Infobuzz
Take a fresh look at your lifestyle.

आयुष्यात खूप यशस्वी व्हायचं असेल तर सकाळी ह्या ६ गोष्टी करायची सवय लावा

आपल्याला प्रत्येकाला आयुष्यामध्ये अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागते. आजकालच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण अनेक जबाबदाऱ्या पार पाडत आपलं अस्तित्व टिकवण्याच्या मागे लागलेला आहे. अशातच जर तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली झाली नाही तर तुमचा दिवस चांगला कसा जाईल ? आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडत असतील की यशस्वी व्यक्ती त्यांच्या दिवसाची सुरुवात कशी करत असतील. अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या सकाळी लवकर उठून केल्यामुळे आपण देखील यशापर्यंत पोहोचू ? जाणुन घेऊयात….

सकाळी लवकर उठायची सवय असणे आणि त्यासोबतच रोज सकाळी काहीतरी सकारात्मक गोष्टी करण्याची सवय असणे हि यशस्वी लोकांच्या जीवनातील सर्वात मोठी गोष्ट आहे. कारण, लक्षात घ्या रोज सकाळी आपल्या दिवसाची सुरुवात जशी होते तसाच आपला दिवस देखील जात असतो.

जर आपण सकाळीच अशा काही सकारात्मक गोष्टी केल्या उदाहरणार्थ व्यायाम, वाचन तर त्यामुळे आपल्या मेंदूला रोज सकाळी त्या सकारात्मक गोष्टी करायची सवय लागते आणि या सकारात्मक गोष्टींचा परिणाम आपल्या दिवसभराच्या कामकाजावर नक्कीच जाणवतो. त्यामुळे रोज सकाळी लवकर उठून काही गोष्टी करण्याची सवय आपण स्वतःला नक्कीच लावायला हवी, कुठल्या आहेत या सवयी जाणून घेऊयात

शांतता

आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींना सकाळी उठल्या उठल्या जगभराचं टेंशन घ्यायची सवय असते. काहीजण सकाळी उठले की लगेच पेपर घेऊन बसतील किंवा सकाळी मोबाईल वरती बातम्या पहात असतील. परंतु तुम्ही एक गोष्ट समजून घ्यायची आहे की सकाळी किमान अर्धा तास तरी तुम्ही शांतता अनुभवायला हवी, मग त्यासाठी तुम्ही काहीही करा, प्राणायाम करा, योगासन करा, मेडिटेशन करा अगदी काहीही करा. पण सकाळी टेन्शन न घेता अर्धातास शांतपणे निसर्ग नक्कीच अनुभवा.

morning routines of successful entrepreneurs, what successful people do in the morning, morning habits of billionaires, successful people start their day early, first thing to do in the morning, successful people morning routine in marathi

यशस्वी व्यक्ती कधीच सकाळी उठल्या उठल्या टेंशन डोक्यावर घेऊन वावरत नाहीत.ते सकाळी स्वतःला वेळ देतात. योगासन करतात, मेडिटेशन करतात आणि किमान काही वेळ तरी शांततेत घालवतात. अशा प्रकारे दिवसाची सुरुवात केल्यामुळे तुमचा मेंदू शांत होतो आणि तुम्हाला दिवसभरात येणाऱ्या टेन्शनला तोंड देण्याची शक्ती येते.

पॉझिटिव्ह स्टेटमेंट

आपल्यापैकी बऱ्याच जणांना अशी सवय असेल की जर समोर संकट दिसत असेल तर त्या संकटासाठी आपण स्वतःला दोष देऊ लागतो. जसे की, ‘आपल्या चुकीमुळे आपण या संकटामध्ये ओढले गेलो आहोत आणि आता आपण या संकटामध्ये अडकणार आहोत’. मित्रांनो लक्षात घ्या, यशस्वी व्यक्ती कधीच स्वतःला कुठल्याही संकटाबद्दल दोष देत नाहीत, ते अशा परिस्थितीत नेहमी स्वतःला एका सकारात्मक ऊर्जेने वाचवण्याचा प्रयत्न करतात.

