा उपयोग करतात. त्यांनी मर्सिडीज गाडीही घेतलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांचं जास्त प्रेम हे फोर्डच्या एस्कॉर्ट या गाडीवर होतं. खूप वर्षे त्यांनी ही गाडी वापरली.

आनंद महिंद्रा

वाहन निर्मितीच्या क्षेत्रातील नावाजलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) या उद्योगसमूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांना महागड्या विदेशी ब्रँडेड गाड्यांचं फारसं आकर्षण नाही. तर स्वतःच्याच कंपनीत बनवलेल्या गाड्या वापरण्यावर ते जास्त भर देतात. आनंद महिंद्रा रोजच्या व्यवहारांसाठी महिंद्रा एक्सयुव्ही ७०० (Mahindra XUV 700) ही गाडी वापरतात. महिंद्रा थार सारखी एक जबरदस्त एसयुव्ही त्याचबरोबर स्कोर्पिओ एन या गाड्याही ते वापरतात.  एसयूव्ही प्रकारातील सुरुक्षित गाड्या देणे ही महिंद्रा कंपनीची खासियत आहे.

लक्ष्मीचंद मित्तल

जगभरात पोलाद उद्योगाचे बादशाह म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मीचंद मित्तल (Laxmi Chand Mittal) जगातील श्रीमंतांच्या यादीत येणारे पाहिले भारतीय उद्योजक आहेत. ते जगातील सर्वात मोठी स्टील कंपनी आर्सेलर – मित्तल (Arcelor-Mittal) चे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष आहेत. मर्सिडीज बेंझ सी-क्लास, पोर्शे बॉक्सस्टर तसेच बीएमडब्ल्यूसह इतर लग्झरी वाहन उत्पादक कंपन्यांच्या २० हून लक्झरी कार आहेत.

शिव नाडर

एचसीएल टेक्नॉलॉजीज् (HCL Technologies) या तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीचे संस्थापक अध्यक्ष असणारे शिव नाडर (Shiv Nadar) ही नाव भारतातील सर्वोत्तम पाच उद्योगपतींमध्ये येतं. त्यांची एकूण संपत्ती ही ३१०० करोड डॉलर्स इतकी आहे. आताच्या परिस्थितीत नाडर यांचा सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्तींमध्ये तिसरा क्रमांक लागतो. त्यांना वाहने खूपच आवडतात. त्यांच्याकडे मलसेन, जग्वार एक्सएलजे, मर्सिडीज एससीएल एएमजी, बेंटली, रॉल्स रॉईस फॅन्टम अशा जबरदस्त गाड्या आहेत.

गौतम अदानी

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असणारी व्यक्ती म्हणजे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी. (Gautam Adani) त्यांच्याकडे अलिशान गाड्यांचा संग्रह आहे. तब्बल ६.५ कोटी रुपयांच्या आसपास किंमत असणारी रोल्स रॉयस घोस्ट ही  गौतम अदानी यांची सर्वात आवडती गाडी आहे. याच्याबरोबरच बीएमडब्ल्यू ७ सिरीज, फेरारी कॅलीफोर्निया, ऑडी क्यू ७ अशा एकदम प्रीमियम आणि आलिशान गाड्या अदानी यांच्याकडे आहेत.

मुकेश अंबानी

जगातील आठव्या क्रमांकाचे व भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती (India’s richest person) म्हणून ओळखले जाणारे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्याकडे एकाहून एक उत्तम गाड्या असणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आकाश आणि अनंत हे ज्युनिअर अंबानी यांच्याकडेसुद्धा  महागड्या गाड्या आहेत. मुलगी ईशा आणि पत्नी नीता अंबानी देखील अनेकदा मोठाल्या गाड्याच वापरतात. जगातील सर्वात महागड्या गाड्यांपैकी एक असणारी व ज्या गाडीची किंमत जवळपास चौदा कोटी इतकी आहे अशी रोल्स रॉयल कुलिनन ही गाडी अंबानी यांच्याकडे आहे.  मर्सिडीज बेंझ एस६०० गार्ड, बीएमडब्ल्यू ७६० ली,  माजेराटी लेवान्टे, कॅडिलॅक एस्केलेड, बेंटले बेंटयागा अशा साधारण १७० लक्झरी आणि प्रीमियम गाड्यांचा ताफा मुकेश अंबानी यांच्याकडे आहे. 

रतन टाटा

भारतातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक केवळ इतकीच रतन टाटा (Ratan Tata) यांची ओळख नाही तर समाजसेवेचे कार्य आणि साधी राहणी याही गोष्टींमुळे ते विख्यात आहेत. आपल्या छोट्या- मोठ्या सर्व कर्मचाऱ्यांची काळजी कशी घ्यावी याचं रतन टाटा हे उत्तम उदाहरण आहेत. मुम्बई शहरामध्ये टाटा समुहाचा (Tata Group) कारभार फैलावला आहे. सर्व ऑफिसेस मध्ये जाण्यासाठी टाटा हे नॅनो इलेक्ट्रिक हीच गाडी वापरतात. तसेच ते टाटा नेक्सॉन, टाटा टिगॉर या गाड्याही वापरतात. त्याचबरोबर त्यांच्याकडे फेरारी कॅलीफोर्निया, मर्सिडीज बेंझ ५०० एसएल, मर्सिडीज बेंझ डब्ल्यू १२४ अशा अन्य नामवंत गाड्या पण आहेत.

तर बड्या उद्योगपतींच्या कार कलेक्शन विषयीची हे माहिती कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा…


Leave A Reply

Your email address will not be published.