Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

संविधानाशिवाय बाबासाहेबांनी तीन धरणे सुद्धा बांधलेली आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) म्हंटलं कि पहिल्यांदा आपल्या समोर येते ते म्हणे त्यांचे अस्पृश्यता निवारणाचे. बाबासाहेब म्हणजे स्त्री मुक्ती चळवळीचे खंदे समर्थक, बाबासाहेब म्हणजे आपल्या स्वातंत्र्य भारताचे संविधानाचा मसुदा तयार करणारे महामानव. पण मला कधी कधी प्रश्न पडतो की बाबासाहेब फक्त येवढ्यापुर्ते मर्यादीत आहेत का..? बाबासाहेब फक्त एका विशिष्ट समाजाचे नेते होते का..? केंब्रिज विद्यापीठात आपल्या ज्ञानाचा डंका वावणाऱ्या बाबासाहेबांचे कार्य इतके मर्यादीत आहे का..?

मी Babasaheb Ambedkar जाणुन घेत असताना त्यांच्या स्वातंत्र्य भारताला लाभलेल्या अमूल्य योगदानाचा अभ्यास मला होत गेला. खरचं आधुनिक भारताच्या जडणघडणीसाठी अमूल्य असे योगदान बाबासाहेबांनी दिले आहे. स्वातंत्र्यपुर्व काळात वाॅइसराॅयच्या देखरेखीखाली व स्वातंत्र्यानंतर भारत सरकारसाठी त्यांनी बरीच मंत्रीपदे भुषवली आणि त्याकाळी विकासाची परीभाषा देशाला समजावली.

संविधान, बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकरांनी बांधलेली धरणे, दामोदर प्रकल्प, सोन प्रकल्प, हिराकुंड प्रकल्प, babasaheb ambedkar, Hirakud dam in marahi, damodar dam in marathi
Source – India Today

1944 मध्ये त्यांच्याकडे ऊर्जा, खनिज व जलसंधारण मंत्रिपद होते. त्या काळी त्यांनी एक संकल्पना मांडली ती संकल्पना जर आमलात आली असती तर आज भारतात कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये कावेरीच्या पाण्यासाठी संघर्ष झालाच नसता.

दामोदर नदीवरील त्यांच्या कळात बांधलेल्या धरणाच्या पायाभरणी समारंभाच्या प्रसंगी बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणतात की “रेल्वे आणि देशातील जलमार्ग हे पुर्णपणे केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असावीत, राज्यांकडे त्याचा तात्पुरता आधिकार द्यावा पण पुर्ण अधिकार देऊ नये. जर देशातील जलमार्ग केंद्राच्या हातात असतील तर पूरजन्य परिस्थिती मध्ये मदत कार्यात सुलभता येईल व दुष्काळात गरजू भागांना पाणी पुरवठा करता येईल.”

Babasaheb Ambedkar आपल्या कार्यकाळात बांधलेली धरणे

दामोदर प्रकल्प

दामोदर नदीवर धरण बांधणे अत्यंत आवश्यक आहे असे बाबासाहेबांचे मत होते. या प्रकल्पामध्ये दामोदर नदीच्या पुरामुळे होणारे नुकसान थांबवणे, या प्रकल्पातून वीज निर्मिती करून परिसरातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत वीज पोहचवणे आणि परिसरातील शेतीला पाणीपुरवठा इत्यादीचा समावेश होता. या प्रकल्पामध्ये होणाऱ्या वीज निर्मितीमुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांनी तेथील स्थानिक कामगारांना वीज निर्मिती तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणासाठी परदेशी पाठवके होते. या प्रकल्पामुळे आज सुध्दा तेथील परिसर सुजलाम आहे.

हिराकुंड प्रकल्प

दामोदर प्रकल्पाच्या पायाभरणी नंतर ओरिसा सरकारच्या सहाय्यानंतर लगेचच त्यांनी महानदीच्या सर्वेक्षणाला सुरूवात केली व ओरिसा राज्यातील महानदीवर हिराकुंड प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. 15 मार्च 1946 रोजी महानदीवरील हिराकुंड धरणाची पायाभरणी केली. यामागे डॉ. आंबेडकरांचा पाठींबा मोठा होता. दुरदृष्टीचे जलनियोजन होते. यामुळे कारखानदारी वाढेल, स्थानिकांना रोजगार मिळेल, वीज निर्मिती होईल, दुष्काळ पडणार नाही, शेतीला पाणी मिळेल असे उपाय त्यांनी ओरिसा सरकारला सुचवले.

सोन प्रकल्प

दामोदर व हिराकुंड प्रकल्पांचा निर्णय झाल्यानंतर डॉ. आंबेडकरांनी मध्यप्रदेशातील सोननदी प्रकल्प हाती घेतला. त्यांनी 1944 मध्ये श्रमविभागाकडून आराखडा तयार करून घेतला. सर्वेक्षणात त्यांनी या प्रकल्पामुळे शेतीला पाणीपुरवठा, वीज निर्मिती प्रकल्प, कुपनलिकांना वीज पुरवठा, औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा, जलवाहतुकीस पाणीपुरवठा आणि पूरनियंत्रण हे फायदे होणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. यामुळे पुढे धरण बांधनीच्या कामात उपयोग झाला.


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.