यशस्वी व्यक्ती नेहमी स्वतःला, “तू यशस्वी होणार आहेस, हे संकट खूप लहान आहे” अश्या सकारात्मक पद्धतीने विचार करायला भाग पाडतात. त्यामुळे ते संकट झेलण्याची शक्ती त्या यशस्वी व्यक्तीमध्ये आपसूकच येते, त्यामुळे कधीच स्वतःला दोष न देता एक सकारात्मक ऊर्जा नेहमी आपल्या मनामध्ये कशी राहील याचा विचार नक्की करायला हवा.

कल्पना करणे

आपण नेहमीच काम करत असताना थकू शकतो किंवा आपल्याला त्या कामाचा कंटाळा देखील येऊ शकतो अशा परिस्थितीत एखादं काम करायच्या आधी त्या कामामुळे होणाऱ्या चांगल्या परिणामांचा विचार करणं आणि त्या परिणामांमुळे तुमच्यात होणारे सकारात्मक बदला बद्दल विचार करणे, त्याची कल्पना करणे हे त्या गोष्टीचं उत्तर आहे.

तुम्ही जर असा विचार केलात तर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही, म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्हाला धावण्यासाठी जायचं असेल पण तुम्हाला त्याचा प्रचंड कंटाळा येतो अशावेळी तुम्ही धावायला जायच्या अर्धा तास आधी असा विचार करा की तुम्ही शूज घालत आहात आणि तुम्ही प्रचंड आनंदी आहात. या कल्पनेमुळे तुम्हाला धावताना प्रचंड आनंद मिळेल, तुम्हाला कसलाही थकवा जाणवणार नाही.

व्यायाम

सकाळी लवकर उठण्याचे आणि व्यायाम करण्याचे प्रचंड फायदे आहेत. तुम्ही विचार देखील करू शकणार नाही एवढे सकारात्मक फायदे तुम्हाला तुमच्या या कृतीतून मिळू शकतात. सकाळी उठून व्यायाम केल्यामुळे तुमच्या मेंदूतील ऑक्सिजनचे प्रमाण प्रचंड वाढते यामुळे तुमचा मेंदू तल्लख होतो, तुम्हाला विचार करायला मदत होते, तुम्हाला इतर वेळी पेक्षा नक्कीच अधिक सकारात्मक ऊर्जा जाणवू लागते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शारीरिक आणि माणसिक दृष्ट्या फिट राहता.

ह्या व्यायामासाठी तुम्हाला कुठेही जीमला जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही हा व्यायाम तुमच्या घरी देखील कमी वेळात नक्कीच करू शकता. सकाळी उठून व्यायाम केल्यामुळे संपूर्ण दिवस तुमच्यामध्ये ऊर्जेच प्रमाण कमी होणार नाही.

वाचन

मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी वाचन म्हणजे वर्तमानपत्र वाचन नव्हे तर अशा पुस्तकांचं आपण रोज सकाळी वाचन केलं पाहिजे ज्यामुळे आपल्या मध्ये नवीन सकारात्मक बदल होण्यास मदत होईल. पुस्तक वाचताना या गोष्टीची नेहमी काळजी घेतली गेली पाहिजे की अशी पुस्तकं वाचण्यामुळे तुमच्यामधील विचार करण्याची सवय वाढीस लागेल. तुम्हाला त्या वाचना मधून काहीतरी सकारात्मक घेता येईल, तुमच्या जीवनशैलीमध्ये काही तरी सकारात्मक बदल होतील असेच पुस्तक नेहमी वाचावीत.

लिहिणे

मित्रांनो आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये काही ना काही तरी मोठी स्वप्नं नक्कीच असतील. ती स्वप्नं कुठेतरी लिहून ठेवा, असं केल्यामुळे तुम्हाला एक सकारात्मक उर्जा भेटेल परिणामी तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी नक्कीच मदत करेल. यासोबतच नेहमी आपल्यासोबत एक डायरी आणि पेन असू द्यावा ज्यामुळे जर आपल्याला एखादी नवीन भन्नाट कल्पना आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुचली तर ती कल्पना लगेच त्या डायरीमध्ये लिहून घ्या. या गोष्टीमुळे तुमच्या मेंदूत आलेल्या कल्पना कधीही वाया जाणार नाहीत किंवा विसरल्या जाणार नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.